लॉकडाऊनमुळे क्रिकेट बंद आहे – पण क्रिकेटविषयीच्या या ६ अफलातून डॉक्युमेंट्रीज चुकवू नका!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

लॉक डाऊन.! जवळपास महिना होत आला.

वर्क फ्रॉम होम तर चालूच आहे.सोबत छंद सुद्धा जोपासले जात आहेत.कोण वाद्य शिकत आहे,कोण कथा-कादंबरी मध्ये गुंतलेल आहे,कोणी स्वयंपाक घरात वेगवेगळ्या डिशेस तयार करत आहेत!

आणि जवळपास सगळेचं वेब सिरीज,टीव्ही शोज आणि चित्रपटांचा आनंद घेत आहेत.

आपल्या पैकी काहींच जग हे क्रिकेट भोवती फिरत असत.

इलेक्ट्रॉनिक्स च्या दुकानाबाहेर तासन-तास उभं राहून काटे की टक्कर वाल्या मॅचचा रोमांच अनुभवला आहे. क्रिकबझ आणि स्मार्टफोन नव्हते तेव्हा १००.७ फ्रिक्वेन्सी सेट करून कान लावून प्रत्येक बॉल ची कॉमेंट्री ऐकली आहे.

 

indian cricket fans inmarathi
great lifezone

 

या आशिकीच्या प्रत्येकाच्या वेगवेगळ्या स्टोरी आहेत. कैक अशा घटना आहेत ज्या विसरणे अशक्य आहे. लॉक डाऊन सोबत जमावबंदी असल्यामुळे कॉलनीत देखील क्रिकेट खेळू शकत नाही.

तर, या कोरोना मुळे क्रिकेटची आठवण येतेय? काही तरी चुकचुकल्या सारख वाटत आहे? पुन्हा हातात बॅट आणि बॉल धरावी अशी कित्येकांची  इच्छा होत आहे.?

घाबरू नका! राहुल द्रविड जसा पिच वर नांगर टाकून दृढ उभा राहतो, तसचं आपल्याला या कोरोनाच्या परिस्थिती मध्ये उभं राहायचं आहे.

 

gully cricket inmarathi
playo

 

सोबत या क्रिकेट वर आधारित काही शोज, डॉक्युमेंटरी आहेत ते पण बघून घ्या. म्हणजे जेव्हा निराशेचे हे ढग निघून जातील तेव्हा मजबूत होऊन आपण बाहेर पडू.!

१.अ बॅट अँड बॉल वॉर (१९९९) : डायरेक्टर- टोनी डेव्हीस.

१९९८ मध्ये भारताने लाफिंग बुद्ध प्रोजेक्ट अंतर्गत राजस्थानच्या पोखरण मध्ये अणू चाचणी घडवून आणली. पाठोपाठ पाकिस्तान ने सुद्धा यशस्वी पणे चाचणी घेतली.

त्यामुळे द्विपक्षीय राजनैतिक संबंध हे ताणले गेले होते.

याच दरम्यान भारत-पाक क्रिकेट सिरीजचं आयोजन जानेवारी १९९९ मध्ये केले गेले.याच सिरीज च्या काही महिन्यांनंतर कारगिल युद्ध सुरू झालं.

तर, १९९९ च्या जानेवारी मध्ये वसीम अक्रमच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानी संघ भारतात आला. या पाकिस्तानी टीम ला एक प्रोडक्शन टीम फॉलो करत असते. थेट त्यांच्या ड्रेसिंग रूम पर्यंत.

बाळासाहेब ठाकरे यांच्या आक्रमक पाकिस्तान विरोधामुळे शिवसेना या सिरीजच्या आधी पासूनच विरोधात होती. सिरीजची दुसरी टेस्ट दिल्ली च्या फिरोजशहा कोटला वर होणार होती.

 

kargil war cricket inmarathi
india times

 

आणि कोटलाची पिच या सिरीज विरोधात खोदली गेली. परिणामी चार शिवसैनिकांना अटक झाली.

हे एवढं पुरे नव्हते म्हणून की काय स्टेडियम मध्ये परत साप सोडायची धमकी दिली गेली. तेव्हा पोलिसांनी या टेस्ट दरम्यान सर्प मित्रांची एक टीम पॅरलली स्टेडियम मध्ये खेळवलेली.

जे मॅच दरम्यान स्टेडियम मध्ये साप शोधायच काम करत असे.

याच दिल्ली टेस्ट मध्ये अनिल कुंबळे ने १० चे १० विकेट घेत ही मॅच अजरामर केली.

 

1999 match inmarathi

 

१९९९ ची ही टेस्ट सिरीज राजनैतिक शत्रुत्व आणि क्रिकेटप्रेमींनी दाखवलेल्या उत्स्फूर्त पाठिंब्यामुळे प्रसिद्ध झाली. या सिरीज वर बनलेल्या या डॉक्युमेंटरी ला संगीत नुसरत फतेह अली खान यांनी दिल आहे.

युट्युब वर ही सिरीज आपल्याला पाहायला मिळू शकेल.

 

२.फायर इन बेबीलोन (२०२०) : डायरेक्टर- स्टीव्हन रिले.

७०-८० च्या काळात आग ओकणाऱ्या गोलंदाजी तोफखाना खेळणाऱ्या वेस्ट इंडिज टीम च्या जडणघडणी वर ही डॉक्युमेंटरी आहे.

१९७४ ला क्लाइव्ह लॉइड यांच्या कडे विंडीज टीमचं नेतृत्व आलं. वेस्ट इंडिज चा संघ म्हणजे कॅरेबियन बेटांच्या वेगवेगळ्या समूहातून आलेले क्रिकेटपटू.

 

fire in babylon inmarathi
IMdb

 

या विविधांगी खेळाडूंना एका साच्यात बांधायचं काम केलं ते लॉइड ने.

आणि बघता बघता १९७५ चा पहिला वर्ल्ड कप विंडीज ने लॉइड च्या नेतृत्वाखाली जिंकला.!

पण, १९७५ च्या अंती झालेल्या वेस्ट इंडिज-ऑस्ट्रेलिया टेस्ट सिरीज मध्ये याच विश्वविजेता संघाला ५-१ अशा फरकाने सपाटून मार खावा लागला होता.

डेनिस लिली आणि जेफ थॉमसन यांच्या धारदार गोलंदाजीचं उत्तर विंडीज फलंदाजाकडे नव्हतं.

या पराभवानंतर लॉइड ची प्रतिक्रिया आली- “असं पुन्हा होणार नाही.!” आणि ज्या कारणामुळे आपला पराभव झाला त्यालाचं आपलं शस्त्र बनवायचं लॉइड यांनी ठरवलं.

बॅटिंग लाईन तगडी होतीच आता त्यांनी गोलंदाजीला धार द्यायला सुरुवात केली.

आणि लॉइड च्या याच प्रयत्नांना यश येऊन निर्माण झाली जगातल्या प्रत्येक संघाला आपल्या वेगाने सळो की पळो करणारी विंडीजचा तोफखाना.

मायकल होल्डिंग, अँडी रॉबर्ट, जोएल गोर्नर, कॉलीन क्रॉफ्ट यांना ‘खतरनाक चौकडी’ म्हणून क्रिकेट विश्वात संबोधले जाऊ लागले.

 

west indies bowlers inmarathi
ESPNcricinfo.com

 

विंडीज च्या सुवर्ण पर्वाचा पाया रचला गेला. १९७६ ला हाच विंडीज चा संघ इंग्लंड दौऱ्यावर गेला.

नुकताच ऑस्ट्रेलिया ने विंडीजचा सुपडा साफ केलेला. टोनी ग्रेगने त्याच तोऱ्यात विंडीजची अवस्था करू अशी कमेंट केली.

आणि झालं विरुद्ध! लॉइड ने आपल्या गोलंदाजीचा चेहरा मोहरा बदलेला. उंच आणि तेवढ्याच वेगवान चेंडूनी इंग्लिश फलंदाजांच्या तोंडाला फेस आणला.

विंडीज ने सुरू केलेल्या या वेगवान क्रिकेटमुळे क्रिकेटचं नुकसान होईल अशी आरोळी ब्रिटिश मीडियाने ठोकली.

विंडीज गोलंदाजाना ‘टेररिस्ट’ म्हणून संबोधले जाऊ लागले.

 

west indies inmarathi
cricket west indies

 

ही डॉक्युमेंटरी त्या अजेय विंडीज संघाची कथा आहे, जिने १९८० ते १९९५ पर्यंत एकही टेस्ट सिरीज हरली नव्हती. या डॉक्युमेंटरी मध्ये काही रियल फुटेज आहेत.

त्या काळातल्या दिग्गज खेळाडूंच्या मुलाखती आहेत. ही डॉक्युमेंटरी सुद्धा युट्युब वर उपलब्ध आहे.

 

३.द टेस्ट: अ न्यू एरा फॉर ऑस्ट्रेलियाज़ टीम (२०२०) : डायरेक्टर – एड्रीयन ब्राऊन.

 

the test series inmarathi
YouTube

 

मार्च २०१८. ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका टेस्ट सिरीज.तिसऱ्या टेस्ट चा तिसरा दिवस.

ऑस्ट्रेलियन खेळाडू कॅमरोन बँक्रोफ्ट बॉलवर पिवळा पेपर घासताना कॅमेरा मध्ये पकडला जातो. नव्या चेंडूवर तो पेपर घासून चेंडू जुना करण्याचा प्रयत्न तो करत होता.

क्रिकेटच्या कायद्याच्या भाषेत याला ‘बॉल टेम्परिंग’ म्हणतात.

तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तोपर्यंत मोठा तमाशा उभा राहिला होता. चौथ्या दिवसाचा खेळ सुरू होण्यापूर्वी ऑस्ट्रेलियाचे कर्णधार आणि उपकर्णधार बदलले गेले.

स्टीव्ह स्मिथ, डेव्हिड वॉर्नर, कॅमरोन बँक्रोफ्ट आपल्याच देशात व्हिलन झाले. बॉल टेम्परिंगच्या शिक्षेअंतर्गत तिघांवर निलंबनाची कारवाई झाली.

 

ball tampering inmarathi
sports news instant

 

याच काळात जस्टीन लँगर ऑस्ट्रेलियन संघाचा कोच तर टीम पेन कर्णधार झाला.यांच्या खांद्यावर क्रिकेट ऑस्ट्रेलियाची जबाबदारी आली.

क्रिकेट जेवढं मैदानात खेळत जात त्याही पेक्षा मैदानाच्या बाहेर खेळेल जात. २०१९ चा वर्ल्ड कप येई पर्यंत तिन्ही खेळाडूंच निलंबन संपलं होत.

स्पर्धेत डेव्हिड वॉर्नर सर्वाधिक धाव करण्याच्या यादीत भारताच्या रोहित शर्मा मागोमाग दुसरा होता. वर्ल्ड कपच्या दोन हफत्यानंतर अँशेस होती.

अँशेसच्या सुरवातीला खेळाडू सोडा स्टेडियम मध्ये सामना बघायला आलेले प्रेक्षक सुद्धा स्लेजिंग करत होते. या सगळ्या गोंधळात आपली छाप सोडली ती स्टीव्ह स्मिथ ने!

 

steve smith inmarathi
the Australian

जवळपास संपूर्ण इंग्लंड स्टीव्ह स्मिथ ला बाद करायला नवीन नवीन पद्धत शोधत होते.

अमेझॉन प्राईम वर असलेली ही आठ एपिसोडची सिरीज सांगते, क्रिकेट खेळणारे खेळाडू सुद्धा आपल्यासारखेच हसतात, तणाव घेतात आणि रडतात सुद्धा.!

क्रिकेटचा मानवी चेहरा ही सिरीज उघड करते.

 

४.क्रिकेट फिव्हर- मुंबई इंडियन्स (२०१९)

आयपीएल मिस करत आहात? थोडीफार कसर ही सिरीज भरून काढेल.

प्रोड्युसर- कोंडे नेस्ट इंटरटेनमेंट कंपनी. मुंबई इंडियन्स-आयपीएल मधली सगळ्यात महागडी आणि यशस्वी टीम.!

२०१८ च्या सिजन मधली मुंबई इंडियन्सची सफर या सिरीज मध्ये रेखाटली आहे.

 

mumbai indians inmarathi
financial express

 

वेगवेगळ्या वातावरण,संस्कृती मधून आलेले खेळाडू एकमेकांशी ताळमेळ ठेवण्यात कसे धडपड करत असतात आणि तेच करता करता एक टीम म्हणून मैदानात खेळायला त्यांना सुख मिळत नाही.

फ्रॅंचाईज लीग मध्ये प्रयोग करायला अजिबात वेळ आणि परिस्थिती नसते. दुखापत ही खेळाडूला अजिबात परवडणारी नसते.

संघाच्या प्लेइंग ११ मध्ये असताना जर दुखापत झाली की संघातली जागा गमवण्याचे चान्सेस जास्त असतात.

२०१८ मध्ये मुंबई लीग स्टेज मध्येच स्पर्धेतून बाहेर पडलेली. २०१९ मध्ये जबरदस्त कमबॅक करत मुंबईने टायटल आपल्या नावावर केलं होतं.

 

cricket fever inmarathi
the digital hash

 

नेटफ्लिक्स वर उपलब्ध असलेली ही सिरीज मुंबई इंडियन्सचा संघ म्हणून असलेला प्रवास खेळाडू,मॅनेजमेंट,फॅन यांच्या दृष्टिकोनातुन पाहायला मिळेल.

 

५. आऊट ऑफ द अँशेस (२०१०) डायरेक्टर – टिमोथी अल्बोन, लूसी मार्टिन्स, लेजली नॉट

मराठीत सांगायचं झालं तर एकलकोंड्या परिस्थिती मधून बाहेरची कथा!

अफगाणिस्तान, अनेक दशके युद्धाने ग्रस्त. बॉम्बस्फोट,सुसाईड बॉम्बिंग,ड्रोनहल्ले हे इथल्या रोजच्या जीवनाचा अंग.अशातच या देशाने क्रिकेट मध्ये आपला आनंद शोधला.

आणि याच आनंदाच्या मागावर एक कॅमेरा क्रु सलग दोन वर्षे अफगाणिस्तानच्या क्रिकेट यात्रेवर होता.

 

out of ashes inmarathi
facebook

 

ही डॉक्युमेंटरी अफगाणिस्तानची २०१० ची आयसीसी टी२० चषक क्वालिफाय करायची कथा आहे. दहशतीने ग्रासलेल्या देशाला आनंद साजरा करायला कसा चान्स मिळाला.

अफगाणिस्तान क्रिकेटच्या उदयाची ही कहाणी आहे. जेव्हा खेळाडू आणि कोच ने एक स्वप्न पाहिल तेव्हा त्यांच्या कडे खेळायला स्वतःचे असे मैदान नव्हते.चांगल्या क्वालिटीचे स्पोर्ट्स इक्विपमेंट नव्हते.

पण, खेळायची जिद्द होती. सुविधा नव्हत्या पण त्याबद्दल तक्रारसुद्धा नव्हती.!

स्पर्धेनंतर जेव्हा अफगाणी क्रिकेट संघ मायदेशी परतला, तेव्हा काबूलच्या रस्त्यावर अफगाणी जनतेने एकच गर्दी केली होती. अफगाणिस्तानसाठी हा एक सुखाचा क्षण होता.

ही डॉक्युमेंटरी युट्युब वर आपण पाहू शकतो.

 

६.बॉडीलाईन- इट्स नॉट जस्ट या क्रिकेट. (२००२) : डायरेक्टर-लिंकन टेलर

१९३२-३३ मध्ये इंग्लंडचा संघ अँशेस खेळण्यासाठी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेली. ब्रिटिश कर्णधार होता डग्लस जॉर्डन तर ऑस्ट्रेलियाचा होता बिल वुडफॉल.

या सिरीज मध्ये सगळ्याच लक्ष होत २४ वर्षीय डोनाल्ड ब्रँडमन वर. १९३० च्या अँशेस मध्ये ब्रॅडमन ने विक्रमी ९७४ धावा ठोकलेल्या.

ही सिरीज ऑस्ट्रेलिया ने २-१ ने जिकलेली.

 

sir donald bradman inmarathi
yahoo news

 

आणि याचा बदला घ्यायच्या इराद्याने इंग्लिश संघ ऑस्ट्रेलिया मध्ये दाखल झाला. ब्रॅडमन ला रोखण्यासाठी ब्रिटिश तयारीत आलेले. दोन हत्यार सोबत आणलेले.

बिल वोक आणि हेराल्ड लारवूड.

या दोघांना सक्त ताकीद दिली गेलेली, बॅट्समन ला निशाणा बनवून लेग साईडला बाऊन्सर फेकायचा.उसळता बॉल डॉच करायच्या प्रयत्नात बॅट्समन कट आणि आऊट होईल.

क्रिकेटच्या टेक्निकल लँग्वेज मध्ये याला बॉडीलाईन बॉलिंग म्हणतात.

 

bodyline inmarathi
the movie database

 

कांगारू याच्या साठी तयार नव्हते.आणि त्यांचे बरेचसे खेळाडू जखमी झाले.ब्रिटिशांवर जेंटलमेन्सचा खेळ कलंकित करण्याचा आरोप लागला.

वाद एवढा टोकाला पोहोचला की दोघा देशांच्या राजनैतिक संबंधावर पण त्याचा परिणाम झाला. ऑस्ट्रेलियन कर्णधार बिल वुडफॉल एका खाजगी मीटिंगमध्ये म्हणाला,

‘इथे फक्त एकच संघ खेळत आहे,आणि तो इंग्लंडचा संघ नव्हे.’

या वक्तव्यानंतर तर वेगळंचं वादळ उठलं. युट्युब वर उपलब्ध असलेली ही डॉक्युमेंटरी क्रिकेट आणि राजकारण यांचा एक संगम आहे.

क्रिकेटच्या इतिहासातील सगळ्यात विवादित असलेल्या या सिरीजची कथा क्रिकेट प्रेमींसाठी नक्कीच रोचक असेल.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?