' वाळूसारख्या वस्तूचा सुद्धा चालतो काळाबाजार कसा तो जाणून घ्या ! – InMarathi

वाळूसारख्या वस्तूचा सुद्धा चालतो काळाबाजार कसा तो जाणून घ्या !

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page

===

आपल्यासाठी वाळू हे खर तर खूप क्षुल्लक गोष्ट आहे. वाळू म्हणजे काही धातू नाही. तिला सोन्या चांदी सारखं मुल्य नाही, ती काही खूप महत्वाचा खनिज पदार्थ देखील नाही. वाळूचा उपयोग फार तर बांधकाम मध्ये होतो इतकीची मुलभूत माहिती आपणास आहे.

मात्र वाळूसारख्या गोष्टीचा सुद्धा काळाबाजार चालतो आणि तस बघायला गेलं तर वाळू हे जगातील महागड्या साधनांपैकी एक आहे अस जर कुणी सांगितलं तर तुमचे डोळे विस्फारतील.

कारण तितकं महत्व आपण तरी आजपर्यंत वाळूला दिलेलं नाही. परंतु ही गोष्ट ऐकायला जरी अशक्य किंवा काल्पनिक वाटत असली तरी ती सत्य आहे. वाळू मूल्यवान आहे! इतकी मूल्यवान की तिचा काळाबाजार सुद्धा चालतो! सोन्यासारख्या किमतीला काळ्या बाजारातून वाळू विकत घ्यावी लागते. अस का होतं? याची कारणे काय आहेत?

 

sand-inmarathi
indiamart.com

वाळूच्या सुद्धा खाणी असतात आणि वाळू हे जगातील सगळ्यात मोठ्या प्रमाणात खणून बाहेर काढले जाणारे साधन आहे. जगातील जवळजवळ ८०% खाणकाम हे वाळू, खडकाचे तुकडे आणि गारगोट्या खोदुन काढण्यासाठी केले जाते. आता प्रश्न पडेल की वाळूचे खोदकाम इतके महत्वाचे का आहे?

१. जगातील जितके काही बांधकाम व्यवसाय आहेत त्या सगळ्यांना सिमेंट बनवण्यासाठी वाळू लागते.

२. काच बनवण्यासाठी वाळू लागते त्यामुळे काचेचा वापर ज्या ज्या उद्योगधंद्यात होतो तिथे तिथे वाळू लागते.

३. खूप वेळा समुद्राच्या पाण्याचा उपसा करून तिथे जमीन बनवली जाते त्यावेळी समुद्राच्या पाण्याची पातळी समतोल राखण्यासाठी त्याच्यात प्रचंड प्रमाणात वाळू टाकली जाते.

आता प्रश्न पडला असेल या गोष्टीसाठी वाळू मूल्यवान कशी ठरते. कारण जगात मोठमोठे असे ७ वाळवंट आहेत. लहानपणी भूगोलाच्या पुस्तकात आपणास पाठ केलेली सहारा वाळवंट, कलहारी वाळवंट अशी नावे ही आठवत असतील.

जर जगात इतके मोठमोठाले वाळवंट आहेत तर मग वाळूचा काळाबाजार करण्याची काय गरज हा प्रश्न उचित असू शकतो.

 

sand-mafia-inmarathi
youtube.com

खरंतर पृथ्वीवर ७३% पाणी आहे आणि २३% फक्त जमीन तरीही जगाला पाण्याचे दुर्भिक्ष्य सतावते. कारण ७३% पाण्यापैकी उपयोगाला येणारे गोडे पाणी फार कमी आहे आणि ते समुद्रांद्वारे नाही तर पावसाद्वारे मिळते. हीच गोष्ट वाळूची सुद्धा आहे. वाळवंटात असणारी वाळू बांधकामासाठी किंवा काच बनवण्यासाठी उपयोगी येत नाही कारण ती प्रचंड बारीक असते. तिचा उद्योगधंद्यामध्ये वापर करता येत नाही.

वाळूच्या धंद्याचा जर विचार करायचा झाला तर आजमितीला जगात वाळूच्या उद्योगाची उलाढाल जवळजवळ ७० हजार करोड च्या घरात आहे.

खरे पाहता वाळू स्वस्त आहे परंतु वाळूला खोदून बाहेर काढल्यानंतर तिची एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाहतूक करण्यासाठी खूप खर्च येतो. जगात युरोपियन देश, सिंगापूर, अबुधाबी, कतार, दुबई यासारखे देश वाळू ची आयात करण्यात आघाडीवर आहेत.

जसजशी जगाची लोकसंख्या वाढत चालली आहे तशी तशी या वाढत्या लोकसंख्येला राहण्यासाठी जागेची गरज ही वाढत चालली आहे. त्यामुळे वाळूला असणारी मागणी सातत्याने वाढत आहे.

 

Construction-inmarathi
indiamart.com

त्यामुळे जिथे मागणी आणि पुरवठ्याचे तत्व येते तिथे मागणी पेक्षा पुरवठा कमी पडला की अचानक वस्तूची किमत वाढते हे तत्व या वाळू व्यवसायाला देखील तितकेच लागू पडते.

त्यामुळेच वाळूसारख्या गोष्टीचा देखील काळाबाजार सुरु होतो. ज्या प्रमाणे लँडमाफिया हा शब्द खूप सगळ्या जमिनी स्वत:जवळ बाळगून असणाऱ्या माणसा बद्दल वापरला जातो त्याचप्रमाणे या वाळूचा अवैध धंदा करणाऱ्या माणसाला सुद्धा सँडमाफिया या नावाने ओळखले जाते.

भारतात अनेक शहरात, खेड्यात गावात नदी , नाले, ओढे या ठिकाणाहून अवैध वाळू वाहतूक चालू असते. खूप सगळ्या खाणीमधून अवैध वाळू उपसा चालू असतो ज्याला नियंत्रणात ठेवणे ही सरकार ची डोकेदुखी बनली आहे. यावरून वाळूसारख्या वस्तूचे महत्व आपल्या लक्षात येवू शकेल.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?