प्रियांका ते कतरिना : हे आहेत यांचे खरे चेहरे!

आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

===

 

सुंदर दिसणे कोणाला आवडतं नाही हो? सुंदर दिसण्यासाठी लोक खासकरून स्त्रिया खूप मेहनत घेतात. याचाच परिणाम आज असा झालं आहे की  सौंदर्यप्रसाधन उत्पादनांचे भलेमोठे यशस्वी मार्केट जगामध्ये अस्तित्वात आले आहे. पण आजकाल सुंदरता वाढवण्यासाठी फक्त सौंदर्य प्रसाधनांचा वापर न करता त्याहून पुढे जाऊन प्लास्टिक सर्जरीचा आधार सुद्धा घेतला जातो. बॉलीवुड मधील अनेक अभिनेत्रींनी आपली सुंदरता वाढवण्यासाठी प्लास्टिक सर्जरीचा आधार घेतला आहे. ही प्लास्टिक सर्जरी बऱ्याच जणींच्या पथ्यावर पडली तर बऱ्याच जणींनी मात्र प्लास्टिक सर्जरी करून स्वत:च हसू करून घेतलं.

वानी कपूर

bollywood-actress-pastic-surgery-marathipizza12

 

२०१३ सालामध्ये ‘शुद्ध देसी रोमांस’ मधून बॉलीवुड मध्ये करिअरची सुरवात करणाऱ्या वानी कपूरने तीन वर्षानंतर ‘बेफिक्रे’मध्ये मुख्य कलाकाराची भूमिका बजावली होती. ह्या चित्रपटासाठी वानीने आपल्या ओठांची आणि हनुवठीची सर्जरी केली होती.

 

प्रियांका चोपडा

bollywood-actress-pastic-surgery-marathipizza02
प्रियांका आजकाल हॉलीवुड मधील आपल्या कामामध्ये खूप व्यस्त आहे. मिस युनिवर्स राहिलेली प्रियांकाने सुद्धा आपल्या नाकाची आणि ओठांची सर्जरी केली आहे.

 

आयशा टाकिया

bollywood-actress-pastic-surgery-marathipizza03
नागेश कुकनरच्या ‘डोर’ या चित्रपटातून आपल्या अभिनयाची सुरुवात केलेल्या आयशा टाकियाने देखील प्लास्टिक सर्जरी केली आहे. आताच काही काळापूर्वी तिने आपल्या ओठांची सर्जरी केली होती, त्या नंतर तिला ट्वीटरवर खूप ट्रोल करण्यात आले होते.

 

अनुष्का शर्मा

bollywood-actress-pastic-surgery-marathipizza04
‘रब ने बना दी जोडी’ या चित्रपटातून बॉलीवुड मध्ये आपली चांगलीच सुरुवात करणाऱ्या अनुष्का शर्माने अनुराग कश्यपच्या ‘बॉम्बे वेलवेट’ या चित्रपटासाठी आपल्या ओठांची सर्जरी केली होती.

 

कोयना मित्रा

bollywood-actress-pastic-surgery-marathipizza05
‘एक खिलाडी एक हसीना’ या चित्रपटातून खूपच चर्चेत आलेली कोयना आज बॉलीवुड पासून दूर आहे. चित्रपट ‘अपना सपना मनी मनी’ मध्ये काम केल्यानंतर तिने आपल्या ओठांची आणि नाकाची सर्जरी केली होती.

 

कंगना राणावत

bollywood-actress-pastic-surgery-marathipizza06
बॉलीवुडची क्वीन कंगनाने आपली सुंदरता वाढवण्यासाठी प्लास्टिक सर्जरी केली होती. चित्रपट ‘गँगस्टर’मधून बॉलीवुड मध्ये सुरुवात करणाऱ्या कंगनाने आपल्या ओठांची सर्जरी केली आहे.

 

श्रीदेवी

bollywood-actress-pastic-surgery-marathipizza07
नवीन अभिनेत्रीच नाहीत तर ८० च्या दशकातील खूप सुंदर अभिनेत्री म्हणून प्रसिद्धीस पावलेल्या श्रीदेवीने ही नाकाची प्लास्टिक सर्जरी केली आहे.

 

कॅटरीना कैफ

bollywood-actress-pastic-surgery-marathipizza08
कॅटरीनाला बॉलीवुड मधील सर्वात सुंदर अभिनेत्रींमध्ये वरचे स्थान आहे. पण तिनेही ओठांना चांगला आकार देण्यासाठी ओठांची सर्जरी केली आहे.

 

मिनीषा लांबा

bollywood-actress-pastic-surgery-marathipizza09
चित्रपट ‘यहां’ मधून आपल्या करीयरची सुरुवात करणारी मिनिषा लांबा,र णबीर कपूर बरोबर ‘बचना ऐ हसीनों’ मध्येही दिसली आहे. तिनेही आपल्या नाकाची सर्जरी केली आहे.

 

राखी सावंत

bollywood-actress-pastic-surgery-marathipizza10
“जो भगवान भी नही दे सकता वो डॉक्टर दे सकते है” असे राखी सावंतने आपल्या नाक आणि ओठांची सर्जरी केल्यानंतर सांगितले होते.

 

गौहर खान

Gauhar-Khan-inmarathi
starsunfolded.com

बिग बॉस आणि आताच आलेल्या ‘बेगम जान’ या चित्रपटात काम करणारी अभिनेत्री गौहर खानने ही आपल्या ओठांची सर्जरी केलेली आहे.

या सर्वांच्या व्यतिरिक्त तनुश्री दत्ता,करिश्मा कपूर सारख्या अभिनेत्रींनी सुद्धा आपले सोंदर्य वाढवण्यासाठी प्लास्टिक सर्जरी केली आहे.

 

इमेज स्रोत: india.com

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: MarathiPizza.com. तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/MarathiPizza । Copyright (c) 2017 मराठी pizza. All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?