हा “बिहारी बाबू” थेट रशियातून, अन तेही पुतीनच्या पार्टीतून निवडून आलाय!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम

===

भारतीय व्यक्ती जगाच्या कुठल्याही कोपऱ्यावर जाऊन आपल्या नावाचा ठसा उमटवू शकते असं म्हटलं जातं. आजवर अनेकदा ते सिद्ध देखील झालं आहे.

शिकागोला धर्म संसदेत हिंदू धर्म संस्कृती मांडणारे स्वामी विवेकानंद असतील, दक्षिण आफ्रिकेत लोकांची चळवळ उभी करणारे महात्मा गांधी असतील किंवा ऑक्सफोर्डला जाऊन गणितात प्रबुद्ध संशोधन करणारे श्रीनिवासन रामनुजन असतील, ह्या सर्व भारतीय लोकांनी विश्वावर एक वेगळीच छाप पाडली.

आजही अनेक भारतीय आहेत जे विश्वाच्या कानाकोपऱ्यात राहून आपल्या भारतीय वंशाची छाप तिथल्या समाजावर टाकत आहेत. अगदी अश्याच प्रकारे एका बिहारी व्यक्तीने रशियात एक अचाट कामगिरी करून दाखवली आहे.

कुरस्क, नावाचं एक ठिकाण पश्चिम रशिया मध्ये आहे. हे एक शहर आहे जे अनेक ऐतिहासिक घटनांचं साक्षीदार राहिलं आहे.

 

kursk inmarathi
Pinterest

हे ते स्थान आहे ज्या ठिकाणी दुसऱ्या महायुद्धाला कलाटणी मिळाली होती. हे तेच शहर आहे जेथे 1943 साली हिटलरचा नेतृत्वाखाली असलेल्या जर्मन सैन्याचा पराभव झाला होत.

परंतु आम्ही तुम्हाला या शहराची महती व दुसऱ्या महायुद्धाचा काळा इतिहास सांगणार नसून तर याच शहरातील एका अश्या भारतीय वंशाच्या अभय कुमार सिंहच्या यशाची कहाणी सांगणार आहोत.

तर अभय कुमार सिंह हा मूळचा बिहारमधील पटण्याचा, जो आज रशियात एक राजकारणी झाला आहे. त्याने रशियात कुरस्क येथे निवडणुकीत विजय संपादन केला आहे.

आज तो पूर्ण कुरस्क शहरावर नियंत्रण ठेवतो. तो शहराचा कारभार सांभाळतो आहे. तो रशियात आमदारसदृश्य पदावर विराजमान आहे.

 

abhaysinghkursk-inmrathi
patnapost.in

चला तर जाणून घेऊयात अभय कुमार सिंहच्या पटना ते कुरस्कच्या थक्क करणाऱ्या प्रवासाबद्दल ..

पटण्याचा लोयला हायस्कूलमधून शिक्षण पूर्ण झाल्यावर अभय कुमार सिंह कुरस्क रशियाला मेडिसिनचा पदवी अभ्यासक्रम शिकायला गेला.

पदवी मिळाल्यानंतर, अभय भारतात परत आला आणि त्याने भारतात स्वतःचा वैद्यकीय व्यवसाय सुरू केला. परंतु त्याचा वैद्यकीय व्यवसाय अधिक काळ चालला नाही व तो अपयशी ठरला. यामुळे तो खचला होता.

आयुष्यात समोर कुठलाच पर्याय दिसत नव्हता व भविष्य अंधकारमय झालं होतं. अश्यावेळी त्याने कुरस्कला परत जाण्याचा निर्णय घेतला. त्याने कुरस्कला फार्मसीचा व्यवसाय चालू केला.

बघता बघता त्याला त्या व्यवसायात यश मिळत गेलं आणि काही दिवसांतच तो कुरस्क शहरातील काही प्रसिद्ध आणि प्रभावशाली व्यक्तीमत्वांपैकी एक झाला.

 

abhay-singh_inmarathi
amarujala.com

थोड्या कालावधीनंतर त्याने त्याचा व्यवसाय विस्तार करण्याचा निर्णय घेतला. त्याने रिअल इस्टेटच्या व्यवसायात पाऊल टाकले. या नव्या उद्योगाने त्याचे नाव शहराच्या बाहेर नेत रशियाच्या कानाकोपऱ्यात पोहचवले.

अत्यंत कार्यकुशलपणे त्याने रशियातील स्थानिक शक्तिशाली प्रस्थासोबत जवळीक निर्माण केली. स्थानिक पातळीवरील छोट छोट्या गोष्टीत अभय घेत असलेल्या उत्स्फूर्त स्वभावामुळे त्याचा मनातील राजकीय मनशा लपून राहत नव्हती.

पुढे व्हायचं तेच झालं, अभयने रशियातील प्रमुख सत्ताधारी पक्ष असलेल्या युनायटेड रशिया पार्टीचं सदस्यत्व स्वीकारलं आणि राजकारणात प्रवेश केला. या युनायटेड रशिया पक्षाशीच रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन संबंधित आहेत.

पुढे अभय कुमार सिंहने निवडणुकीत सहभाग घेतला आणि बहुमताने विजय मिळवला. एक भारतीय असून देखील त्याच्यावर व त्याचा कार्यकुशलतेवर रशियन जनतेने विश्वास दाखवला.

आज अभय कुमार सिंह एक डेप्युटेंट आहे. जी रशियातील एक मोठी राजकीय पदवी आहे. याची तुलना आमदार ह्या राजकीय पदाशी करता येते.

 

Abhay_Kursk_inmarathi
indiatoday.com

अश्याप्रकारे एक डोळे दिपवणारा प्रवास एका भारतीयाने स्वतःच्या हिमंतीवर केला.

एका दूरवरच्या प्रदेशात त्याने स्वतःचं अस्तित्व निर्माण केलं व त्या असंख्य भारतीयांचा यादीत स्वतःचं नाव सोनेरी अक्षरात कोरलं ज्यांनी जगाच्या इतर भागात जाऊन देशाचं व स्वतःचं नाव मोठं केलं होतं.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?