ह्या बँकेत एकही कर्मचारी काम करत नाही !

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page

===

बॅंक म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर एकच दृश्य उभं रहातं, ते म्हणजे एका खोलीत असलेले 3-4 काउंटर आणि त्यासमोर ग्राहकांच्या लांबच लांब रांगा. पण जर तुम्ही कुठल्या बँकेत गेला आणि तिथे तुम्हाला एकही व्यक्ती किंवा कर्मचारी दिसला नाही तर? आपल्याला वाटेल की आज बँकेला सुट्टी आहे. पण जर त्या बँकेत तुम्हाला बँकेचे कर्मचारी नाही तर रोबॉट्स दिसले तर.. नक्कीच आपलं डोकं चक्रावून जाईल.

 

robots-inmarathi06
thatsmags.com

पण चीनच्या शांघाय ह्या शहरात जगातील पहिली अशी बँक उघडली आहे जिथे कर्मचारी नाही तर चक्क रोबॉट्स काम करतात. चायना कंस्ट्रक्शन बँक (CCB) नावाची ही सरकारी बँक सध्या जगभरात चर्चेचा विषय बनली आहे. ही बँक मागील आठवड्यात हॉग्पू जिल्ह्यात उघडण्यात आली आहे. चायना कंस्ट्रक्शन बँक (CCB) ही जगातील दुसरी सर्वात मोठी बँक आहे. शांघाई येथे ह्या बँकेच्या एकूण ३६० शाखा आहेत.

 

robots-inmarathi07
ibtimes.co.uk

CCB ची ही ब्रांच पूर्णपणे आर्टिफिशियल इंटेलिजेंस, फेस रिकग्निशन आणि वर्चुअल रियालिटी ह्यावर अवलंबून आहेत. येथे ग्राहकांचे काम करण्यासाठी रोबॉट्स आहेत. सोबतच ह्या बँकेत आर्टिफिशियल इंटेलिजेंस मशीन्स आहेत, ज्या ग्राहकांना सेवा पुरविण्याचे काम करतात.


 

robots-inmarathi08
globaltimes.cn

ह्या बॅंकेतील रोबॉट ग्राहकांशी संवाद देखील साधतात. आर्टिफिशियल इंटेलिजेंसमुळे ते ग्राहकांना त्यांच्या प्रश्नाची उत्तरे देण्यात सक्षम आहेत.
ह्या बँकेच्या एन्ट्री गेटवर एक ह्यूमनॉइड रोबॉट आहे. जो येणाऱ्या ग्राहकांचे स्वागत करतो. त्याचबरोबर तो त्यांच्या प्रश्नांची उत्तरेही देतो.

 

robots-inmarathi02
topyaps.com

बँकेत आत जाण्यासाठी ग्राहकांना आपलं राष्ट्रीय ओळख कार्ड स्वाईप करावं लागतं. त्यानंतरचा ग्राहकांना बँकेत एन्ट्री घेता येते. येथील रोबॉट्स ग्राहकांना खाते उघडण्यापासून ते पैसे ट्रान्स्फर करण्यापर्यंत प्रत्येक काम करतात. जे एखाद्या सामान्य बँकेतील कर्मचारी करतात.

 

robots-inmarathi04
nowtheendbegins.com

आर्टिफिशियल इंटेलिजेंस च्या मदतीने चालविल्या जाणाऱ्या ह्या बँकेबद्दल CCBच्या कर्मचाऱ्यांच्या मते ह्या मानवरहित ब्रांचमुळे बँकिंग सेवा सोप्यारीतीने आणि अधिक गतीने ग्राहकांना पुरविल्या जाऊ शकते. पण ह्या रोबॉट्स असलेल्या बँकेवरून आपल्याला आपलं भविष्य कसं असेलं हे कळू शकते, जिथे मनुष्याला कुठलाही काम करावं लागणार नाही, तो ह्या रोबॉट्सच्या भरवश्यावर कुठलाही काम सहजपणे आणि अधिक गतीने करू शकतो.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *