' पेट्रोल पंपावर मिळणाऱ्या या मूलभूत सुविधांबद्दल आपण अजूनही अंधारात आहात! – InMarathi

पेट्रोल पंपावर मिळणाऱ्या या मूलभूत सुविधांबद्दल आपण अजूनही अंधारात आहात!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

ज्यांच्याकडे गाडी आहे त्यांना जवळपास रोजच पेट्रोल पंपावर जाऊन पेट्रोल किंवा डिझेल भरावे लागते.

रोज करोडो लोक ह्या देशभरातील पेट्रोल पंपावर जाऊन पेट्रोल भरवून घेतात, पैसे देतात आणि परत येतात, पण कदाचितच ह्यापैकी काही लोकांना हे माहित असेल की पेट्रोल पंपावर आपल्याला काही सुविधा आणि अधिकार देखील मिळतात.

पेट्रोल पंपावर आपल्या सामान्य ग्राहकांना अनेक अश्या सुविधा आणि अधिकार मिळतात जे आपल्याला अजूनही माहित नाहीत.

ज्या सुविधांसाठी आपण तिथे पैसे देतो त्या सुविधा खरेतर आपल्याला मोफत उपलब्ध करवून देणे हे पेट्रोल पंप संचालकाची जबाबदारी असते.

आणि त्या अधिकारांपासून ते आपल्याला वंचित ठेवू शकत नाही. पण आपल्याला आपल्या अधिकारांची जाणं नसल्याने आपण त्यांचा वापर करू शकत नाही. आणि आपली फसवणूक होते.

 

petrol-pump-marathipizza00

ते कुठले अधिकार आहेत आणि कुठल्या सुविधा आहेत ज्या आपल्याला ह्या पेट्रोल पंपावर मिळतात जाणून घेऊ.

 

१. एमरजन्सी फोन कॉल :

 

phone call inmarathi
thebetterindia.com

 

आपातकालीन स्थितीमध्ये तुम्ही पेट्रोल पंपाहून एक फोन कॉल करू शकता. तशी सुविधा तिथे उपलब्ध असते. ही सुविधा सर्वांसाठी मोफत असते. पंप संचालक ह्यासाठी तुमच्याकडून कुठल्याही प्रकारे कर अथवा पैसे आकारू शकत नाही.

 

२. गाडीसाठी हवा :

 

petrol pump services-inmarathi01
motorbeam.com

 

आपल्यापैकी बरेच जण गाडीच्या टायर मध्ये हवा भरायला किंवा नायट्रोजन भरायला एका विशिष्ट शोरूम मध्ये किंवा गॅरेज मध्ये जातात, पण तीच हवा पेट्रोल पंपावर विनामूल्य मिळते!

पेट्रोल किंवा डिझल भरवून घेणाऱ्या प्रत्येक गाडीमध्ये हवा भरण्याची व्यवस्था करणे ही देखील पेट्रोल पंपाची जबाबदारी असते.

त्यासाठी तुमच्याकडून पैसे आकारले जाऊ शकत नाही, ही सुविधा मोफत असते. पण आपल्याकडे तर पेट्रोल भरल्यावर जर गाडीतील हवा चेक करायची असेल तर त्याला वेगळे पैसे द्यावे लागतात.

 

३. पिण्यासाठी पाणी :

 

water health-inmarathi02
everydayhealth.com

 

तसं बघायला गेलं तर ही सुविधा सगळ्याच बिझनेस प्लेस मध्ये असणं अत्यंत आवश्यक आहे, कारण ही खूप बेसिक सुविधा आहे!

ग्राहकांसाठी पिण्याच्या पाण्याची आणि प्रसाधन गृहाची व्यवस्था पेट्रोल पंपावर असणे आवश्यक आहे. ही सुविधा देखील मोफत असते. जी आपल्याला कदाचित मिळत नाही.

 

४. फर्स्ट एड बॉक्स :

 

first aid kit inmarathi
supply.unicef.org

 

खासकरून पेट्रोल पंप हे शहरापासून दूर असतात, आणि हायवे वर आपल्या देशात बरेच अपघात होत असतात! आणि त्यासाठीच तिथं पेट्रोल पंप जवळ असतात!

जर प्रवासी किंवा ग्राहक कुठल्या अपघातात जखमी झाला असेल तर त्यांच्यासाठी आपण पेट्रोल पंपाकडे फर्स्ट एड बॉक्स मागू शकतो. बेसिक मेडिकल व्यवस्था पेट्रोल पंपावर असणे गरजेचं आहे.

 

५. तक्रार बॉक्स :

 

petrol pump services-inmarathi03
matthewwilkinson.co.uk

 

पेट्रोल पंपावर एक तक्रार पेटी असणे देखील आवश्यक आहे. जर ग्राहकांना पेट्रोल पंपावर कुठल्या समस्येला सामोरे जावे लागले असेल तर ते त्याची तक्रार ह्या तक्रार पेटीत टाकू शकतात.

ह्या झाल्या पेट्रोल पंपावर आपल्याला आपल्याला मिळणाऱ्या सुविधा. आता बघुयात पेट्रोल पंपावरवर आपल्याला कुठले कुठले अधिकार मिळतात ते.

 

६. क्वालिटीची तपासणी :

प्रत्येक ग्राहकाला पेट्रोल आणि डिझल क्वालिटी तपासून बघण्याचा अधिकार असतो.

जर तुम्हाला पेट्रोलच्या क्वालिटी विषयी काही संशय असेल तर तुम्ही त्यावर फिल्टर पेपर टेस्ट करू शकता किंवा पेट्रोलचे प्रमाणही तपासून बघू शकता.

 

Petrol-Bunk-Scam-India-inmarathi
cartoq.com

 

७. क्वांटिटीची तपासणी :

आपल्यापैकी कित्येक लोकं पेट्रोल पंप वर जे पेट्रोल भरतात त्यांच्याशी हुज्जत घालतात, कारण बऱ्याचदा पेट्रोल चोरीचे किस्से आपण ऐकलेले असतात!

प्रत्येक पेट्रोल पंपावर क्वांटिटीची तपासणी करण्यासाठी ५ लिटरचे एक मापक असणे आवश्यक असते. ग्राहकाला गरज वाटल्यास तो ह्या मापकाचा वापर करू शकतो.

 

८. किमतीची माहिती :

 

petrol-offers-inmarathi
businesstoday.in

 

प्रत्येक ग्राहकाला पेट्रोल भरण्याआधी त्याची किंमत जाणून घेण्याचा अधिकार असतो. म्हणून प्रत्येक पेट्रोल पंपावर पेट्रोल किंवा डिझलची किंमत मोठ्या अक्षरांत लिहिलेली असते.

कदाचित आपल्याकडे केवळ हाच एक नियम पाळला जातो.

 

९.बिलाचा अधिकार :

आपल्या इथे बरीचशी लोकं ह्या सुविधेचा लाभ घेत नाहीत! पण पेट्रोलचं ब्लॅक मार्केटिंग थांबवण्यासाठी योग्य आणि पक्क बिल मागणं ही आपली जवाबदारी आहे!

प्रत्येक ग्राहकाला पेट्रोलच्या खरेदीनंतर बिल घेण्याचा अधिकार असतो. जेणेकरून जर त्याची फसणूक झाली असेल तर त्या बिलाच्या आधारे तो त्याची तक्रार नोंदवू शकतो.

 

bill at petrol pump inmarathi
janmabhumi.in

 

पेट्रोल पंपावर आपल्या किती सोयी सुविधा आणि अधिकार असतात, पण त्यापैकी एखादाच अधिकार आणि सुविधा आपल्यापर्यंत पोहोचत असावी.

त्यामुळे आता ग्राहक जागा हो आपले अधिकार मिळवा. जर पेट्रोल पंपावर तुम्हाला वरील अधिकार किंवा सुविधा मिळत नसतील किंवा त्या सुविधांचे तुमच्याकडून पैसे आकारले जात असेल.

तर तुम्ही केंद्रीय सार्वजनिक तक्रार व देखरेख प्रणाली येथे आपली तक्रार नोंदवू शकता.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?