मोदींची अमेरिका भेट : नेमका काय फायदा झाला?

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

====

सुरज उदगीरकर –

भारताचे प्रधानमंत्री मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्रपती बराक ओबामा यांची मोदींच्या तिसऱ्या अधिकृत दौऱ्यादरम्यान व्हाईट हाऊस येथे भेट झाली. त्यानंतर मोदींचं अमेरिकन संसदेत भाषणही झालं. हे भाषण, त्या भाषणावर मिळालेल्या टाळ्या आणि standing ovation चं सोशल मिडीयावर भरपूर celebration देखील झालं.

 

modi america visit 02 marathipizza

 

पण ह्या सर्वांचं नेमकं फलित काय निघालं – हे अजून फारसं कुणालाच माहित नाही ! 🙂

म्हणूनच खास “मराठी pizza” च्या वाचकांसाठी पुढे देत आहोत – मोदींच्या ह्या अमेरिका भेटीत झालेले महत्वाचे निर्णय :

===

1) उभयपक्षी झालेल्या या तिसऱ्या भेटीत दोन्ही नेत्यांनी व्यक्तीस्वातंत्र्य, लोकशाही, जागतिक मानवी व नागरी हक्क, समान नागरी हक्क, बहुलतावाद, कायदा व सुव्यवस्था इत्यादीवर आधारित भारत-अमेरिका संबंधांचा आढावा घेतला.

दोन्ही देश आर्थिक प्रगती, शाश्वत विकास, शांततेचा आणि सुरक्षेचा स्वगृहिय तसेच आंतरराष्ट्रीय प्रचार, सर्वसमावेशक आणि लोकशाही सरकार, मानवी हक्कांचा आदर तसेच जागतिक नेतृत्व पुरावण्याबाबत वचनबद्ध आहेत.

2) दोन्ही नेत्यांनी भारत व अमेरिकेतील द्विपक्षीय संबंधांचे स्वागत केले. तसेच, सुरक्षा आणि विकासाच्या मुद्द्यांवर जवळीक ठेवण्याची शाश्वती दिली गेली.

3) अणूऊर्जा नुकसान भरपाईच्या दायित्वाच्या अनुषंगाने उभयता देशांच्या गेल्या 2 वर्षातील घेतल्या गेलेल्या निर्णयांमुळे अमेरिका आणि भारतीय अणूऊर्जा उत्पादकांमधला भक्कम पाया रचला गेला.

अणू ऊर्जेच्या नागरी उपयोगांवर आधारित दशकभराच्या भागीदारीचा कळस या अर्थाने दोन्ही नेत्यांनी westinghouseच्या वतीने भारतात तयार होणाऱ्या 6 AP1000 अणूभट्टयाच्या प्रस्तावाचे स्वागत केले. पूर्णत्वास गेल्यानंतर हा प्रकल्प विश्वातील सर्वात मोठा प्रकल्प असेल, जो भारत व अमेरिकेदरम्यान असणाऱ्या नागरी अणू कराराची वचनपूर्ती करेल. तसेच भारताच्या वाढत्या ऊर्जेच्या गरजेची पूर्तता करून जिवाष्म इंधनावरची निर्भात कमी करेल.

 

modi america visit 01 marathipizza

 

4) अमेरिका भारताच्या महत्वाकांक्षी 175GW अक्षय ऊर्जा निर्मितीच्या स्थापनेला पाठिंबा देईल त्यातली 100GW ऊर्जा ही सौरऊर्जा असेल.

5) भारत व अमेरिका संयुक्तरित्या “शुद्ध ऊर्जा” प्रकल्पात 20 मिलियन डॉलर्सची गुंतवणूक करत असून येत्या काळात 400 मिलियन डॉलर्स गुंतवण्यासाठी कटिबद्ध आहेत. ज्या मार्फत 10 लाख घराना स्वच्छ आणि अक्षय ऊर्जेचा पुरवठा होईल.

6) अमेरिका व भारत अणू-जैविक-रासायनिक किरणोत्सर्गी हत्यारे बाळगून असणाऱ्या अतिरेक्यांशी लढताना परस्पर सहकार्यासाठी वचनबद्ध आहेत.

7) राष्ट्रपती ओबामांनी भारताच्या NSG मध्ये दाखल होण्याच्या अर्जाचे स्वागत केले असून भारत यासाठी तयार असल्याचे आश्वासन दिले. तसेच NSG मध्ये असणाऱ्या सरकारांना भारताला पाठिंबा देण्याचे आवाहन केले. राष्ट्रपतींनी भारताच्या MTCR मधील प्रवेशाचे देखील स्वागत केले.

8) दोन्ही नेत्यांनी उभयता देशातील वाढत्या सैनिक अभ्यासाबद्दल तसेच, आपत्ती मदतकार्य, प्रशिक्षणाबद्दल समाधान व्यक्त केले. दोन्ही नेत्यांनी याबद्दल द्विपक्षीय रक्षा कार्य वाढवण्यासंदर्भात मदत होण्यासाठी अजून काही करार करण्याची इच्छा व्यक्त केली.

9) भारताच्या “Make in India” योजनेला पाठिंबा व मजबूत रक्षा उद्योगाला पाठिंबा म्हणून अमेरिका भारताला वस्तूंचा व नवनवीन तंत्रज्ञाना पुरवठा करत राहील.

 

modi america visit 04 marathipizza

 

10) आतंकवादाचा सामना करण्यासाठी दोन्ही नेत्यांनी “sharing the screening information of terrorists” ह्या व्यवस्थेचे स्वागत केले असून पाकिस्तानला मुंबई व पठानकोट हल्ल्यांच्या सूत्रधारांना न्यायिक शिक्षा देण्याचे आवाहन केले.

11) दोन्ही नेत्यांनी अमेरिकेच्या उद्योजकांच्या “स्मार्ट सिटी” ह्या भारतीय योजनेतल्या सहभागाचे स्वागत केले.

12) दोन्ही नेत्यांनी भारताच्या “permanent member” म्हणून सहभाग असणाऱ्या सुधारीत “संयुक्त राष्ट्र संघटने” बद्दल आश्वासन दिले.

13) दोन्ही देश एकमेकांच्या देशात जास्त वाकिलाती उभारण्यास वचनबद्ध असून भारत लवकरच सियाटेलमध्ये एक वाकिलात उभारेल.

14) भारत व अमेरिका हे 2017 मधले प्रवास व पर्यटन भागीदार असल्याची घोषणा दोन्ही नेत्यांनी केली असून उभयता देशातील नागरिकांना अधिकाधिक सहजपणे व्हिसा देण्याचे आश्वासन दिले गेले.

===

थोडक्यात काय – आपल्याला भाषण, गळा-भेट, स्वाक्षरी…हे सर्व दिसत असतं आणि कधीकधी आपल्याला प्रश्न पडतो की ह्या सर्वाचा फायदा काय?!

पण पडद्यामागे बरेच निर्णय होत असतात — आपल्या देशाला पुढे नेण्यासाठी !

===

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असे नाही. । आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi । Copyright (c) 2017 मराठी pizza. All rights reserved.

Omkar Dabhadkar

Editor @ इनमराठी.कॉम

omkar has 203 posts and counting.See all posts by omkar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?