रक्तदानाने फक्त “दुसऱ्याचा”च फायदा होत नाही! जाणून घ्या रक्तदानाचे आश्चर्यकारक फायदे!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर

===

रक्तदान करण्यावरून आजही समाजात अनेक गैरसमज आहेत. या गैरसमजावरून असे दिसून येते की, रक्तदानाचे महत्त्व माहित असूनही ते लोकांना फारसे पटलेले नाही. त्यामुळेच अनेक जणांच्या तोंडून तुम्ही ऐकले असेल की, “रक्तदान शरीरासाठी घातक आहे…”, “रक्तदान केल्याने शरीर अशक्त होते…” वगैरे वगैरे!

पण असं खरंच काही नाहीये. उलट नियमित रक्तदान शरीरासाठी अतिशय चांगले आहे.

 

Blood-donation-marathipizza01
mirror.co.uk

रक्तदान करणे, न करणे ही प्रत्येकाची ऐच्छिक निवड आहे. परंतु अनेकदा केवळ गैरसमजांमुळे रक्तदान करण्यापासून लोक परावृत्त होतात. त्यामुळे आपल्या सर्वांनाच हे माहित होणे आवश्यक आहे की रक्तदान करणे हे शरीरासाठी उत्तम आहे आणि त्याचे काही फायदेही आहेत.

तुमच्यापैकी ज्यांचा या गोष्टीवर विश्वास नाही त्यांच्यासाठीच हा खास लेख.

आज आम्ही तुम्हाला रक्तदानाविषयी असे काही फायदे सांगणार आहोत जे रक्तदानाविषयीचा तुमचा नकारात्मक प्रतिसाद बदलतील आणि तुम्ही देखील स्वत:हून रक्तदान करायला हजर व्हाल.

१) नियमित रक्तदान केल्याने रक्ताचा प्रवाह अधिक सुरळीत होतो आणि त्यामुळे हृदयविकाराचा धोका ३०-४०% ने कमी होतो.

 

Blood-donation-marathipizza02
webmd.com

२) शरीरातील वाढत्या लोह (iron) च्या मात्रेमुळे आपल्या यकृताला धोका पोचू शकतो. ते पूर्णत: निकामी होऊ शकतं. नियमित रक्तदान या धोक्यापासून आपल्याला वाचवते.

 

Blood-donation-marathipizza03
bimcbali.com

 

३) रक्तदानामुळे रक्तांच्या नवीन पेशींच्या उत्पादनावर सकारात्मक प्रभाव दिसून येतो.

त्याचा थेट फायदा असा होतो कि आपण निरोगी आणि उत्साही राहतो.

 

Blood-donation-marathipizza04
medicalnewstoday.com

 

४) नियमित रक्तदानामुळे कॅन्सर होण्याची शक्यता मंदावते, हा फायदा बऱ्याच जणांना माहीतही नाही…!

 

Blood-donation-marathipizza05
theresonance.com

५) रक्तदान केल्याने कोलेस्टेरॉल देखील कमी होते. यामुळे कोलेस्टेरॉलमुळे होणाऱ्या रोगांचा धोकाही राहत नाही.

 

Blood-donation-marathipizza06
plus.google.com

६) जर तुम्ही नियमित रक्तदान केले तर तुमची जखम ही लवकर भरून निघते.

कारण जेव्हा तुम्ही नियमित रक्तदान करत तेव्हा शरीर स्वत:हून लाल पेशींचे उत्पादन कमी करते.

 

Blood-donation-marathipizza07
emergencycarehouston.wordpress.com

७) जर तुम्ही जास्त वजनाच्या समस्येने त्रस्त असाल तर तुम्ही नक्कीच रक्तदान केले पाहिजे.

कारण प्रत्येक वेळी रक्तदान केल्यावर तब्बल ६५० कॅलरीज कमी होतात. ज्याचा थेट तुमच्या वजनावर परिणाम होतो…!

 

Blood-donation-marathipizza08
medicalnewstoday.com

८) नियमित रक्तदानामुळे केवळ वजनच कमी होत नाही, तर तुमच्या शरीराचा “भार” कमी झाल्याने तुमचं शरीर लवकर थकतही नाही.

 

Blood-donation-marathipizza09
pinterest.com

चला तर मग इतरांनाही हे फायदे सांगा आणि रक्तदान करण्यासाठी त्यांना आवाहन करा!

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

One thought on “रक्तदानाने फक्त “दुसऱ्याचा”च फायदा होत नाही! जाणून घ्या रक्तदानाचे आश्चर्यकारक फायदे!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?