आपली भूमिका पडद्यावर खरी वाटावी याकरिता तुमच्या आवडत्या स्टार्सनी स्वतःवर केले अनेक एक्सपेरिमेंट

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

कोणताही कलाकार आपले काम योग्यप्रकारे व्हावे आणि त्यात खरेपणा यावा, यासाठी खूप मेहनत घेतो. तसेच, काहीसे चित्रपटांत काम करणाऱ्या कलाकारांचे देखील असते. आपला अभिनय खरा वाटावा आणि लोकांना तो पसंत यावा, यासाठी ते त्यांच्याकडून जे करता येईल ते करतात. बॉलीवूड चित्रपट सृष्टीमध्ये देखील आपल्याला हे पाहायला मिळते. या चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध कलाकार देखील चित्रपटात निभावलेल्या आपल्या रोलला योग्य न्याय मिळावा, यासाठी तसे जीवन जगण्याचा प्रयत्न करतात.

आपला अभिनय खराखुरा वाटावा यासाठी या कलाकारांना खूप परिश्रम आणि संघर्ष करावा लागतो. आज आम्ही तुम्हाला बॉलीवूडमधील काही अशा कलाकारांविषयी सांगणार आहोत, ज्यांनी चित्रपटांमधील काही रोल करण्यासाठी खूप कष्ट घेतले आहेत. चला तर मग जाणून घेऊया, अशा काही कलाकारांविषयी ज्यांनी ह्या रोलद्वारे स्वतःला सिद्ध केले आहे..

१. रणवीर सिंग

 

Famous characters in bollywood films.Inmarathi
indianexpress.com

रणवीर सिंग हा आपला अभिनय चांगला व्हावा यासाठी नेहमीच योग्य ती मेहनत घेत असतो. तुम्ही रणवीर सिंग आणि सोनाक्षी सिन्हा यांचा लुटेरा हा चित्रपट पाहिला असेलच. या चित्रपटामध्ये वेगवेगळे भाव दाखवण्यासाठी रणवीर सिंगने आपल्या स्कीनबरोबर कितीतरी प्रकारचे प्रयोग केले होते. एवढेच नाही तर बाजीराव – मस्तानीसाठी त्यांनी आपल्या फिटनेसवर खूप कष्ट घेतले होते.

२. ऋतिक रोशन

 

Famous characters in bollywood films.Inmarathi1
xcitefun.net

आपल्या डान्ससाठी प्रसिद्ध असलेला बॉलीवूड स्टार ऋतिक रोशनने गुजारीश या चित्रपटामध्ये पॅरलाईज माजी जादुगारचा रोल केला होता. त्यामध्ये त्याला हे दाखवायचे होते की, माजी जादुगार असलेला तो मनुष्य १४ वर्षापर्यंत व्हीलचेयरवरच राहिलेला आहे. या भूमिकेला साकारण्यासाठी ऋतिक कितीतरी तास व्हीलचेयरवर बसून राहायचा, त्यामुळे तो पाय नसल्यावर कसे वाटते याचा अनुभव घेत असे.

३. रणदीप हुड्डा

 

Famous characters in bollywood films.Inmarathi2
bollywoodbubble.com

रणदीप हुड्डा याने आपल्या प्रत्येक चित्रपटात वेगवेगळ्या प्रकारची भूमिका साकारली आहेत. रणदीप हुड्डा याने गेल्या वर्षी आलेल्या सरबजीत या चित्रपटात अप्रतिम काम केले होते. यात त्याने पाकिस्तानच्या कैदेत असलेल्या सरबजीतची भूमिका साकारली आहे. या भूमिकेत स्वता: ला उतरवण्यासाठी त्याने फक्त २८ दिवसात १८ किलो वजन कमी केले. या चित्रपटातील भूमिकेसाठी त्याने आपले जेवण देखील खूप कमी केले होते.

४. सैफ अली खान

 

Famous characters in bollywood films.Inmarathi3
storyepic.com

बॉलीवूडचा नवाब असलेला सैफ अली खान प्रत्येक चित्रपटामध्ये आपली भूमिका चोखपणे बजावतो. विशाल भारद्वाज याने दिग्दर्शित केलेल्या ओमकारा या चित्रपटात लंगडा त्यागी ही भूमिका साकारण्यासाठी सैफ अली खानने १५ दिवस दात घासले नव्हते.

५. अमीर खान

 

Famous characters in bollywood films.Inmarathi4
firstpost.in

बॉलीवूडमध्ये Mr. Perfectionist म्हणून ओळखला जाणार आमीर खान हा खास आपल्या अभिनयासाठी ओळखला जातो. आमीर खानच्या पीके या चित्रपटात तो भोजपुरी माणसासारखा वागत असतो. ही भूमिका चांगल्याप्रकारे वठवण्यासाठी तो दररोज जवळपास १०० पान खात असे आणि त्याला स्वत: ला भोजपुरी स्टाईलमध्ये आणण्यासाठी त्याला जवळपास दोन वर्ष लागली. तसेच या वर्षी आलेल्या ‘सिक्रेट सुपरस्टार’ या चित्रपटात त्याने एक वेगळीच भूमिका साकारली होती, त्याकरिता देखील त्याने खुप कष्ट घेतले होते.

६. राजकुमार राव

 

Famous characters in bollywood films.Inmarathi5
dainikbhaskar.com

नॅशनल अवार्ड विजेता आणि बॉलीवूडमध्ये स्वत: ची स्वतंत्र ओळख बनवलेल्या राजकुमार रावने मोहित सुरीच्या हमारी अधुरी कहाणी या चित्रपटामधील आपल्या भूमिकेसाठी गरीब आणि दयनीय दिसण्यासाठी जवळपास एक महिन्यापर्यंत अंघोळ केली नव्हती.

७. आलिया भट

 

Famous characters in bollywood films.Inmarathi6
indianexpress.com

आलियाने २०१२ साली प्रदर्शित झालेल्या करण जोहरच्या स्टुडन्ट ऑफ द इयर ह्या चित्रपटामध्ये नायिकेची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. उडता पंजाबमध्ये तिने साकारलेल्या भूमिकेची लोकांनी प्रशंसा देखील केली होती. या चित्रपटातील आपली भूमिका उठून दिसावी यासाठी  तिने जवळपास २० दिवस आपले केस धुतले नव्हते.

८. विद्या बालन

 

Famous characters in bollywood films.Inmarathi7
indianexpress.com

सध्या भारतामधील सर्वोत्तम अभिनेत्रींपैकी एक मानल्या जाणाऱ्या विद्याला आजवर एक राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, ५ फिल्मफेअर पुरस्कार, ५ स्क्रीन पुरस्कार मिळाले आहेत. २०१४ साली भारत सरकारने तिला पद्मश्री पुरस्कार देऊन गौरवले. विद्या देखील आपल्या अभिनयासाठी खूप मेहनत घेते. विद्याने कहानी २ मधील आपली भूमिका खरीखुरी वाटावी, यासाठी आलिया सारखेच जवळपास २० दिवस केस धुतले नव्हते.

असे आहेत हे बॉलीवूडचे कलाकार, आपला अभिनय चांगल्याप्रकारे व्हावा आणि लोकांना तो पसंत यावा, यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करतात.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017  InMarathi.com | All rights reserved

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?