हे मंदिर कशाने बनलंय… वाचून आश्चर्यचकित व्हाल !

आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

मंदिर हा शब्दचं मुळात पवित्रतेचं प्रतिक आहे. मंदिराशी आपल्या सर्वांच्या धार्मिक भावना जुळलेल्या असतात. आपण ज्या धर्माला, देवाला मानतो त्यांना पुजण्याचे ठिकाण म्हणजे मंदिर. त्यासोबत आपली आस्था जुळलेली असते. मंदिर हे आपल्यासाठी एक असं पवित्र ठिकाण आहे जिथे आपण चुकुनही काही असभ्य वर्तन करत नाही. प्रत्येक धर्माच्या संस्कृतीत त्या त्या धर्माच्या जोपासनेसाठी आणि त्यांच्या त्यांच्या देवांची प्रार्थना करण्यासाठी एक ठिकाण असतं जसे हिंदू धर्मात मंदिर…

 

beer bottle temple-Inmarathi02
sustainablediary.blogspot.in

हिंदू धर्मानुसार कुठल्याही मंदिरात चप्पल घालून जाणे हे वाईट मानल्या जाते, तसेच इतर धर्मातील मंदिरांचेही त्यांचे त्यांचे नियम असतात. पण कुठल्याही धर्मात मद्य म्हणजेच दारू याला वाईटच मानल्या गेले आहे. एवढच नाही तर आपणही याला चुकीचेच मानतो. पण या जगात असंही एक ठिकाण आहे जिथे चक्क बियरच्या बाटलीपासून एक भल मोठं मंदिर उभारण्यात आलं आहे. झालात ना आश्चर्यचकित.. पण हे खर आहे.

 

beer bottle temple-Inmarathi01
flickr.com


बियरच्या बाटलीपासून एका मंदिराची रचना होणे याचा विचार कोणी स्वप्नातही केला नसेल. पण याचं अकल्पनीय गोष्टीला थायलंड येथील बौद्ध भिखुंनी अस्तित्वात आणले आहे.

 

beer bottle temple-Inmarathi
sustainablediary.blogspot.in

थायलंड येथील बौद्ध भिखुंनी तब्बल १५ लाख बियरच्या बाटल्या जमा करून ‘Wat Pa Maha Chedi Kaew’ नावाच्या मंदिराची रचना केली आहे. हे मंदिर भगवान बुद्धांना समर्पित आहे.

 

beer bottle temple-Inmarathi05
travelblog.org

हे मंदिर माणसाच्या काल्प्तेचा आणि कलेचा एक उत्कृष्ट नमुना आहे. या मंदिराला बघण्यासाठी संपूर्ण जगातून पर्यटक येतात.

 

beer bottle temple-Inmarathi03
sustainablediary.blogspot.in

या मंदिराची स्थापना १९८४ साली करण्यात आली. या मंदिराच्या परिसरात बनलेल्या २० इमारती देखील बियरच्या बाटली पासून बनविण्यात आल्या आहेत. त्यासाठी हिरव्या आणि कत्थ्या रंगाच्या बाटलींचा वापर करण्यात आला आहे.

 

beer-bottle-temple-Inmarathi06
weather.com

या मंदिराची कल्पनाच हटके असल्यामुळे हे मंदिर थायलंडमध्ये येणाऱ्या प्रत्येक पर्यटकाच्या आकर्षणाचे केंद्र बनले आहे.

या मंदिराच्या भिंतींपासून ते फर्शीपर्यंत बियरच्या बाटलींची सजावट करण्यात आली आहे.

 

beer bottle temple-Inmarathi08
sustainablediary.blogspot.in

या बियरच्या बाटल्या काचेच्या असल्या कारणाने या मंदिरात नेहमी प्रकाश असतो.

बियरच्या बाटलीपासून मंदिराची रचना करणे याचा आपण विचारही करू शकत नाही. पण तेच बौद्ध भिखुंनी शक्य करून दाखवलंय. पण याचा अर्थ असा नाही की, ते मद्यपानाचे समर्थन करत आहेत.

 

beer bottle temple-Inmarathi07
oneweirdglobe.com

शाळेत नेहमी आपल्याला कचऱ्यातून कला शिकविण्यात यायची, यात वापरात नसलेल्या वस्तूंपासून आपण काय काय तयार करू शकतो, त्या वस्तू वाया न जाऊ देता त्यांना रिसायकल करून त्याचा पुनर्वापर कसा करू शकतो हे शिकविल्या जायचे.

थायलंडच्या या बौद्ध भिखुंनी खाली बियरच्या बाटलींचा वापर करून साकारलेली ही वास्तू म्हणजे रिसायकलिंगचे उत्कृष्ट उदाहरणचं म्हणायला हवे.. नाही का?

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page Copyright (c) 2017 InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *