' हे १० डायलॉग्ज तुम्हाला फार आवडले होते – पण हे खरं तर अत्यंत अर्थहीन आहेत! – InMarathi

हे १० डायलॉग्ज तुम्हाला फार आवडले होते – पण हे खरं तर अत्यंत अर्थहीन आहेत!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

बॉलीवूड… बॉलीवूड म्हटलं की आपल्याला आठवतो तो सरसोच्या शेतात रोमान्स करणारा शाहरुख, “एक, दोन, तीन” म्हणत नाचणारी माधुरी, “कुछ कुछ होता है राहुल” म्हणणारी काजोल.. फुल ऑन रोमान्स, ड्रामा, मारामारी आणि हॅपी एंडिंग.

 

kuch kuch hota hai inmarathi

 

कदाचित बॉलीवूडचा जन्मच हा रोमान्स शिकविण्यासाठी झाला की काय असा कधीकधी प्रश्न पडतो.

आणि ह्याच बॉलीवूडचे रोमांटिक सिनेमे बघून जणू प्रेम काय ते असचं असाव असं आपण मानू लागलो. एखाद्याला प्रेमाचा प्रस्ताव देताना तो बॉलीवूड स्टाईलमध्ये करू लागलो.

पण ज्या बॉलीवूडला आपण आपला लव्ह गुरु मानतो त्याचं बॉलीवूड चित्रपटांतील डायलॉग जे आपल्याला तोंड पाठ असतात, त्यांच्यामागे काही तथ्य आहे पण की नाही हे जाणून घेण्याचा आपण कधी विचारच नाही केला.

आज आम्ही आपल्याला असेच काही अर्थहीन पण प्रसिद्ध बॉलीवूड डायलॉग सांगणार आहोत ज्याच्या जोरावर आपण एखाद्याला इम्प्रेस करायला निघतो.

कुछ कुछ होता है :

 

Related image

 

“हम एक बार जीते है, एक बार मरते है, शादी भी एक बार होती है… और प्यार भी एक बार ही होता है”

आणि विरोधाभास म्हणजे ह्याच चित्रपटात शाहरुखला राहुललाच दोन वेळा प्रेम होते.

मुळात “हम एक बार जीते है, एक बार मरते है, शादी भी एक बार होती है…” इथपर्यंत ठीक आहे, पण “प्यार भी एक ही बार होता है” असं म्हणण्यात सध्याच्या काळात कितपत तथ्य आहे?

जब वि मेट 

 

Related image

 

“जब कोई प्यार में होता है तो कोई सही गलत नही होता.”

मग या हिशोबानी तर प्रेमात केलेलं प्रत्येक काम बरोबर ग्राह्य धरलं जाईल.

मग तो रेप असो, ऍसिड अटॅक असो किंवा कुणाची छेड काढणे असो. प्रेमात तर सर्वच बरोबर असतं.

पण प्रेम आंधळं असलं, तरी त्याबाबतचे सगळेच निर्णय आपणं अत्यंत विचारपुर्वक घेतो ना.

धडकन 

 

Image result for dhadkan gif

 

“मैं तुम्हे भूल जाऊ येह हो नही सकता… और तुम मुझे भूल जाओ येह मैं होने नही दुंगा…”

हा डायलॉग तर सर्वांच्याच आवडीचा आहे.

पण हा डायलॉग कमी आणि धमकी जास्त वाटतो.

त्यामुळे प्रत्यक्ष आयुष्यात जर तुम्ही कोणाला हा डायलॉग म्हटला तर कदाचित तो तुमची पोलिसांत तक्रार देखील देऊ शकतो.

कुणी कुणाला लक्षात ठेवायचं आणि विसरायचं हा ज्याचा त्याचा प्रश्न असतो. नको असलेल्या व्यक्तीला लक्षात का ठेवायचं?

दिल तो पागल है 

 

Image result for dil to pagal hai gif

“कही ना कही कोई ना कोई मेरे लिए भी बनाया होगा.”

 

आजच्या आधुनिक युगात ह्या डायलॉगसाठी कुठेही जागा नाही, कारण आज कोणीही कुणासाठी वाट बघत बसत नाही. प्रत्येकाचं जगणं स्वतंत्र आहे आणि तसं जगलं नाही तर ओढाताण होते हे प्रत्येकाला माहित आहे.

येह जवानी हैं दिवानी 

 

Image result for yeh jawaani hai deewani gif

 

“तुम्हारे जैसी लडकीया फ्लर्टिंग के लिये नही इश्क के लिये बनी हैं”

ते तर काहीसं तसचं झालं की, मुली ह्या केवळ घरकामासाठी बनल्या आहेत…

दिल वाले दुल्हनिया ले जाएंगे 

 

Image result for ddlj palat gif

 

“अगर वो मुझसे प्यार करती है तो पलटेगी.”

जर असं म्हटल्याने प्रेम झालं असतं तर आज कोणालाही सिंगल राहावं लागलं नसतं.

किंवा जर एखाद्या व्यक्तीचं आपल्यावर प्रेम असेल आणि त्या व्यक्तीने मागे वळून पाहिलं नाही तर तिचं आपल्यावर प्रेम नाही असा निष्कर्ष काढता येईल का?

दिल चाहता हैं 

 

amir khan inmarathi

 

“मुझे यकीन हैं की मैं सिर्फ इसीलिये जन्मा हुं की तुमसे प्यार कर सकू. तुम सिर्फ इसीलिये की एक दिन मेरी बन जाओ…”

म्हणजे जगात आपला जन्म हा केवळ ह्या एकाच गोष्टीसाठी होतो. प्रेम ही एकाच गोष्ट केंद्रस्थानी ठेवून बाकीच्या सर्व गोष्टी दुय्यम असतात असं एकदा ठरवून टाकलं की असे विचार जन्म घेतात. पण एकाच व्यक्तीवर केंद्रित असावं इतकं कुणाचंच आयुष्य मर्यादित नसतं.

वीर जारा :

 

Image result for veer zaara gif

 

“सच्ची मोहोब्बत जिंदगी मैं सिर्फ एक बार होती हैं… और जब होती हैं… तो कोई भगवान यां खुदा उसे नाकामयाब नही होने देता…”

असं कहीही नसतं, प्रेम ही एक भावना आहे जी कोणाच्याही मनात कोणाही बद्दल कितीही वेळा येऊ शकते.

ते तर फक्त ह्या चित्रपटांचा आपल्यावर एवढा प्रभाव असल्या कारणाने आपण खरं प्रेम एकदाच होतं असं मानतो.

एका पुरुषाला अनेक स्त्रियांबद्दल किंवा एका स्त्रीला अनेक पुरुषाबद्दल आकर्षण वाटणे ही नैसर्गिक गोष्ट आहे.

दबंग 

 

यात अभिनेत्री म्हणते, थप्पड से डर नही लगता..

जे कुणालाच खरं वाटणार नाही. प्रेम सगळ्यांना हवं असतं.. त्याची मात्र तिला भीती वाटते. पण थोबाडीत खाण्याबद्दल तिला काही वाटत नाही.

कुछ कुछ होता है 

 

Related image

 

“प्यार दोस्ती है. अगर वो मेरी सबसे अच्छी दोस्त नही बन सकती, तो मै उससे कभी प्यार कर ही नही सकता.”

हा डायलॉग प्रत्यक्ष आयुष्यात अगदी फोल ठरतो.

कारण आपल्या जीवनात आपल्या अनेक चांगल्या मैत्रिणी किंवा मित्र असतात. म्हणून काही आपण त्या सर्वांच्याच प्रेमात पडत नाही.

असे अजूनही कितीतरी डायलॉग आहेत ज्यांचा आपल्यावर प्रभाव आहे, पण खऱ्याखुऱ्या जगात त्यांचा काही उपयोग नसतो. प्रेमाबद्दल, नात्यांबद्दल असं एका वाक्यात निकाल देऊन टाकणं हेच मुळात चूक आहे!

चित्रपट हा काल्पनिक असतो, त्यातल्या वाक्यांचा अवलंब आपण तत्व म्हणून करू लागलो की मनस्ताप ठरलेला असतो.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?