बर्म्युडा ट्रँगलबद्दल खूप वाचलंत, आता अंतराळातील आश्चर्यकारक ट्रँगल बद्दल जाणून घ्या

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page

===

बरमुडा ट्रँगल हे एक असे रहस्य आहे ज्याचा उलगडा लावण्याचा प्रयत्न बऱ्याच वर्षांपासून कितीतरी संशोधकांनी केला आहे. आणि ते आजही सुरु आहे. पण हे एक असं कोडं आहे जे सुटता सुटत नाही. बरमुडा ट्रँगल हे अटलांटिक महासागरातील एक असे ठिकाण आहे, जिथे रहस्यमयी प्रकारे विमान आणि जहाज गायब होऊन जातात.

 

bermuda-triangle-mystery-marathipizza01

 

हे तर झालं पृथ्वीवरील, पण तुम्हाला माहित आहे का की अंतराळात देखील असे एक ठिकाण आहे, ज्याला बरमुडा म्हटलं जातं. ह्या ठिकाणाच्या जवळून गेल्यावर देखील अंतराळ वीरांना विचित्र अनुभव येत असल्याचं ते सांगतात. त्या परिसरातून जाताना अंतराळयानातील सिस्टीम आणि कॉम्पुटर मध्ये अचानकपणे बिघाड येतो. यावेळी अंतराळवीरांना विशिष्ट प्रकारच्या घातक प्रकाश किरणांचा सामना करावा लागतो.

नासा येथील अंतराळवीर राहिलेले टेरी वर्ट्स सांगतात की, त्यांना त्यांच्या पहिल्याच स्पेस मिशनमध्ये याचा अनुभव आला होता. ते झोपायला जात असताना अचानकपणे डोळ्यांवर प्रकाश किरणे पडली. हे सर्व बघून त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला.

अंतराळवीर बनण्याआधीच त्यांनी याबाबत वाचले होते. त्यांना हे माहित होतं की अंतराळात एक असे ठिकाण आहे, ज्याला अंतराळातील बरमुडा म्हटलं जातं. आपल्या दोन्ही स्पेस मिशनमध्ये टेरी ह्यांना हा अनुभव आला.

आता नेमके हे ठिकाण कुठे आहे ते बघूया. हे ठिकाण दक्षिण अटलांटिक महासागर आणि ब्राझीलच्या वर अंतराळात आहे. ह्या परिसरातून किंवा जवळून जेव्हा कधी कुठल अंतराळयान किंवा स्पेस स्टेशन जातात तेव्हा ते कॉम्पुटर रेडीएशनला बळी पडतात. आणि अंतराळवीरांना प्रखर प्रकाशाचा सामना करावा लागतो.

हा पण ह्यामागे काही वैज्ञानिक कारणं देखील आहेत.

सूर्यापासून अखंड प्रखर आणि ज्वलंत किरण येतात. त्यांच्यात इलेक्ट्रॉन्स असतात आणि रेडीएशन देखील होत असते. जेव्हा ह्या रेडीएशन सूर्यापासून आपल्या पृथ्वीकडे येत असतात तेव्हा पृथ्वीभोवती असणारा एक थर ज्याला वॅन अॅलेन बेल्ट म्हणतात, तो थर ह्या रेडीएशन्स ना पृथ्वीवर येण्यापासून रोखतो.

 

south atlantic anomali-inmarathi
astronoo.com

जेव्हा सूर्यापासून येणाऱ्या ह्या रेडीएशन्स वॅन अॅलेन बेल्ट ला धडकतात तेव्हा त्या अंतराळात पसरतात. आता ह्या हानिकारक रेडीएशन्स पासून आपल्या पृथ्वीचा बचाव करणारा हा वॅन अॅलेन बेल्ट पृथ्वीभोवती सर्वत्र एकसारखा नाही. कारण आपली पृथ्वीच एकसारखी गोल नाही, ती ध्रुवांवर चपटी, तर मधेच जाड आहे.

त्यामुळे दक्षिणी धृवाजवळील परिसरात हा वॅन अॅलेन बेल्ट पृथ्वीच्या खूप जवळ आलेला आहे. त्यामुळे अंतराळात त्या ठिकाणी पडणाऱ्या रेडीएशन्सचा जास्त परिणाम दिसतो.

 

south atlantic anomali-inmarathi04
news.com.au

अंतराळवीर अंतराळातील ह्या बरमुडा ला साउथ अटलांटिक अॅनोमली म्हणतात. ह्य ठिकाणाजवळून जाणारे अंतराळयान किंवा स्पेस स्टेशन लवकरात लवकर ह्याला पार करण्याच्या प्रयत्नात असतात.

पण आजकाल अनेक खाजगी कंपन्या देखील स्पेस मिशन पाठविण्याच्य प्रयत्नात आहेत. ह्यामध्ये अनके लोक अंतराळाची सफर करण्यासाठी जातील. अश्यात आपल्याला ह्या एसएए म्हणजेच अंतराळातील बरमुडा ट्रँगल पासून जरा सावध राहण्याची गरज आहे.

टेरी सांगतात की ह्या ठिकाणाहून जाणाऱ्या सॅटेलाइटला देखील ह्या रेडिएशन्स सहन कराव्या लागतात. कॉम्पुटर सिस्टीम काम करणे बंद करून टाकते. त्यामुळेच नासाची अंतराळ दुर्बीण हबल ह्या परिसरातून जाताना काम करणे बंद करून टाकते.

टेरी वर्ट्स सांगतात की, अंतराळात ह्या रेडिएशन्स पासून वाचण्याचा सर्वात चांगला मार्ग हा पाणी आहे. पाण्याच्या २३ किलो वजनाच्या एका पिशवीला भिंतीप्रमाणे वापरून अंतराळवीर ह्या रेडिएशन्स पासून स्वतःचा बचाव करतात.

ह्या रेडिएशन मुळे डोळ्यांना त्रास होत असेल पण ह्याने होणाऱ्या प्रकाशाने अंतराळवीर अंतराळातील अनेक अप्रतिम नजारे बघू शकतात. सूर्य आणि पृथ्वी ह्यांची चुंबकीय किरण एकमेकांवर आदळल्याने ध्रुवांवर एक हिरव्या रंगाचा प्रकाश बघायला मिळतो. उत्तर ध्रुवावर हा देखावा बघण्यासाठी लोक हजारो किलोमीटरचा प्रवास करून येतात.

 

south atlantic anomali-inmarathi01
messagetoeagle.com

तर अंतराळातून हा देखावा आणखीनच आकर्षक दिसतो. टेरी सांगतात की नॉर्दन लाईट्सचा असा देखावा तुम्ही पृथ्वीवरून बघूच शकत नाही. स्पेस स्टेशन वर राहत असताना टेरी ह्यांनी ह्या हिरव्या प्रकाशातून जाण्याचा अनुभव देखील घेतला आहे. जे आपण पृथ्वीवर राहून अनुभवू शकत नाही.

ह्या सोलर रेडिएशनची अंतराळात नेहेमी पाहणी केली जाते. त्यासाठी अंतराळवीर एक रेडिएशन मीटर आपल्या सोबत ठेवतात.

आता आपण एवढी प्रगती केली आहे आणि आपण साधारण माणसांना देखील अंतराळ प्रवास घडवून अणु शकतो, तेव्हा ह्या रेडिएशन्स पासून वाचण्यासाठी देखील काहीतरी उपाययोजना आपले वैज्ञानिक करतील अशी आशा आहे.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?