2015चे 5 सर्वोत्तम animated चित्रपट

आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

===


आपल्याकडे (म्हणजे भारतात) तसा animated movies साठी म्हणावा तेवढा प्रेक्षक वर्ग नाहीये. भारतात या movies कडे लहान मुलांच्या movies म्हणून बघितल्या जातं. परंतु त्यामध्ये खूप काही शिकण्यासारखं असतं. एक वेगळाच भन्नाट असा concept असतो जो animators च्या imaginary परंतु मनाला भिडेल अश्या दुनियेतून साकारलेला असतो.

बोलू या, ह्या वर्षी आलेल्या अश्याच 5 animated Movies बद्दल. जरूर बघा – तुम्हालाही आवडतील!

 

1 –  Inside Out

एक अतिशय सुंदर concept . एक छोटीशी मुलगी एका नवीन शहरात राहायला parents बरोबर येते आणि तिथल्या वेगळ्या वातावरणामुळे सगळंच बदलतं…right from नवीन घर ते school…आणि मग तिच्या मनातले सगळे emotions – राग, लोभ, आनंद , भीती, दुखः – हे सगळे तिच्या मेंदू मध्ये कसे काम करतात, याची सुंदर सांगड घालून बनवलेली कलाकृती.

 

INSIDE-OUT-18

 

चित्रपटाच्या शेवटी – जिवनात जसं आनंदाचं महत्वाचं स्थान आहे, तसंच दुखःसुद्धा महत्वाचं आहे  – हा message फार powerfully दिलाय.

 

2 – The Little Prince

Animators च्या डोक्यातली अजून एक भन्नाट कल्पना. एका लहान मुलीची कथा. तिला चांगली शाळा मिळावी म्हणून तिची आई घर बदलते. नवीन घराच्या शेजारी एक म्हातारा राहत असतो. तो कुणालाच आवडत नसतो – कारण तो mechanized life न जगता दिलखुलास जगत असतो.

 

the-little-prince_1sheet_20-041

 

ह्या मुलीच्या नकळत तिचं ह्या आजोबाशी नातं जुळतं. म्हातारबा आजारी पडल्यावर त्याने सांगितलेली एक परीची अपूर्ण गोष्ट पूर्ण करण्यासाठी ह्या मुलीने केलेली धडपड मनाला भावून जाते.

 

3 – Home

एका परग्रहवासीयाने पृथ्वीवरील एका लहान मुलीशी केलेल्या friendshipची गोष्ट. हा एलिएन तिला इथल्या समस्या resolve करण्यासाठी मदत करायला सुरुवात करतो.


 

Home-2015-Movie-Wallpapers-HD-Download-01

 


या movie मध्ये, अलिएन्स actually पृथ्वी नष्ट करण्याच्या हेतूने आलेले असतात आणि ते तसं करायला सुरु पण करतात. पण आपली छोटीशी नायिका, एका एलियनसोबत गट्टी जमवून पृथ्वी वाचवते. Story जरी नेहमीचीच वाटत असली तरी सादरीकरण खूप सुंदर आहे.

 

4 – World of Tomorrow

 

एक short film आहे, फक्त 17 minutesची. अतिशय सुंदर. Future मध्ये आपले clones असतील आणि तेच आपलं अस्तित्व टिकवून ठेवतील…अशी ही concept. हा मनुष्याचा जिवंत राहण्याचा एक प्रकारचा प्रयत्न आहे. एक clone, futureमधून एमिली परिमे नावाच्या छोट्याश्या मुलीला contact करतो — जो तिचाच भविष्यातील clone असतो!

 

world of timorrow

 

तो तिला भविष्यात घेऊन जातो आणि काय काय झालंय ते सांगतो. अतिशय वेगळ्याच प्रकारची मांडणी आहे. खूप मोठी concept फक्त 17 minutes मध्ये खूप छान रंगवलीये. नक्की बघा…!

 

5 – Shaun the Sheep

प्राण्यांच्या “काम नं करण्याच्या” सवयीवरची एक अतिशय सुंदर कलाकृती!

 

Shaun_the_Sheep_title

 

Shaun नावाची एक मेंढी असते. Shaun, बाकीच्या प्राण्यांबरोबर मिळून त्याच्या मालकाला (शेतकऱ्याला) झोपवण्याचा plan बनवते – जेणेकरून तो ह्यांना जास्त काम देणार नाही. ते ह्यात यशस्वी पण होतात…! परंतु या सगळ्या गोंधळात त्यांचा मालक दुसऱ्याच city मध्ये transport होतो आणि मग यांची धांदल उडते. मग तेच सगळे प्राणी मिळून, त्यांच्या मालकाला परत आणतात याची कहाणी. Theme जरी simple वाटत असली तरी मांडणी खूप छान आहे.

 

Animated movie किंवा “कार्टून फिल्म” म्हणजे लहान मुलांचे पिक्चर – हा समज बाजूला ठेऊन ह्या लिस्टमधली कुठलीही एक movie बघा.

तुमचं मत बदलल्याशिवाय रहाणार नाही!


लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi
Abhijeet Panse

Author @ मराठी pizza

abhijit has 34 posts and counting.See all posts by abhijit

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?