‘ह्या’ चित्रपटांच्या शुटिंगसाठी तुमच्या आवडत्या कलाकारांनी दिले त्यांचे स्वतःचे घर

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

बॉलीवूड हे एक असे क्षेत्र आहे जिथे अनेक प्रयत्न करूनही हे स्टार्स त्यांची पर्सनल लाईफ पर्सनल ठेवू शकत नाही. ते कुठे जातात-येतात, त्यांनी काय घातल, काय खाल्ल इथपासून ते त्यांच्या सर्व हालचालींवर प्रसारमाध्यमांच्या कॅमेऱ्याची नजर असते. जर या नजरेतून त्यांना कोणी वाचवत असेल तर ते एकमात्र त्याचं घर…

तुम्ही अनेक वेळा चित्रपटातील मोठमोठी घर बघितली असतील. तेव्हा आपण नेहेमी असा विचार करतो की, हा एखादा सेट असेल. पण कधी कधी चित्रपटांत सेट नाही खरोखरची घरे देखील दाखविली जातात. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल पण काही चित्रपटांत तर स्वतः या सेलिब्रिटीजची घरं दाखविण्यात आली आहेत. चला तर जाणून घेऊ की कुठल्या चित्रपटाची शुटींग झाली आहे तुमच्या आवडत्या अभिनेत्याच्या घरी…

वीर-जारा :

 

bollywood movies-inmarathi

शाहरुख खान-प्रीती झिंटा आणि राणी मुखर्जी यांचा २००४ साली आलेला ‘वीर-जारा’ हा चित्रपट खूप गाजला. या चित्रपटाची कहाणी, कलाकार, डायलॉग्स, गाणी सर्वकाही सुपरहिट होते. या चित्रपटाच्या काही भागांची शुटींग ही सैफ आली खानच्या पतौडी पॅलेसमध्ये झाली आहे.

फॅन :

 

bollywood movies-inmarathi01

शाहरुख खानचा चित्रपट फॅन हा भलेही त्याच्या इतर चित्रपटांप्रमाणे गाजला नसला तरी या चित्रपटाला यशस्वी बनविण्यात त्याने कुठलीही कसर सोडली नाही. पण कधी-कधी चित्रपट चालतात कधी नाही. या चित्रपटात शाहरुखने स्वतःसोबतच प्रयोग करत डबल रोल केला आहे. या चित्रपटाच्या काही सिन्सचे शूट हे शाहरुखच्याच बांद्रा येथील मन्नत या बंगल्यात तर काही या बंगल्याच्या आसपास करण्यात आले आहे.

बजरंगी भाईजान :

 

bollywood movies-inmarathi02

सलमान खानचा गाजलेला चित्रपट ‘बजरंगी भाईजान’ने बॉक्सऑफिसवर खूप कमाई केली. त्याच्या चित्रपटाची कहाणी खरच खूप सुरेखपणे पडद्यावर उतरविण्यात आली होती आणि त्यातच भाईजानची अॅक्टिंग म्हणजे तर काही बोलायलाच नको. हा चित्रपट देशातच नाही तर देशा बाहेरही चांगला गाजला. पण कदाचित तुम्हाला हे माहित नसावे की, या चित्रपटाच्या काही भागांची शुटींग सलमान खान याच्या पनवेल इथल्या फार्महाउस वर करण्यात आली आहे.

कि अॅण्ड का :

 

bollywood movies-inmarathi03

करीना कपूर आणि अर्जुन कपूर यांचा ‘की अॅण्ड का’ हा चित्रपट जरी तेवढा कमाई करू शकला नसेल तरी या चित्रपटात मांडण्यात आलेल्या मुद्द्याची सर्वत्र स्तुती करण्यात आली. या चित्रपटात अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांनी कॅमियो रोल केला होता, ज्याची शुटींग त्यांच्याच ‘जलसा’ या बंगल्यात करण्यात आले होती.

बॉम्बे टॉकीज :

 

bollywood movies-inmarathi04
सिनेमा जगतातील ४ मोठ्या दिग्दर्शकांनी सोबत येऊन एक चित्रपट बनवला होता बॉम्बे टॉकीज.. करण जौहर, अनुराग कश्यप, जोया अख्तर आणि दिबाकर बनर्जी या बड्या दिग्दर्शकांच्या दिग्दर्शनात बनलेला हा चित्रपट प्रेक्षकांना काही फार रुचला नाही. या चित्रपटात रणदीप हुड्डा आणि राणी मुखर्जी यांच्यावर चित्रित सिन्सचे शुटींग स्वतः कारण जौहर याच्या घरात झाले होते.

संजू :

 

bollywood movies-inmarathi05

संजय दत्त याच्या जीवनावर आणि त्याच्या संबंधित कॉन्ट्रोवर्सीवर आधारित चित्रपट ‘संजू’ याची सध्या चित्रपट जगामध्ये चर्चा आहे. ज्यात संजय दत्त यांचा रोल रणबीर कपूर निभावणार आहे. या चित्रपटात संजय दत्तचे जीवन आणखी जवळून दाखविण्याकरिता या चित्रपटाची शुटींग संजयच्याच घरी करण्यात आली.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?