निरोधाचा कंडोम : मैथुनाचा आनंद की सुरक्षा? महत्वाचं काय?

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===


लेखक : विनीत वर्तक

===

दूरदर्शन च्या त्या दिवसात “कॉपर टी” आणि हम दो हमारे दो सोबत निरोधाची जाहिरात नेहमीच दिसत असे. त्याकाळी ते बघताना स्पेशली घरात सगळे असताना अवघडल्यापेक्षा नक्की काय असते ह्याची उत्सुकता जास्ती असायची. कारण “निरोध म्हणजे काय?” हे विचारणार तरी कोणाला?

 

deluxenirodh ad 1 inmarathi

 

deluxenirodh ad 2 inmarathi

 

काळ बदलला. निरोध ची जागा कंडोम नी घेतली. आधी त्यात कामसूत्र आलं आणि मग ड्युरेक्स झालं. त्यात कलर आले, फ्लेवर आले. त्यात प्लेजरसाठी रीब्स आल्या. पण हे सगळं करताना निरोधाचा मुळ उद्देश कंडोम द्वारे पुढल्या पिढीपर्यंत पोचवण्यात कुठेतरी आपण मागे पडलो असं खेदाने म्हणावं लागेल.

आजही कंडोम बोललो कि लोकांच्या नजरा मागे वळतात.

खरं तर गर्भधारणा होऊ नये म्हणून आणि सेक्शुअल आजार पसरू नये म्हणून एक पडदा म्हणून काम करणारं निरोध, कुठेतरी आता सन्नी लियोन ला दाखवताना चैन म्हणून त्याचा वापर करताना सांगणे – म्हणजे त्याचा मुळ उद्देश बाजूला ठेऊन नको त्या पद्धतीने समोर नेणं.

दात चांगले राहावे म्हणून डॉक्टरांच्या वेशात अनेक डेन्टीस्ट झाडून सगळ्या टूथपेस्ट च्या जाहिराती करत असतात. कारण हेच की वैज्ञानिक दृष्टीने आमचं प्रोडक्ट हे दात अधिक चांगले ठेवू शकते.

पण कंडोम च्या जाहिरातीला मात्र सन्नी लियोन लागते किंवा कोणीतरी हॉट मॉडेल – जी कि अतिशय तंग कपड्यात काहीतरी गरम करणारे हाव भाव करत आपल्या समोर येते. त्यात ६ प्याक दाखवणारा कोणीतरी असतो. मर्दानगी दाखवताना प्लेजर साठी मधेच कंडोमचे पाकीट येते. जणू काही हेच वापरलं तर आणि तरच प्लेजर मिळणार.


 

manforce ad inmarathi

 


कंडोम कसा वापरावा, त्याचा उपयोग कसा करावा, वापरून झाल्यावर त्याची कशी व्हीलेव्हाट लावावी – हे कुणी सांगत नाही. कंडोम वापरण्याचे फायदे, तोटे, त्यातील अडचणी तुम्हीच समजून घ्यायच्या. त्याची माहिती कुठेच नसते. कंडोमचा वापर प्लेजर साठी होऊ शकतो असं असलं तरी त्याचा मुळ उद्देश हा गर्भनिर्मिती रोखणे आणि सेक्शुअल आजार पसरू नये हा असताना त्याच्या प्लेजर बद्दल जास्ती सांगितले जाते.

कितीतरी पुरुषांना कंडोम वापरायला आवडत नाही. कारण “त्यात मज्जा येत नाही” असे त्यांचे म्हणणे असते. “भले ५-६ वेळा गर्भपात केला तरी चालेल, पण कंडोम नको!” अशी धारणा असणारे अनेक आहेत. हे म्हणजे सिट बेल्ट सारखं आहे. पोलीस असेल तर लावायचा…! म्हणजे आपला जोडीदार (अधिकृत!) सोडून दुसरा कोणी असेलच तरच कंडोम वापरायचा. बाकी आपला जोडीदार असेल तर काहीही चालते.

वास्तविक सिट बेल्ट लावल्यामुळे थोडा त्रास झाला तरी आपला जीव वाचवण्याची त्याची ताकद असते. कंडोम पण तर सेम असते ना! मग सिट बेल्ट वापरणे अनिवार्य करू शकतो तर आपण आपल्या जोडीदाराला ही कंडोम वापरण्यास प्रवृत्त करणे गरजेचे आहे.

अर्थात हे पाउल किती स्त्रिया उचलतील ह्याबद्दल शंका आहे. कारण अजूनही कंडोम सारखा विषय काढणंच हे “घाण” किंवा वाईट विचार करणे असे समजले जाते.

कंडोम च्याजाहिरातींवरील बंदी समर्थनीय नसली तरी योग्य तर्हेच्या जाहिराती समोर येणे गरजेचे आहे.

इंटरनेटच्या काळात अशी बंदी काहीच उपयोगी नाही. रोज १ जीबी चा वापर करून पोर्न ते यु ट्यूब चे व्हिडीओ बघणारी पिढी असताना टी.व्ही. वर सकाळी ६ ते रात्री १० कंडोम च्या जाहिरातीवर बंदी टाकून काय होणार आहे? जाहिरातीवरील बंदी पेक्षा त्यातून समोर येणाऱ्या मेसेज वर काहीतरी उपाययोजना गरजेची होती.

कंडोम म्हणजे काय? ते कसे लावतात? अश्या प्रश्नांची उत्तरे देणारी, कंडोमचे प्रकार आणि त्याचा वापर ह्याची माहिती देणारी एखादी जाहिरात हि नवीन पिढीला सावध तर करेलच पण त्यातून प्लेजर कसं घ्यायचं हे हि शिकवेल.

 

smriti_irani-marathipizza

 

एड्स आणि इतर आजार आपल्या सभोवती फिरत असताना कंडोम १००% सुरक्षा देतेच असं नाही. पण ते वापरताना काळजी घेतली तर आपण आपला बचाव करू शकतो. प्लेजर मिळत नाही म्हणून कंडोम न वापरण आपल्या जोडीदाराच्या जीवावर पण बेतू शकते.

आपल्या जनेनइंद्रियातून निघणाऱ्या ल्युब्रिकेशन स्त्रावात पण आजार पसरवणारे विषाणू असू शकतात. त्यामुळे सेक्स कधीच पूर्णपणे सेफ नसतो.

गर्भपात हा जखम झाल्यावर वाढू नये म्हणून उपाय असतो. पण कंडोम हा आपला सिट बेल्ट असतो. त्यामुळे त्याचा वापर करणे हे आपण पुरुष म्हणून स्वीकारायला हवं.

कंडोम विकत घेणे, तो वापरणे आणि आपली सुरक्षा करणे हे आपल्या हातात आहे. कोण काय बोलते ह्या पेक्षा आपल्या सुरक्षेची काळजी आपल्याला जास्त असायला हवी. कोणत्याही वयात कंडोम चा वापर हा आपल्यासाठी लाभदायकच असतो.

आपल्या आयुष्यातल्या जोडीदाराशी जेव्हा गोष्टी निगडीत असतात अश्यावेळी सन्नी लियोन आणि आपला जोडीदार ह्यात खूप फरक आहे हे समजण्याची मानसिकता आपल्यात असायला हवी. निरोधाचा कंडोम झाला असला तरी त्याला समजून घेतल तर सुरक्षेसोबत प्लेजर आपोआप मिळते.


===

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017  InMarathi.com | All rights reserved.
3 thoughts on “निरोधाचा कंडोम : मैथुनाचा आनंद की सुरक्षा? महत्वाचं काय?

 • September 7, 2018 at 1:07 am
  Permalink

  hahaha

  Reply
 • December 10, 2018 at 1:34 am
  Permalink

  कंडोम च्या अश्लिल जाहीरातींवर बंदी घालावी या करीता मी पंतप्रधान,आय .बी.मंत्रालय ,ASCI यांचे येथे सर्वप्रथम तक्रार केली होती .त्यावर त्यांनी निर्णय घेऊन सकाळी सहा ते रात्री दहा वाजेपर्यंत बंदी घातली हे माझ्यामते अतिशय योग्य आहे.कारण मुळ उद्देश सोडून इतर गोष्टींनाच यामधे दाखविण्यात येत होते. मॅनफोर्स तसेच प्लेगार्ड हे तर फारच अश्लिल जाहीराती दाखवित होते. जास्मिन , चॉकलेट ,स्ट्रॉबेरी ,डॉटेड ,एक्सट्रा टाईम आणी काय -काय .घरी कटुंबाबरोबर एकत्र बसुन टि .व्ही.बघतांना या जाहीराती सुरु झाल्यावर अक्षरश: मान खाली घालावी लागे.शहरात नसेल परंतु गावात एकत्र कटुंब पद्धती अजुनही आहे .क्रिकेटची मॅच बघतांना आजी,आजोबा ,आई,वडील,भाऊ,बहीण, मुले यांच्या समवेत जर प्रत्येक ओव्हरला या जाहीराती सुरू झाल्यास फार विचीत्र परीस्थीती होते .टी.व्ही.हा आज प्रत्येक घरातील एक सदस्य आहे .त्यावरील कार्यक्रम बघुन प्रत्येकाच्या मनावर चांगले -वाईट परीणाम होत असतात . याकरीता अश्या अश्लिल जाहीरातींवर घातलेली बंदी अतिशय योग्य आहे .

  Reply
 • December 10, 2018 at 1:39 am
  Permalink

  वरील प्रतिक्रीया देतांना माझे नाव लिहीण्याचे राहीले.माझे नाव … राजेश बन्सीलाल मंटाला , कोपरगांव , जि .अ.नगरमो.नं….8793501122

  Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?