' आरोग्याच्या अनेक समस्यांवर एक चांगला उपाय, बस्स हे इतकंच करा! – InMarathi

आरोग्याच्या अनेक समस्यांवर एक चांगला उपाय, बस्स हे इतकंच करा!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

“मछली जल कि राणी है, जीवन उसका पानी है”…!

ही कविता आपण सर्वानीच लहानपणी ऐकली आहे. पण माश्यांसाठी जेवढे पाणी आवश्यक आहे, तेवढेच ते इतर सजीवांसाठी देखील आहे. खरी पाण्याची किंमत आपल्याला ज्यावेळी कितीतरी वेळ पिण्यासाठी पाणी मिळत नाही आणि घसा सुकत येतो तेव्हा कळते.

माणसाला निरोगी राहण्यासाठी एका दिवसामध्ये कमीत कमी आठ ते दहा ग्लास पाणी पिणे आवश्यक आहे. आयुर्वेदामध्ये सांगितले आहे की, सकाळच्या वेळेला तांब्याच्या भांड्यामधील पाणी पिणे चांगले असते.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

या तांब्याच्या भांड्यांमधील पाणी प्यायल्यास कितीतरी रोग हे कोणतेही औषध न घेताच ठीक होतात. आपल्या घरातील वडिलधारी माणसे देखील आपल्याला तांब्याच्या भांड्यामधील पाणी पिण्याचा सल्ला देतात.

 

Benefits of drinking water from a copper vessel.Inmarathi
thehealthsite.com

 

पण यामध्ये हे लक्षात ठेवणे गरजेचे आहे की, तांब्याच्या भांड्यामध्ये असलेले कमीत कमी आठ तास जुने पाणीच फक्त आपल्या शरीरासाठी लाभदायक असते.

ज्या लोकांना कफाचा जास्त त्रास असेल, अशा लोकांनी यामध्ये तुळशीची काही पाने टाकून ते प्यावे. तांब्याच्या भांड्यामधून पाणी प्यायल्याने विविध प्रकारचे लाभ आपल्याला मिळतात.

१. थायरॉइडला नियंत्रित करते.

 

thyroid-inmarathi
thenational.com

 

थायरेक्सीन हार्मोन्सच्या असंतुलनामुळे थायराइडचा आजार होतो. थायराइडच्या प्रमुख लक्षणांमध्ये एकदम लवकर वजन वाढणे किंवा घटणे, खूप थकवा वाटणे इत्यादींचा समावेश आहे.

थायराइड एक्स्पर्ट्स मानतात की, तांब्याच्या धातूचा स्पर्श असलेले पाणी शरीरामध्ये थायरेक्सीन हार्मोनला बॅलेंस करते.

ते या ग्रंथींच्या कार्यप्रणालीला देखील नियंत्रित करतात. तांब्याच्या भांड्यामध्ये ठेवलेले पाणी पिल्याने हा रोग नियंत्रित करता येतो.

२. त्वचेला निरोगी बनवते

 

shilpa shetty InMararthi

 

आपल्या त्वचेवर आपल्या रोजच्या खाण्यापिण्याचा आणि दैनंदिन कामाचा प्रभाव पडतो. त्यामुळे जर तुम्हाला तुमच्या त्वचेला निरोगी बनवायचे असेल, तर रात्रभर तांब्याच्या भांड्यामध्ये ठेवलेले पाणी सकाळी उठून प्या. रोज नियमितपणे असे केल्यास तुमची त्वचा ग्लो करेल आणि निरोगी दिसेल.

३. वजन कमी करण्यास मदत करते.

 

Benefits-of-drinking-water-from-a-copper-vessel.Inmarathi2
thediamethod.com

 

कमी वयामध्ये वजन खूप वाढणे, ही आजकाल समस्या बनलेली आहे. जर कोणत्याही माणसाला वजन कमी करण्याची इच्छा असेल तर त्याने व्यायाम करण्याच्या बरोबरच तांब्याच्या भांड्यामध्ये ठेवलेले पाणी प्यावे. यामुळे शरीरातील एक्स्ट्रा फॅट कमी होते.

शरीरामध्ये कोणत्याही प्रकारची कमतरता किंवा अशक्तपणा राहत नाही.

४. रक्ताची कमतरता दूर होते.

 

blood donation benefits-inmarathi01
indiatvnews.com

 

एनिमिया किंवा रक्ताची कमतरता एक अशी समस्या आहे, ज्याच्यामुळे ३० वर्षापेक्षा जास्त वय असलेल्या कितीतरी स्त्रिया त्रस्त आहेत.

कॉपर या घटकाच्या कमतरतेमुळे असे हॉट असते. हे शरीरातील बहुतेक प्रक्रियांना खूप आवश्यक असते. हे शरीरातील आवश्यक पोषक तत्वांना अवशोषित करण्याचे काम करते. याच कारणामुळे तांब्याच्या भांड्यामध्ये ठेवलेले पाणी प्यायल्याने रक्ताच्या कमतरतेचा आजार दूर होतो.

५. पचनाची क्रिया सुधारते.

 

Benefits of drinking water from a copper vessel.Inmarathi3
alison.com


अॅसिडीटी किंवा गॅस किंवा पोटाची दुसरी कसली समस्या असल्यास तांब्याच्या भांड्यामधील पाणी अमृतासारखे कार्य करते.

आयुर्वेदमध्ये सांगितल्यानुसार, जर तुम्ही आपल्या शरीरातून विषारी पदार्थाना बाहेर काढू इच्छित असाल, तर तांब्याच्या भांड्यामध्ये कमीत कमी ८ तास ठेवलेले पाणी प्या. यामुळे तुमच्या पचन क्रियेमध्ये येणारी समस्या देखील दूर होईल.

६. कर्करोगाशी लढण्यास मदत करते.

कर्करोग झाल्यास नेहमी तांब्याच्या भांड्यामध्ये ठेवलेले प्यायला पाहिजे. यामुळे चांगला लाभ मिळतो.

 

cancer-inmarathi
d2v4vjmuxdiocn.cloudfront.net

 

तांब्याच्या भांड्यामध्ये ठेवलेले पाणी वात, पित्त आणि कफाची असलेली समस्या दूर करते. या प्रकारच्या पाण्यामध्ये अँटी – ऑक्सिडेंट देखील असते, जे या रोगाशी लढण्यासाठी शक्ती देते. अमेरिकन कॅन्सर सोसायटीनुसार, तांबे हे कितीतरी प्रकारे कर्करोग रुग्णाची मदत करते. हा धातू लाभकारी आहे.

७. हृदयाला निरोगी बनवते.

तणाव हा आजकाल सगळ्यांचाच दैनंदिन जीवनाचा एक भाग बनला आहे. त्यामुळे हृदयाचे रोग आणि तणावाने ग्रासलेल्या लोकांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत चालली आहे.

 

Benefits of drinking water from a copper vessel.Inmarathi4
myhdiet.com

 

जर तुम्हाला देखील अशा प्रकारची काही समस्या असेल, तर तुम्ही देखील रात्री तांब्याच्या भांड्यामध्ये पाणी ठेंवा आणि सकाळी उठून ते पाणी प्या.

तांब्याच्या भांड्यामध्ये ठेवलेले पाणी पिल्याने शरीरामध्ये रक्ताभिसरण चांगल्याप्रकारे होते. तसेच, कोलेस्ट्रॉल कंट्रोलमध्ये राहते आणि हृदयाचे आजार आपल्यापासून लांब राहतात.

 

copper-vessel-water InMarathi

 

अशाप्रकारे आपण तांब्याच्या भांड्यामधील पाणी पिऊन आपले आरोग्य चांगल्याप्रकारे निरोगी ठेवू शकतो.

===

महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

 

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?