हे आहेत यंदाचा आयपीएल सिझन गाजवणारे पाच ‘सुपरस्टार’ खेळाडू!

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page

===

यंदाच्या आयपीएलने आता अर्धा प्रवास संपवला आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाची आयपीएलसुद्धा खूप भव्यदिव्य झाली आहे, आयपीएलचा हा ११ वा सीझन आहे. आयपीएलमध्ये जगभरातील उत्कृष्ट खेळाडू भाग घेतात व आपला बेस्ट परफॉर्मन्स देण्याचा पुरेपूर प्रयत्न करतात. आजवरच्या परफॉर्मन्सच्या आधारावर आम्ही तुम्हाला यंदाच्या आयपीएलच्या ५ सुपर खेळाडूंची नाव व माहिती तुम्हाला देणार आहोत, ज्यांनी त्यांचा चमत्कारिक खेळाने क्रिकेट रसिकांची मने जिंकली आहेत आणि स्वतःला सिद्ध केले आहे.

त्यांचं हे यश खूप मेहनतीने नाही तर अत्यंत आरामात त्यांनी मिळवले आहे. उत्कृष्ट खेळाडूंची ती ओळखच आहे की ते कुठलीही कामगिरी एकदम आरामात करतात.

तर यंदाच्या आयपीएलचा पहिला उत्कृष्ट माचो खेळाडू आहे, ज्याने नेहमी आपल्या चमकदार कामगिरीने क्रिकेट रसिकांची मने जिंकली आहेत असा कॅरेबियन फलंदाज ख्रिस गेल! दरवर्षी गेल वादळ स्टेडियममध्ये येत आणि विरोधी संघाच्या गोलंदाजांचा धुवा उडवून जातं असा अनुभव नेहमीच प्रेक्षकांना येत असतो. यंदा ही तो अनुभव क्रिकेट रसिकांना आला. एरवी रॉयल चालेंजर बंगलोर या संघाचा खेळाडू असलेला गेल प्रथमच किंगस इलेव्हन पंजाब संघाकडून खेळत आहे.

 

firstpost.com

यंदाच्या आयपीएल 18 सीजनचं पहिलं शतक ख्रिस गेलने आपल्या नावावर केलं आहे. 63 बॉल मध्ये 104 रन नॉट आउट काढण्याचा विक्रम त्याने आपल्या नावे केला आहे. ख्रिस गेलच्या या धडाकेबाज फलंदाजी कडे बघून अजिबात जाणवलं नाही की तो हे तणावाखाली वा ताकद लावून खेळतो आहे. त्याने हे शतक अगदी आरामात केलं. या सामन्यात किंग्ज इलेव्हन पंजाब 15 धावांनी विजयी झाले. गेलने या सामन्यात तब्बल 11 षटकार लगावले होते.

दुसरा माचो खेळाडू आहे, चेन्नई सुपर किंग्जचा युवा सलामीवीर अंबाती रायडु. या सीझनमध्ये सर्वात आधी ३०० रन्सचा टप्पा रायडु ने ओलांडला असून, 8 सामन्यात आता पर्यंत 370 रन्स बनवले आहेत. यात त्याचा उच्चतम स्कोअर 82 रन आहे आणि त्याने ही कामगिरी अगदी आरामात केली आहे. कोणाला त्याच्या या अचाट कामगिरीचा सुगावा देखील लागला नाही.

 

ambati-roydu-csk-inmarathi
business-standard.com

त्याने कधी ऑरेंज कॅप घातली हे सुद्धा कळालं नाही इतक्या आरामात त्याने ही कामगिरी केली आहे. आंबती 2010 पासून आयपीएल खेळत असला तरी यंदा त्याचा फलंदाजीला आलेला बहर आणि नियमितपणा लोकांना मंत्रमुग्ध करत आहे.

या यादीचा तिसरा माचो मॅन आहे दक्षिण आफ्रिकेचा धडाकेबाज फलंदाज आणि रॉयल चॅलेंजर बंगलोरचा स्टार खेळाडु ए.बी. डिविलियर्स. 360 अंशात फटकेबाजी करणाऱ्या डिविलीयर्सने आतापर्यंत 6 सामन्यात 280 रन्स बनवले असून, त्याने 184 चा स्ट्राईक रेट कायम ठेवला आहे! त्याचा यंदाच्या मोसमातील सर्वोच्च स्कोअर हा नाबाद 90 रनांचा आहे.

 

business-standard.com

या मोसमात त्याने 3 हाफ सेंच्युरी केल्या असून, तब्बल 23 शानदार सिक्स मारले आहेत. 2016 साली देखील त्यांनी उत्कृष्ट फलंदाजीचा नमुना दाखवत प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले होते त्यावेळी त्याने तब्बल 687 रन्स बनवले होते. यंदा असं वाटत आहे की तो स्वतःचा रेकॉर्ड मोडणार!

यंदाच्या मोसमातला सर्वात बहारदार खेळ खेळणारा व बऱ्याच कालावधी नंतर क्रिकेट रसिकांना आपल्या फलंदाजी ने मंत्रमुग्ध करणारा खेळाडू आहे भारताचा माजी कर्णधार आणि कॅप्टन कुल महेंद्रसिंग धोनी! यंदाची आयपीएल धोनीसाठी खूप खास आहे. आजवर धोनीने 166 आयपीएल सामने खेळले असून चेन्नई सुपर किंग्जचा कप्तान असलेल्या धोनीचा खेळ यंदाच्या मोसमात चांगलाच बहरला आहे.

 

dhoni-inmarathi
indianexpress.com

7 सामन्यात धोनीने 235 रन्स बनवले असून यात 2 अर्धशतकांचा समावेश आहे. धोनीचा सर्वाधिक स्कोअर हा नाबाद 79 रन्स चा असून, हा त्याचा आयपीएल मधला उच्चांक आहे. धोनीच्या या लाजवाब प्रदर्शनामुळे चेन्नई सुपर किंग्ज अंकतालिकेत पहिल्या चार स्थानांमध्ये आहे.

यंदाच्या आयपीएलचा शेवटचा पण एक लहान पण महान अशी कामगिरी करणारा खेळाडू आहे, दिल्ली डेअरडेविल्स चा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ट. परंतु त्याची ही कामगिरी गोलंदाजी मुळे नव्हे तर त्याचा उत्कृष्ट क्षेत्ररक्षणाच्या कलेमुळे व रॉयल चॅलेंजर बंगलोर विरुद्धच्या सामन्यात विराट कोहलीच्या पकडलेल्या अप्रतिम कॅच मुळे आहे.

 

indianexpress.com

सामन्याचा अकराव्या ओव्हर मध्ये हर्षल पटेल च्या बॉल वर विराट कोहलीने उत्तुंग फटका मारला. तो बॉल सीमारेषेपार जाणार असं सर्वांना वाटत असतांना ट्रेंट बोल्टने उत्कृष्ट क्षेत्ररक्षण करत तो बॉल एखादया सुपर खेळाडू प्रमाणे हवेत स्वतःला झोकून देत एका हातात अगदी अविश्वसनियरित्या झेलला. यामुळे उसळणाऱ्या बंगलोर स्टेडियम मध्ये स्मशान शांतता पसरली होती , त्याचा या माचो कामगिरी मुळे प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले होते. या बरोबरच ट्रेंट बोल्टने गोलंदाजीत देखील उत्कृष्ट कामगिरी केली असून त्याने 9 सामन्यात 13 विकेट घेतल्या आहेत.

अश्याप्रकारे खेळाडूंच्या जोरदार कामगिरी मुळे यंदाची आयपीएल अधिक मनोरंजक झाली आहे.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?