' लाल-पांढऱ्या रंगाची अशी क्रेझ तुम्ही आजवर कधीही बघितली नसेल! – InMarathi

लाल-पांढऱ्या रंगाची अशी क्रेझ तुम्ही आजवर कधीही बघितली नसेल!

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

प्रत्येकाला कोणता न कोणता छंद असतो. प्रत्येकाचे छंद वेगवेगळे असतात. पण काहींचे छंद असे असतात, ज्याची आपण कल्पना देखील करू शकत नाही. आज आम्ही तुम्हाला अशा एका माणसाची गोष्ट सांगणार आहोत, ज्याने खूप वेगळ्या प्रकारचा छंद जोपासला आहे. या माणसाच्या घरामध्ये आणि त्याच्या आजूबाजूला नेहमी लाल आणि पांढऱ्या रंगाच्याच गोष्टी दिसतील. चला तर मग जाणून घेऊया, या माणसाबद्दल आणि त्याच्या अनोख्या छंदाबद्दल..

 

Red and white family bangalore.Inmarathi
dnaindia.com

बंगळूरूच्या एका व्यक्तीला लाल आणि पांढऱ्या  रंगाची अशी काही उत्कटता आहे की, त्याने आपल्या घरच्या भिंती, पडदे, कार आणि कटलरी यांच्याबरोबरच त्यांचे कपडे देखील याच रंगाचे आहेत. या रियल इस्टेट एजंट सवनराज याने आपला सर्वांपेक्षा वेगळा छंद जोपासण्यासाठी त्याने आपल्या आसपासच्या जगाला दोन रंगांमध्ये रंगवले आहे.

 

Red-and-white-family-bangalore.Inmarathi1.jpg
ibtimes.co.uk

सवनचा हा क्रेझ एवढा आहे की, त्यांच्या घरातील कोणतीही गाडी मग ती दुचाकी असो वा चारचाकी लाल आणि पांढऱ्या रंगाच्या आहेत. तसेच, त्यांचे संपूर्ण कुटुंब याच दोन रंगाचे कपडे घालतात.

 

Red and white family bangalore.Inmarathi2
jagranimages.com

एवढेच नाही तर, सवनच्या घरातील संपूर्ण इंटिरियर देखील लाल आणि पांढऱ्या रंगाचेच आहे. सोफा असो वा भिंती किंवा पडदे या दोन रंगांच्या कॉम्बिनेशनमध्ये दिसतात. त्यांच्या घरातील लिव्हिंग रूममध्ये या विचित्र छंदापासून फक्त टीव्हीच वाचलेला दिसून येतो.

 

Red and white family bangalore.Inmarathi3
ntd.tv

इतर कुणी एकसारख्या रंगांमध्ये राहून वेडा होऊन जाईल. पण सवनराज बरोबर असे काही झाले नाही. ते आपल्या या छंद जोपासण्यावर खूप खुश आणि संतुष्ट आहे आणि ते कधीही कंटाळत नाही. सवन हे ह्या रंगांचे खूप वेडे आहेत, त्यामुळेच घर, गाडी आणि कपड्यांवरच त्यांचा हा छंद संपत नाही तर त्यांच्या प्रत्येक फॅशन अॅक्सेसरीज जसे फोनचे कव्हर, घड्याळ, अंगठी, किचन आणि हेडफोन देखील लाल आणि पांढऱ्या रंगाचे आहेत.

 

Red and white family bangalore.Inmarathi4
dailymail.co.uk

एवढेच नाही तर तुम्ही हे पाहून थक्क व्हाल कि, सवनने टूथपेस्ट, टूथब्रश आणि टॉयलेट अॅक्सेसरीज देखील लाल आणि पांढऱ्या रंगाच्या वापरतात. सवनचे ऑफिस देखील लाल आणि पांढऱ्या रंगाचे आहे.

 

Red and white family bangalore.Inmarathi5
entertales.com

जेवणाचा रंग बदलता येत नाही, म्हणून सवन यांनी डायनिंग टेबलला, खुर्च्यांना, टेबल मॅटला आणि क्रॉकरीला देखील या रंगाचे बनवले आहे. त्यांनी सर्वच गरजेच्या वस्तू या रंगांमध्ये तयार केलेल्या आहेत.

 

Red and white family bangalore.Inmarathi6
dailymail.co.uk

आपल्या या सर्वांपेक्षा हटके छंदामुळे सवनराज बंगळूरूमध्ये एका सेलिब्रिटीसारखे प्रसिद्ध झाले आहेत आणि त्यांच्या कुटुंबाला रेड अॅन्ड व्हाइट फॅमिली म्हणून ओळखतात.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?