ह्या गावात फोटोग्राफीवर आहे बंदी…पण का? कारण ऐकून तुम्हाला हसू येईल!

===

===

आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

एखाद्या गोष्टीवर बंदी घालणे ही काही आपल्यासाठी नवीन गोष्ट नाही. कधी हि गोष्ट बंद तर कधी ती गोष्ट बंद. पण काय हो तुम्हाला असा प्रश्न केला की बंदी नेमकी कशासाठी घातली जाते? तर तुमच्यापैकी बहुतेकांचे उत्तर हेच असेल की त्या गोष्टीमुळे काही नुकसान होत असेल, समाजात तेढ निर्माण होत असेल वा एकंदरीत त्याचे वाईट परिणाम होत असतील तर त्या गोष्टीवर बंदी घातली जाते. आणि तुमचं हे उत्तर बरोबरच आहे म्हणा, पण जगात अश्या अनेक गोष्टी आहेत ज्यांवर घातलेल्या बंदीला अगदीच हास्यास्पद कारणं कारणीभूत आहेत, जी पाहून तुम्ही देखील चक्रावाल. अशीच एक गोष्ट म्हणजे एक गाव! ह्या गावामध्ये चक्क बंदी घालण्यात आलीये. आता हि बंदी जर योग्य कारणे डोळ्यासमोर ठेवून घातली असती तर प्रश्न वेगळा होता. पण ह्या गावाच्या बंदीमागचे कारण ऐकून तुम्हाला देखील हसू आवरणार नाही.

InMarathi Android App
bergun-marathipizza01
cdn.newsapi.com.au

ह्या गावामध्ये छायाचित्रणाला अर्थात फोटोग्राफीला बंदी घालण्यात आली आहे. 

एखाद्या मंदिरात वगैरे फोटोग्राफीला बंदी असल्याचे आपल्याकडे देखील आढळून येते, पण त्यामागे सुरक्षेचे कारण असते. पण ह्या गावामधील फोटोग्राफी बंदी मागचे कारण फारच विचित्र आहे.

===
===

गावातील फोटोग्राफीवरील बंदीला कारणीभूत आहे येथील सौंदर्यता! हे गाव आहे स्विर्त्झलँडमध्ये, आणि गावाचे नाव आहे- बर्गुन!

bergun-marathipizza02
newstime.jp

हे गाव इतके सुंदर आहे की, तेथे फोटोग्राफी करणे पूर्णपणे बंदी आहे आणि तसे केल्यास तेथे ९ न्यूझीलंड डॉलर म्हणजे जवळपास ४१३ रुपयांचा दंड भरावा लागतो. खरं तर, गावातील लोकांनीच या भागात फोटोग्राफी करण्यास बंदी घातली आहे. गावात जागोजागी नोटिस बोर्ड लावले गेले आहेत आणि त्यावर लिहले आहे की, गावात फोटोग्राफीला बंदी आहे.  नोटीस बोर्डावर हे लिहले आहे की, येथील सुंदरता आपल्या डोळ्यांनी पाहा आणि त्याचा आनंद लुटा. फोटोग्राफीद्वारे नाही.

bergun-marathipizza03
wonderfulengineering.com

जेव्हा येथे येणाऱ्या पर्यटकांनी  याचे कारण जानण्याचा प्रयत्न केला तेव्हा येथील मेयर पीटर निकोलेने सांगितले की,

आम्हाला नाही वाटत की येथे आलेल्या लोकांनी गावातील सुंदर फोटो फोटोज सेाशल मीडियात शेयर करावेत. कारण यामुळे असे लोक निराश होतात जे येथे येऊ शकत नाहीत.

===
===

निकोलेने हे सुद्धा सांगितले की, शास्त्रीयदृष्ट्या हे ही स्पष्ट झाले आहे की, सुट्टीतील सुंदर फोटो अशा लोकांना नाराज करतात ते फिरायला जाऊ शकत नाहीत. त्यामुळे येथे कायदा करून फोटोग्राफी करण्यावर बंदी घातली आहे.

bergun-marathipizza04
wonderfulengineering.com

गावातील पर्यटन संचालक मार्क एंड्रिया बारांडनच्या माहितीनुसार, नगर परिषद निवडणूकीत मिळालेल्या बहुमताच्या जोरावर हा नवा कायदा बनवला गेला आहे. अनेक लोकांनी असेझी म्हटले आहे की हे गाव म्हणजे उत्तर कोरिया झाले आहे, कारण उत्तर कोरिया देशामध्ये देखील फोटोग्राफीसाठी बंदी आहे.

पण बरेच जण असेही आहेत ज्यांनी ह्या बंदीचे समर्थन केले असून, अशी ठिकाणे म्हणजे डोळ्यांनी अनुभवला जावा असा प्रसंग असतो, तो कृत्रिम डोळ्यांच्या सहाय्याने पाहून का वाया घालावा?

 

लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *