हे गणिती कोडं सोडवलं तर मिळतील ६ कोटी रुपये!

आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===


गणित हा विषय तसा बऱ्याच जणांचा नावडता. गणित म्हटलं की त्यांच्या डोक्यावर आठ्या पडल्याच पाहिजे. शाळेत असताना मराठीतलं गणित काही कळलं नाही आणि पुढे कॉलेजात गेल्यावर इंग्रजीमधल्या गणिताने काही पाठ सोडली नाही अशी या गणितापासून नेहमी दूर राहणाऱ्या गटाची तक्रार!

पण एक असाही गट आहे जो गणितावर अपार प्रेम करतो. गणित म्हणजे ज्यांना आपल्या जगण्याचं ध्येय वाटतं.

त्यांच्यासमोर काहीही मांडा, अगदीच काहीतरी अजब आकडेमोड करून त्याचं उत्तर ही गणितवासी मंडळी देणार म्हणजे देणार.

बीजगणित, भूमिती अगदी त्यांच्या डाव्या हाताचा खेळ!

आपल्याला गणित उत्तमरीत्या येतं याचा अभिमान देखील यांना भारी हं! आणि गणित न येणाऱ्यांना वाकुल्या दाखवणे हा तर यांचा आवडता उद्योग.

 

maths-marathipizza01
tes.com

असो – तर मंडळी तुम्ही गणित आवडणाऱ्या गटातले असाल तर ही बातमी खास तुमच्यासाठी आणि नसला तरी देखील वाचा, कारण जी बातमी सांगणार आहोत ती दोन्ही गटांच्या अगदीच फायद्याची आहे. कसं म्हणून विचारताय?

अहो कारण प्रश्न पैश्याचा आहे आणि तो देखील थोड्या थोडक्या नाही तर तब्बल १ मिलियन डॉलर्स अर्थात ६  कोटी रुपयांचा, त्यामुळे संधी तर सगळ्यांना समान हवी का नको?

बरं तर हे ६ कोटी रुपये मिळवण्यासाठी तुम्हाला एकच गोष्ट करायची आहे ती म्हणजे तुम्हाला उत्तर द्यायचं आहे एका गणिताचं. हे उत्तर द्यायचं आणि ६ कोटी रुपये घेऊन जायचे. विश्वास बसत नाहीये? मग हे प्रकरण जाणून घ्याच.


पण एक गोष्ट लक्षात ठेवा. एवढं मोठं बक्षीस उगाच लावलेलं नाही, कारण हे गणिताचं कोडं देखील तितकंच चक्रावणारं आहे!

कोडं आहे हे असं :

 

beals-conjecture-marathipizza01
businessinsider.com

या गणिताचं नाव आहे – बीएल काँजेक्चर! 

हा एक सांख्यिक सिद्धांत असून होड आयलँडच्या अमेरिकन मॅथेमॅटिकल सोसायटीने अचूक उत्तर देणाऱ्यासाठी हे १ मिलियन डॉलरचे बक्षीस ठेवले आहे. बँकर Andrew Beal यांना सांख्यिकी सिद्धांतामध्ये प्रचंड रस असून त्यांनीच हे कोडे बनवले आहे. या कोड्याला त्यांचेच नाव देण्यात आले आहे.

हे बीएल अनुमान सोडवल्याचा पुरावा किंवा त्या अनुमानाचे एखादे उदाहरण जो आणून देईल त्याला Andrew Beal यांनी १ मिलियन डॉलर देण्यात यावे अशी घोषणा करून ठेवली आहे. ही बक्षीसाची रक्कम Andrew Beal यांच्याकडूनच देण्यात येणार आहे.

याबद्दल सांगताना Andrew Beal म्हणतात,

जगभरातील युवांचा गणित आणि विज्ञानामध्ये रस वाढावा अशी माझी इच्छा आहे. गणिताकडे लक्ष आकर्षित व्हावे आणि बीएल काँजेक्चर आकर्षणाचे केंद्र ठरावे हा बक्षिसाची रक्कम वाढवण्याचा माझा मूळ हेतू आहे. गणिताच्या विस्मयचकित करणाऱ्या जगाकडे अधिकाधिक युवा आकर्षित होतील, अशी माझी अपेक्षा आहे.

 


andrew-beal-marathipizza
celebfamily.com

१९९० मध्ये अँड्र्यू विलिस आणि रिचर्ड टेलर या दोघांनी मिळून अशाच प्रकारचा फरमॅटचा शेवटचा प्रमेय सोडवून बक्षीस जिंकले होते.

फरमॅटचा लास्ट थेरम आणि बीएल काँजेक्चर सांख्यिकी सिद्धांतामध्ये अनेक विधानांची प्रारूपे आहेत. ते सांगायला तर सोपे आहेत, मात्र सोडवायला प्रचंड अवघड आहेत. २००३ मध्ये रशियन गणितज्ज्ञ ग्रिगोरी पेरीलमन यांनी पॉइनकेअर काँजेक्चर सोडवले होते. मात्र, त्यांनी आर्थिक स्वरूपातील बक्षीस स्वीकारण्यास नकार दिला होता.

बीएल काँजेक्चरचे बक्षीस जिंकण्यासाठी काही अटी व शर्ती आहेत. हे उत्तर प्रतिष्ठित गणित शोधपत्रिकेत प्रसिद्ध झाले पाहिजे आणि ती शोधपत्रिका एएमसीने निवडलेल्या पारितोषिक समितीच्या मते उच्च संपादकीय गुणवत्तेची असणे आवश्यक आहे.

एखाद्या गणिती समस्येचे अचूक उत्तर शोधण्यासाठी लक्षावधी डॉलरचे बक्षीस ठेवण्याची ही काही पहिलीच वेळ नाही.

२००० साली मध्ये मॅथेमॅटिक्स इन्स्टिट्यूटने ‘मिलेनियम प्रॉब्लेम’ या नावाने प्रसिद्ध असलेली गणितीय समस्या सोडवण्यासाठी १ मिलियन डॉलरचे बक्षीस जाहीर केले होते.

पण यात ७ गणिते सोडवायची आहेत. यापैकी आजवर केवळ १ च गणित पॉइनकेअर काँजेक्चर सोडवता आले आहे.

 

maths-marathipizza02
tengrinews.kz

बीएलसाठी पहिल्यांदा १९९७ मध्ये बक्षीस जाहीर केले होते. तेव्हापासून आजपर्यंत तरी या गणितीय समस्येचे अचूक उत्तर कोणालाही देता आलेले नाही. Andrew यांनी तेव्हा १,००,००० डॉलरचे बक्षीस ठेवले होते. आता बक्षिसाची रक्कम वाढवून १ मिलियन डॉलर करण्यात आली आहे.

काय मग मंडळी करणार का प्रयत्न?


===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.
One thought on “हे गणिती कोडं सोडवलं तर मिळतील ६ कोटी रुपये!

  • July 15, 2019 at 9:20 pm
    Permalink

    0 is the answer

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?