सर्वत्र चर्चेत असणारं “बिटकॉइन” हे डिजिटल चलन आहे तरी काय? समजून घ्या

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

अनादी काळापासून मानव हा देवाण-घेवाणसाठी विविध चलन वापरत आलेला आहे. आधी दगड, मग शंख-शिंपले नंतर धातू इत्यादीचा वापर चलन म्हणून व्हायचा. मानवाच्या प्रगती बरोबरच चलन आणि चलन व्यवस्थाही सुधारली, प्रगत झाली. आजच्या टेक्नॉलॉजी आणि डिजिटल जगात ती अजुन आधुनिक झाली नसती तरच नवल.

आजच्या डिजिटल जगाचं डिजिटल नाणं म्हणजे बिटकॉइन. खरंतर बिटकॉइन म्हणजे पहिलं डिजिटल चलन नाही.

 

bitcoin-marathipizza01
thesun.co.uk

बिटकॉइनच्या आधी १९९६ मधे पहिलं चलन आलं, ते होतं E-GOLD. नंतर २००६ मधे LIBERTY RESERVE नावाने चलन आलं. ही दोन्ही चलनं सेंट्रलाइज़्ड होती आणि हवाला कारभारासाठी वापरील गेली म्हणून ती लवकर बंद झाली.

बिटकॉइन हे पहिलं डिजिटल चलन जरी नसलं तरी ते अनेक बाबतीत पहिलं होतं. बिटकॉइन हे पहिलं डिजिटल चलन आहे जे वर्चुयल, डीसेंट्रलाइज़्ड आणि क्रिप्टोग्राफिक आहे.

जसं भारतात रुपये, अमेरिकेत डॉलर तसं डिजिटल चलन बिटकॉइन. बिटकॉइनचा वापर करून तुम्ही आज खूप काही खरेदी-विक्री करू शकता. Amazon सारख्या मोठ्या ऑनलाइन Retailer आणि Paypal सारख्या ऑनलाइन पेमेंट सिस्टम बिटकॉइन चा वापर करू शकतात. सध्या जगभरात १००,००० पेक्षा अधिक Merchants बिटकॉइन वापरतात.

 

bitcoin-marathipizza01
medium.com

बिटकॉइन मुळे बॅंक आणि इतर Financial Institutions ना खूप मोठा धोका निर्माण होत आहे. कारण, आज जर आपल्याला कोणताही व्यवहार करायचा असेल तर बॅंक आणि इतर financial सिस्टमच्या सहाय्याने ते शक्य आहे. आपल्या व्यवहाराबद्दल आपल्याला यासाठी मोठी फीस द्यावी लागते. बिटकॉइन नेमका यामधला कच्चा दुवा कमी करतं. जर व्यवहार माझ्या आणि तुमच्यामध्ये आहे तर बॅंकेला फीस का द्यायची? बिटकॉइनमुळे पियर ते पियर ट्रान्सफर करणं शक्य होतं. त्यामुळे Remittance हे सर्वात जास्त अफेक्टेड आहे.

जर मधे कोणी दुवा नाही तर मग याची विश्वासहर्ता कशी राहते ?

– तर आधी सांगितल्या प्रमाणे बिटकॉइन हे क्रिप्टोग्राफिक आहे. हे क्रिप्टोग्राफिक असताना ब्लॉकचेन चा उपयोग करतं. ज्याला कोणी सहज हॅक करू शकत नाही.

आणखी पुढे जाण्याआधी थोडा बिटकॉइनचा इतिहास समजून घेऊ.

बिटकॉइनच्या निर्मितीचे श्रेय ‘साटोशी नकामोटो’ ह्याला जातं. महत्त्वाचं म्हणजे, हा साटोशी कोण आहे हे कोणालाचा माहीत नाही. २००९ मधे त्यानी बिटकॉइनचा सोर्सकोड एका संकेत स्थळावर दिला होता. आता हा साटोशी कोणी एक व्यक्ती आहे, की एखादा ग्रूप ते अजुन तरी कोणालाचा माहीत नाही.

आता आपण बिटकॉइन कामकसं करतं ते समजून घेऊ.

बिटकॉइन हे खऱ्या अर्थानं डिजिटल चलनाचे गोल्ड स्टॅंडर्ड आहे. आपण गोल्ड/सोन्या बरोबर याची तुलना करून पाहुया.

सोनं जसं मौल्यवान आहे तसं बिटकॉइन सुद्धा खूप मौल्यवान आहे, ते कसं हे पाहुया.

 

bitcoin-marathipizza02
bitcoinclix.com

सोनं हे खणन करून काढलं जात आणि ते जगात खूप कमी ठिकाणी सापडतं. तसंच बिटकॉइनला सुद्धा खणन करून काढावं लागतं, अर्थात हे खणन डिजिटल असतं आणि विशेष सॉफ्टवेअर वापरुन ते करावं लागतं.

खणन करणार्‍या लोकांना बिटकॉइन माइनर्स म्हणतात.

हे बिटकॉइन माइनर्स खणना बरोबर सर्व देवाण-घेवाणीचा रेकॉर्ड देखील ठेवतात. हे रेकॉर्ड ब्लॉकचेनमधे असतात. (ह्या ब्लॉकचेबद्दल पुढे सविस्तर माहिती आहे.) खणनामधे एका तासाला ६ ब्लॉक निर्माण होतात. ज्या व्यक्तीला ब्लॉक सापडला, त्याला एका ब्लॉक मागे 12.5 बिटकॉइन सध्या भेटत आहेत.

 

bitcoin-marathipizza04
mining.com

 

या बिटकॉइन माइनर्सला खणलेले बिटकॉइन आणि त्यावर असणारी फीस भेटते. पण दर २१०,००० ब्लॉक्स नंतर बिटकॉइन भेटण्याची संख्या अर्धी होते. त्यामुळे नवीन बिटकॉइन हळू-हळू कमी होत जाणार आणि तासाला सहा ब्लॉक्स करता करता ई.स २१४० मधे २१ मिलियन राहणार. त्यामुळे बिटकॉइनची संख्या आणि निर्माण होणारे प्रमाण फिक्स्ड असणार आहे. आणि म्हणून –

पुरवठा मर्यादित – मागणी अमर्याद : ह्या Demand Supply तत्वामुळे बिटकॉइन खूप मौल्यवान आहे, असणार आहे.

 

bitcoin-marathipizza02
bitcoinmalaysia.com

व्यवहारामध्ये अजुन एक महत्वाचा नियम म्हणजे सप्लाय आणि डिमांड. सप्लाय संयमित असल्यामुळे जर डिमांड वाढली तर जसा सोन्याचा भाव वाढतो तसा बिटकॉइनचा भावही वाढतो. आज जवळ पास २००० डॉलर्सला १ असा भाव असणारा बिटकॉइन सर्वात पहिल्यांदा पिझ्झा घेण्यासाठी वापरला गेला. त्यावेळेस एका पिझ्झासाठी तब्बल २००० बिटकॉइन दिले गेले होते…!

आधी म्हटल्याप्रमाणे बिटकॉइन हे सोन्यापेक्षा सरस आणि बॅंकेपेक्षा विश्वसनीय ठरते ते ब्लॉकचेन मुळे. आपण आता हे ब्लॉकचेन काय गबाळ आहे ते पाहुया –

ब्लॉकचेन हे एक पब्लिक लेजर आहे आणि प्रत्येक १० मिनिटांनंतर त्यात नवीन ब्लॉक जोडले जातात. सोन्याला सरमिसळ करून विकतात, तशी ब्लॉकचेनमधे कोणतीही सरमिसळ करता येत नाही. कारण बिटकॉइनचा सर्व व्यवहार ब्लॉकचेनमधे आहे. कुठल्या हॅकरने जर नवीन ब्लॉक टाकायचा म्हटला, तर त्याला पूर्ण ब्लॉकचेन हॅक करावी लागते. जसा-जसा वेळ जाईल तसा ब्लॉकचेनची हॅकिंग खूप कठीण होत जाते.

ब्लॉकचेनला बिटकॉइनचा सॉफ्टवेर चालवणाऱ्या network वर ठेवण्यात येतं. प्रत्येक देवाण-घेवाण या network वर broadcast केली जाते. त्यामुळे फक्त एक लेजर असूनसुद्धा सर्व व्यवहार रेकॉर्ड केले जातात. Network चा प्रत्येक नोड/server वर कोणत्याही रेकॉर्डची वैधता तपासण्याची सोय असते. तपासणी झाली तर तो नोड त्याची नोंद करून घेतो आणि नंतर त्याला बाकी सर्व नोडवर पुन्हा broadcast करतो. अस करुन सर्व नोडवर ब्लॉकचेनची कॉपी असते.

 

bitcoin-marathipizza03
s-media-cache-ak0.pinimg.com

ब्लॉकचेन हे Distributed Database वर चालत असतं. दर तासाला ६ वेळा नवीन ब्लॉक आणि बिटकॉइनची ऍडिशन या ब्लॉकचेनला होते. त्याबरोबर प्रत्येक देवाण-घेवाण रेकॉर्ड होत असतेच. कॉपी बनत असल्यामुळे डबल स्पेंडिंगची तपासणी पण होते, त्यामुळे कोणीही डबल स्पेंडिंग करू शकत नाही. आपल बॅंक हे खर्चाची नोंद करतं, पण ब्लॉकचेन हे खर्च न झालेल्या बिटकॉइनची नोंद करतं.

जशी रुपयाची छोटी वॅल्यू ही पैसा आहे तशी बिटकॉइनची छोटी वॅल्यू ही मिलीबिटकॉइन आणि माइक्रोबिटकॉइन म्हणून ओळखली जाते. सर्वात छोटी वॅल्यू ही साटोशी(1 Satoshi= 0.00000001 ฿) म्हणून ओळखली जाते.

Ransomware अटॅकमुळे बिटकॉइनच्या नावाला काळिमा लागली आहे. ज्या लोकांनी Ransomware अटॅकमधे डेटा गमावला आहे, त्यांना डेटा परत मिळवण्यासाठी हॅकर्सनी बिटकॉइनमधे पैसे मागितले आहे, बिटकॉइन हे क्रिप्टोग्राफिक असल्यामुळे ह्या अटॅकमागे कोण आहे हे शोधणं खूप अवघड होणार आहे.

ह्या अटॅकचा आता तरी काही विशेष असा फरक़ पडलेला नाही, पण जर सरकारने काही नवीन निर्बंध नाही आणले तर पुढे जाऊन बिटकॉइन हे ३००० ते ४००० डॉलर पर्यंत मजल मारू शकतं. जगात खूप लोक व्यवहारासाठी नाही तर इनवेस्टमेंटसाठी देखील बिटकॉइन घेऊन ठेवत आहेत.

पुढे ज़ाऊन बिटकॉइन हे ग्लोबल चलन होणार असे ही एक्सपर्ट्स सांगत आहेत.

हे देखील वाचा : Bitcoin सारख्या डिजिटल करन्सी अर्थव्यवस्थेसाठी धोकादायक की विश्वासक?

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017  InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?