पाकच्या तरुणाच्या “माझ्या भारतीय बांगलादेशी भावांना कशी मदत करू?” प्रश्नाला भारतीयाचं “कडक” उत्तर!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर

===

Quora या संकेतस्थळावर लोक प्रश्न विचारत असतात आणि इतर लोक त्या प्रश्नांची त्यांचापरीने समर्पक उत्तर देण्याचा प्रयत्न करत असतात परंतु काही वेळा काही लोक अत्यंत खोडसाळ पध्दतीने याचा वापर व दुसऱ्याला डिवचण्याचा प्रयत्न करतात. तसाच काहीसा प्रकार काही दिवसांपूर्वी Quora वर घडला, एका पाकिस्तानी नागरिकाने खोडसाळ प्रश्न विचारला की

“पश्चिम बंगाल ला भारतापासून स्वतंत्र करण्यासाठी मी माझ्या बंगाली बांधवांना कशी मदत करू शकतो ?”,

 

vlasti.net

पाकिस्तानी खोडसाळ प्रवृत्तीला अनेक लोकांनी समर्पक उत्तरं देण्याचा प्रयत्न केला पण एका भारतीय बंगाली तरुणाने एकदम जबरदस्त उत्तर दिलं.

तीर्थदीप दास, असे त्या तरुणाचे नाव आहे. तो कोलकत्याचा निवासी आहे. पाकिस्तानी नागरिकांच्या खोडसाळ प्रवृत्तीवर उत्तर देताना तीर्थदीप म्हणाला की


“तुझ्या ( पाकिस्तानी नागरिकाच्या) प्रश्नाचं उत्तर देऊ शकेल असं कोणीतरी आहे”.

मग त्याने अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा उल्लेख केला आणि म्हटले की

“माझ्या माहितीप्रमाणे डोनाल्ड ट्रम्प हे जगातील सर्वात शक्तिशाली व्यक्ती आहेत आणि त्यांनी नेहमी मानवते विरुद्ध चाललेल्या दहशतवादाविरुद्ध भूमिका घेतली आहे. ते नक्कीच तुझ्या बलुचिस्तान आणि बंगाल मधील भावंडांना सोडवू शकतील.

मी पश्चिम बंगालच्या राजधानीत राहतो. इथे मी बेकायदेशीर बांगलादेशी घुसखोर व पाकिस्तानी लोकांनी बंधुत्व टिकवण्यासाठी घातलेल्या धुमाकुळाची रोज अनुभूती घेत असतो.”

 

Donald Trump
politifact.com

यावरच न थांबता तीर्थदीप भारताच्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांचा उल्लेख करत म्हणाला की

“जर कोणी तुला मदत करत नसेल तर तू यांचाकडे ट्विटर वर मदत मागू शकतो, त्या सर्वांना मदत करतात.

“यानंतर तीर्थदीप म्हटला की “जर यापैकी कोणीच मदत करू शकलं नाही तर तू Quora या पेजचा वापर करून जगाच्या घडामोडींची माहिती घे, नुसतं पाकिस्तानी सैनिकी शाळेत शिकवल गेलं आहे तेव्हढाच समज नको बाळगू ,अर्थात रक्तपात करणे आणि जे इस्लाम मानत नाही त्यांची काफिर म्हणून हत्या करणे”.

त्यानंतर तीर्थदीप Anti Pakistani Sentiment ही विकिपीडियावरचा लिंकचा उल्लेख केला व पुढे उत्तर देत म्हणाला,

“मी स्वतः बंगाली आहे. तू ज्या स्वातंत्र्याची गोष्ट करतोय ते मला आधीच भेटलं आहे. जर तुला स्वतंत्र हवंच आहे तर ते पाकिस्तानी सैन्याकडून घे, वाटल्यास 1965 ,1971 , 1999 ( कारगिल युद्ध) यांचा अभ्यास करून घे. प्रेम, एकात्मतेचा संदेश दे आणि दिशाहीन राष्ट्र चळवळी सोड ज्याला जगभरात दहशतवाद म्हटलं जातं. ह्याची तुला नक्कीच मदत होईल. आम्ही तुमचे शत्रू नाही आहोत. धन्यवाद”.

तीर्थदीप च्या या उत्तराला बरीच प्रसिद्धी मिळाली असून , Quora वर २० हजाराहून अधिक लोकांनी त्याचं उत्तर वाचलं आहे. अनेकांनि Upvote करून त्याचा उत्तराला पाठिंबा दर्शवला आहे व पाकिस्तानमध्ये बसून भारताचे विभाजन करण्याचे मानस असणाऱ्यांना चांगला कडक संदेश ह्या तरुणाकडून मिळाला आहे व पाकिस्तानच्या नापाक इराद्यानां जागतिक स्तरावर प्रसिद्धी मिळाली असून यामुळे पाकिस्तानी प्रश्नकर्त्याची नाचक्की झाली आहे.

(Quora वरील मूळ चर्चेची लिंक)

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *