…म्हणून तर म्हणतात “खोटं कधी बोलू नये!”…!

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page

===


आपल्याला लहानपणी पासून ह हे शिकविल्या जाते की नेहेमी खरे बोलावे, खोटं कधी बोलू नये. पण तरी देखील आपण खोट बोलतोच. खरे बोलणे ही केवळ एक चांगली सवयच नाही तर ह्याने तुमचे जीवन अधिक सुखकर होते. आपल्याला असं वाटत असतं की जर खोटं बोलून आपलं काम निघत आहे तर कशाला उगाचच खरे बोलून ते बिघडवावे. त्यामुळे आपण कसलाही विचार न करता सर्रास खोटं बोलून मोकळे होतो. खोटे बोलण्याने जरी तेवढ्या वेळेपुरता आपल्याला फायदा होत असला तरी ही सवय चुकीचीच आहे. तर ह्याउलट खरे बोलण्याने तुमचं आयुष्य अधिक चांगलं होऊ शकतं.

 

truth-inmarathi01
playbuzz.com

जे लोक नेहेमी खरे बोलत असतात त्यांचा स्वभाव हा साधासरळ असतो. अश्या स्वभावाच्या लोकांपासून लोक प्रभावित होतात. कारण अश्या लोकंच्या बोलण्यात, वागण्यात कुठल्याही प्रकारचा कपट, खोटारडेपणा नसतो. असे लोक खोटं बोलून आपलं काम काढून घेण्याऐवजी खरे बोलणे पसंत करतात. त्यामुळे असे लोक इतरांना जास्त आवडतात.

 

truth-inmarathi02
cortijocalonge.es

आजकालच्या पिढीचं वय हे खूप कमी झालं आहे. कमी वयाचा संबध हा तणाव, चिंता, भीती आणि असुरक्षा अश्या भावनांशी असतो. ज्यामुळे व्यक्तीला आजार जडतात आणि परिणामी त्याचा प्रभाव वयावर होतो. जेव्हाकी खरे बोलणाऱ्या व्यक्तीला कुणाचीही भीती नसते. खोटं

बोलण्यामुळे येणारा तणाव आणि भीती देखील त्याला नसते. अश्या प्रकारची व्यक्ती ही आपले जीवन अधिक संतुष्टपणे जगत असते, तसेच ती इतरांच्या तुलनेत अधिक निरोगी जीवन जगते.

 


truth-inmarathi04
certainlyher.com

खरे बोलणाऱ्या व्यक्तीचे जीवन हे खोटं बोलणाऱ्या व्यक्तींच्या तुलनेत अधिक आनंददायी असते. तिला कुठलीही चिंता अथवा भीती नसल्याने ती जीवनातील लहान लहान क्षणांचा आनंद घेऊ शकते.

 

truth-inmarathi
enkirelations.com

खरे बोलणाऱ्या व्यक्तीचे मन हे अशांत नसून शांत असते. आजकालच्या जीवनशैलीमुले कामाच्या भारामुळे लोकांचे मन खूप अशांत झाले आहे, ते नेहेमी तणावाखाली जगात असतात. एकदा जर तुम्ही खोटं बोलले तर तुम्हाला ते सिद्ध करण्यासाठी किंवा खरं लपविण्यासाठी आयुष्यभर खोटे बोलावे लागते. पण नेहेमी सत्याच्या बाजूने असणाऱ्या व्यक्तीचे मन हे नेहमी शांत असते कारण तिला खरं लपविण्याचा विचार सतावत नसतो. स्थिर आणि शांत मन असणारी लोक जीवनात अधिक यशस्वी देखील होतात.

 

truth-inmarathi03
boroktimes.com

खोटे बोलून जिथे आपल्याला तणाव, भीती, नेहेमी खरे लपविण्याचा दोष हे सर्व मिळत, तिथेच खरे बोलून आपण तणावमुक्त आणि स्वच्छंदी जीवन जगू शकतो, जे अधिक आनंदी असेल…

सत्य आणि अहिंसेचे तत्वज्ञान महात्मा गांधींनी सांगितले त्याची कालसुसंगतता आजही अबाधित आहे. जो मनुष्य सत्याचा मार्ग पत्करतो त्याचाच अंतिम विजय होतो. ज्याच्या उक्तीत आणि कृतीत खोट असते त्याला त्याचा पश्चात्ताप होतो. यशस्वी आणि विजयी होण्यासाठी त्या महात्म्याला स्मरून खरे बोलण्याचा संकल्प करूयात..!


===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.




One thought on “…म्हणून तर म्हणतात “खोटं कधी बोलू नये!”…!

  • February 21, 2019 at 9:21 am
    Permalink

    अप्रतिम लेख

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?