समुद्रमंथनातून मिळालेला लसूण – रोज अंशापोटी खाल्ल्याने होतात हे आश्चर्यकारक फायदे !

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

समुद्रमंथन केल्यावर देव आणि दानव यांच्यात अमृताच्या प्राप्तीसाठी भांडण झाले… अमृताचा कलश हिसकावून घेताना त्यातला एक थेंब पृथ्वीवर पडला… तो थेंब पृथ्वीच्या कुशीत रुजला आणि आंबट रस वगळता निसर्गातले पाच रस घेऊन लसणाचा कोंब बाहेर आला…..

गंमतीशीर आहे, पण आजीने सांगितलेली ही गोष्ट मला आजही जशीच्या तशी आठवते…. खरं पाहायला गेलं तर लसूण खरोखरच अमृत असावी अशी खात्री मला झाली आहे ….

गोड, खारट, तुरट, कडू आणि तिखट या पाच चवींनी युक्त लसणाचे वैशिष्ट्य हे आहे, की खारट रस नैसर्गिकरित्या असणारा हा एकमेव कंद आहे…

संस्कृत मध्ये याला रसोन म्हणतात. रस + ऊन म्हणजे एक रस उणे असणारा.

सर्वसाधारणपणे लसणीचा उपयोग भाजीला फोडणी देण्यासाठी, एखाद्या भाजीची ग्रेव्ही तयार करण्यासाठी किंवा चटण्या बनविण्यासाठी केला जातो. एखादी बेचव भाजी केवळ लसूण त्यात घातल्याने किती चविष्ट बनते !

पण लसूण केवळ पदार्थांची चवच वाढवत नाही तर इतरही अनेक प्रकारे उपयुक्त ठरते. लसणीमध्ये अँटी बॅक्टेरियल व वेदना कमी करणारी तत्वे आहेत. तसंच सांधेदुखीच्या आणि कंबरदुखीच्या आजारावरही लसूण रामबाण औषधी आहे.

 

garlic-inmarathi
healthline.com

त्यामुळे आपण आपल्या आहारात लसणीचा समावेश करणे अगत्याचे आहे. पण या औषधीचा सर्वात जास्त उपयोग ती सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटी खाल्ल्याने होतो. लसणात ऍलिसीन नावाचे सल्फर कंपाउंड आहे.

या ऍलिसीनमुळे लसणात ऍण्टीबायोटिक व बुरशीजन्य आजारांना प्रतिबंध करण्याचा गुण दिसून येतो; परंतु या द्रव्याचा फायदा होण्यासाठी लसूण चिरणे किंवा चावून खाणे गरजेचे आहे.

म्हणून दररोज सकाळी उठल्यानंतर एक लसणीची पाकळी चावून खावी व त्यानंतर एक ग्लास कोमट पाणी प्यावे.

हे आहेत अंशपोटी लसूण खाल्ल्याचे आश्चर्यकारक फायदे :

१) उच्च रक्तदाबापासून बचाव

कित्येक लोकांचं असं मानणं आहे की लसूण खाल्ल्याने हायपरटेंशनच्या लक्षणांपासून आराम मिळतो. नियमितपणे लसणीच्या पाकळीच्या अंशपोटी केल्या जाणाऱ्या सेवनामुळे उच्चरक्तदाब असल्यास तो नियंत्रित ठेवणे शक्य होते.

लसूण केवळ रक्तदाबच नियमित करत नाही तर हृदयाशी संबंधित आजारांचे ही निवारण करते.

 

ctvnews.ca

लसूण खाल्ल्याने रक्ताच्या गाठी बनत नाहीत ( clotting ). तसेच हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता ही कमी होते. लसूण आणि मध मिसळून खाल्ल्यास हृदयाच्या धमन्यांमध्ये असलेले ब्लॉकेज दूर होते, त्यामुळे हृदयाचा रक्तप्रवाह सुरळीत सुरु राहतो.

लसणीच्या सेवनाने शरीरातील रक्ताभिसरण चांगले राहते. त्याचबरोबर यकृत आणि मूत्राशयाचे कार्य सुरळीतपणे चालू राहण्यास मदत करते.

२) डायरियावर गुणकारी :

डायरिया किंवा बद्धकोष्ठ या पोटाच्या दोन्ही विकारांमध्ये लसूण उपयोगी आहे. यासाठी थोडे पाणी उकळायला ठेऊन त्यामध्ये पाच-सहा लसणीच्या पाकळ्या घालाव्यात.

पाणी साधारण सात-आठ मिनिटे उकळून घ्यावे. त्यांनतर हे पाणी थोडे निवले, की मग अंशपोटी हे पाणी प्यावे. या लसणीच्या पाण्यामुळे जुलाब आणि बद्धकोष्ठ या दोन्ही विकारांमध्ये आराम मिळतो.

 

garli-inmarathi
techtimes.com

तसेच शरीरामधील घातक पदार्थ देखील लसणीच्या पाण्याच्या सेवनाने बाहेर टाकले जातात. काही लोकांचं असं मानणं आहे की लसूण जेव्हा ती रिकाम्या पोटी खाल्ली जाते, तेव्हा ती मज्जासंस्थेशी निगडित आजारांवरही गुणकारी ठरू शकते.

३) भूक वाढविण्यास मदत करते :

लसणीच्या सेवनाने पचनसंस्था बळकट होते. ज्यांना अपचनाचा त्रास होत असेल, किंवा ज्यांना काही कारणाने भूक कमी लागत असेल, त्यांनी सकाळी रिकाम्या पोटी लसूण चावून खावी.

४) अॅसिडीटी रोखते :

अंशपोटी लसूण खाण्याची सवय ऍसिडिटी होण्यापासून वाचवू शकते. जेव्हा तुम्हाला जीव घाबराघुबरा झाल्यासारखं वाटतं तेव्हा पोटात ऍसिडची निर्मिती होत असते. लसूण ही ऍसिडिटी निर्माण होण्यापासून रोखते तसेच ताण-तणाव कमी करण्यातही सहाय्यक ठरते.

 

acidity-inmarathi
azabgazab.com

५) श्वसन तंत्राला बळकटी मिळवून देते :

लसूण श्वसन तंत्र सुधारण्यासाठी खूप लाभदायक आहे. त्यामुळे श्वसनाशी संबंधित विकारांमध्ये देखील लसणीच्या सेवनाने फायदा होतो. सर्दी-पडसे, खोकला, अस्थमा, न्युमोनिया, ब्रॉन्कायटीस, इत्यादी विकारांमध्ये लसणीचे सेवन फायदेशीर ठरते.

६) ट्युबरक्युलॉसिसमध्ये लाभदायक :

ट्युबरक्युलॉसिसची समस्या असल्यास सकाळी रिकाम्या पोटी लसूण खावी. लसूण कीटकनाशक असल्याने दररोज लसूण खाल्याने टीबीचे विषाणू मरण पावतात.

लसणीमध्ये अशी अनेक गुणकारी तत्वे आहेत, ज्यामुळे आपला अनेक विकारांपासून बचाव होऊ शकतो.

आयुर्वेदामध्ये अशा ह्या लसणीला तारुण्य टिकवून ठेवणारी औषधी मानलं जातं आणि म्हणून तिचा उल्लेख “वंडर फूड” असा केला जातो.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?