अनेक आरोग्याच्या समस्यांवर सर्वात सोपा उपाय : फ्रीजऐवजी माठात ठेवलेले पाणी प्या

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page

===

नुकताच उन्हाळा लागला आहे. त्यामुळे सर्वांचीच घरी आल्यावर सध्या एकाच दिशेने धाव असते आणि ती म्हणजे फ्रीजकडे. दिवसभराची धावा-धाव केल्यानंतर जेव्हा घरी येतो तेव्हा हवं असत ते केवळ एक ग्लास फ्रीजचं थंडगार पाणी. जसं काही ते अमृतच…

 

fridge-inmarathi07
statefarm.com

तुम्हाला तुमच्या लहानपणीचे दिवस आठवतात. तेव्हाही असाच उन्हाळा असायचा, तेवढच सूर्याच प्रखर तेज असायचं. पण तेव्हा नव्हता तो फ्रीज. पण कधी तुम्हाला ह्या फ्रीजची कमतरता जाणवली नसेल कारण तेव्हा प्रत्येक घरात असायचा तो देशी फ्रीज म्हणजेच आपला मातीचा माठ… ज्यांनी ज्यांनी त्या मातीच्या माठातील पाण्याची चव घेतली असेल, त्यांना नक्की त्या पाण्यातील गोडवा आठवला असेलं. आज भलेही फ्रीजमध्ये पाणी जास्त थंड होत असलं, तरी त्याला माठाची मजा नाही.

 

maticha maath-inmarathi
newstracklive.com

पण ह्या मातीच्या माठातील पाण्याचा एवढाच उपयोग आहे का? तर नाही. मातीच्या माठातील पाण्याचे आपल्या शरीराला अनेक फायदे होतात. दुसरीकडे ह्या फ्रीजच्या पाण्याचे फायदे तर नाही पण तोटेच जास्त आहेत.

माठ हा पाण्याला नैसर्गिक पद्धतीने थंड करतो. पण ह्याचा एवढाच फायदा नाही तर, माठातील पाणी पिल्याने हृदया संबंधित रोग होण्याची शक्यता कमी असते.

 

maticha maath-inmarathi01
ayurvedforlife.com

आजकाल सर्वांनाच अॅसिडिटीचा त्रास होतो. आपले पचन व्यवस्थित झाले नाही की, आपल्याला अॅसिडिटी होते. पण माठातील पाणी पिल्याने आपण ह्या समस्येपासून दूर राहू शकतो. माठातील पाण्यात काही नैसर्गिक मिनरल्स असतात जे अॅसिडिटी होण्यापासून आपला बचाव करतात.

जेव्हा आपण बाहेरून येतो तेव्हा लगेच आपण फ्रीज उघडतो आणि फ्रीजमधील थंड पाणी पितो. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की, हे फ्रीजच थंड पाणी पिणे खरच आरोग्याच्या दृष्टीने चांगले आहे? तर ह्याचं उत्तर नाही आहे. फ्रिजच्या पाण्याने तुम्हाला सर्दी-खोकला लवकर होण्याची शक्यता असते. त्यामुळे माठातील पाणी पिणे हे कधीही चांगले.

 

maticha maath-inmarathi02
infomagic.com

ज्यांना श्वसना संबंधित आजार असतात त्यांच्यासाठी माठातील पाणी हे खरच फायद्याचे ठरते.

एवढच काय तर कोणाला लकवा मारला असेल तर त्यांच्यासाठी देखील माठातील पाणी पिणे फायद्याचे आहे. तर रोज माठातील पाणी पिल्याने तुम्ही ह्या आजारापासून बचावू शकता.

आपल्याला नेहेमी असे वाटत असते की, फ्रिजच्या थंड पाण्यानी आपल्याला छान वाटते, त्याने आपली तहान मिटते. पण असं नाहीये ह्या फ्रिजच्या पाण्याचे अनेक नुकसानकारक असे परिणाम आहेत.

 

maticha maath-inmarathi03
ayurvedforlife.com

जेवल्यानंतर फ्रीजचे पाणी प्यायल्याने आपली पचन प्रक्रिया संथ होते. ह्याचा अतिशय वाईट परिणाम हा आपल्या मेटाबॉलिजमवर होतो. ज्यामुळे आपल्या शरीरात फॅट जमा होऊ लागतं. फ्रीजचे पाणी प्यायल्याने रक्त पेशी ह्या आकुंचन पावतात. त्यामुळे पाचन प्रक्रिया संथ होते. त्याचा परिणाम म्हणजे बद्धकोष्ठता, आंबट ढेकर येणे, गॅस होणे इत्यादी समस्या उद्भवतात.

रक्त पेशी आकुंचन पावल्याने हृदयाला रक्त पंप करण्यासाठी अधिक मेहनत करावी लागते. ज्यामुळे हृदयावरील प्रेशर वाढते आणि त्यामुळे हार्टबीट कमी होते.

फ्रीजमधील थंड पाणी प्यायल्याने शरीराचे तापमान अचानक बदलते. ज्याचा वाईट परिणाम अपल्या मेंदूवर होतो. त्यामुळे अनेकदा आपल्याला डोकेदुखीच्या समस्येचा सामना करावा लागतो.

तेव्हा आता तुम्हीच ठरवा तुम्हाला फ्रीजचे पाणी पिऊन आजारी व्हायचं आहे की माठातील पाणी पिऊन निरोगी राहायचे आहे…

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?