' एअरस्ट्राईक पुर्वीही बालाकोटचा जिहादी तळ आपण उद्धवस्त केला होता : वाचा हा रक्तरंजित इतिहास – InMarathi

एअरस्ट्राईक पुर्वीही बालाकोटचा जिहादी तळ आपण उद्धवस्त केला होता : वाचा हा रक्तरंजित इतिहास

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

===

२६ फेब्रुवारीला भारतीय वायुसेनेने पाकव्याप्त काश्मीर व बालाकोटवर बॉम्बहल्ले करून तिथे असलेले जैश ए महंमदचे जिहादी तळ उद्धस्त करून अनेक जिहादी यमसदनी पाठवले.

ह्या आधी जवळजवळ २०० वर्षांपूर्वी बालाकोटमध्येच असलेल्या जिहादींचे लाँचपॅड शीख सैन्याने उध्वस्त करून जिहादींवर विजय मिळवला होता.

हे दहशतवादी तळ एका रायबरेलीच्या माणसाने तयार केले होते. सय्यद अहमद बरेलवीने बालाकोट ह्या ठिकाणी जिहादी तळ तयार केले होते.

हा सय्यद अहमद बरेलवी हा उत्तर प्रदेशमधील बरेलीचा होता. तो अतिशय कट्टर मुसलमान होता. त्यामुळे संपूर्ण भारतीय उपखंडात इस्लामिक राज्य स्थापन करण्याची त्याची मनीषा होती.

त्या काळात मुघल साम्राज्य डबघाईला आले होते आणि मराठे, जाट आणि शीख लोकांनी मुघल साम्राज्य काबीज केलं होतं.

तसेच त्यात भर म्हणून शक्तिशाली ब्रिटिश साम्राज्याचा सुद्धा हिंदुस्थानवर डोळा होता. हे सगळे लोक म्हणजे इस्लामिक राष्ट्राचे शत्रू होते.

 

ranjit-singh-inmarathi
india.com

 

इस्लामिक राष्ट्र तयार करायचे म्हणजे त्यासाठी हाताशी शक्तिशाली सैन्य असायला हवे.

ते सैन्य तयार करण्यासाठी सय्यद अहमद बरेलवी हा वायव्य सरहद्द प्रांतात म्हणजेच सध्याच्या पाकिस्तानमधील खैबर पख्तुनख्वा हा प्रांत त्याने निवडला!

त्याला असे वाटले की ह्या भागातील लोक तसेच शेजारील अफगाणिस्तान मधील लोक त्याच्या बाजूने उभे राहतील.

अफगाणिस्तान मध्ये तसेच त्या प्रदेशात मुसलमान लोक राहत होते.

त्यांनाही इस्लामिक राष्ट्राची कल्पना पटेल, काफ़िरांनी काबीज केलेला हा प्रदेश परत इस्लामिक साम्राज्यात यावा ही कल्पना ते उचलून धरतील व आपल्या बाजूने उभे राहून शक्तिशाली सैन्य उभे करण्यात आपल्याला मदत करतील अशी त्याला आशा होती.

तिथले स्थानिक लोक हे महाराज रणजित सिंग ह्यांच्या शीख साम्राज्यात खुश नाहीत त्यामुळे ते आपल्याला साथ देतील अशी त्याची धारणा होती.

त्याने ह्या भागात जाऊन अडीच हजार मुजाहिद्दीन लोकांची शक्तिशाली सेना तयार केली. त्याच्या सैन्यात पटना पासून ते अफगाणिस्तानपर्यंतचे लोक होते.

ह्या सैन्यासह तो सिंध, क्वेट्टा, कंधार आणि काबुल असे मार्गक्रमण करीत करीत पेशावरपर्यंत पोहोचला.

पाकिस्तानी लेखक अझीझ अहमद ह्यांच्या मते बरेलवी हा त्याच्या सैन्यबांधणीसाठी वायव्य सरहद्द प्रांतात अनेक ठिकाणी फिरला. तब्बल पाच वर्ष तो त्यांच्या सैन्याची उभारणी करीत होता. त्यानंतर १८३१ साली तो बालाकोटला पोहोचला.

हे ही वाचा :

===

 

Syed_Ahmad_Barelvi-inmarathi
opinions.com

 

बालाकोट हे ठिकाण नैसर्गिक दृष्टीनेच खूप जास्त सुरक्षित आहे. त्यामुळे लष्कराचा तळ उभारण्यासाठी हे अत्यंत सुरक्षित ठिकाण आहे. ह्या बालाकोटच्या एका बाजूला डोंगर तर दुसऱ्या बाजूला नदी आहे.

त्यामुळे ह्या ठिकाणापर्यंत काफिर पोहोचूच शकणार नाहीत हा आत्मविश्वास बरेलवी ला होता.

त्यावेळी सिंध आणि पंजाब प्रांतावर १८०२ साली महाराजा रणजित सिंह राज्यकारभार सांभाळत होते.

त्यांच्या ४० वर्षांच्या कार्यकाळात त्यांना सतत अफगाणी आणि पठाणी लोकांकडून उपद्रव झाला. मात्र त्यांचे हे आक्रमण परतवून लावण्यात महाराज रणजित सिंह ह्यांचे सेनापती हरिसिंह नलवा ह्यांची प्रमुख भूमिका होती.

१८०२ मध्ये हरिसिंह नलवा ह्यांच्या नेतृत्वाखाली शीख सैन्याने पठाण शासक निजामुद्दिनचा पराभव केला.

१८०७ साली मुलतानचा शासक मुजफ्फर खान हा सुद्धा चाल करून आला असता हरिसिंह नलवा ह्यांनी त्याला धूळ चाटवून त्याच्याच कडून कर वसुली करणे सुरु केले.

हरिसिंह नलवा ह्यांच्या पराक्रमाची कीर्ती पेशावर पासून काबुल पर्यंत सर्वदूर पसरली. मुसलमान लोक त्यांचे नुसते नाव काढले तरी घाबरत असत.

त्यांनी मुलतान आणि अटकेवर ताबा मिळवला आणि नंतर त्यांनी पेशावर आणि काश्मीरवर लक्ष केंद्रित केले. त्यांनी काश्मीर सुद्धा जिंकले आणि हरिसिंह नलवा ह्यांची काश्मीरचा सुभेदार म्हणून नियुक्ती केली.

ह्यामुळे काश्मीर सुद्धा शिखांच्याच अधिपत्याखाली आले. १८२२ साली हरिसिंह नलवा ह्यांना अफगाणांचा गड असलेल्या “हजारा” ह्या ठिकाणचे शासक म्हणून जबाबदारी देण्यात आली.

 

scoopwhoop.com

 

इकडे बरेलवीचे सैन्य उभारण्याचे प्रयत्न सुरुच होते. पठाण आणि अफगाणी सैन्यात प्रशिक्षित सैनिकांसह जिहादी सैन्य सुद्धा होते.

१८२३ साली अटकेच्या पुढे असलेल्या नोशहरामध्ये अफगाण-पठाण सैन्य व शीख सैन्य ह्यांच्यात घनघोर युद्ध झाले.

ह्या युद्धात सहा हजार अफगाण सैनिक मारले गेले. शिखांच्या सैन्याचे सुद्धा मोठे नुकसान झाले. त्यांचेही अनेक सैनिक हुतात्मा झाले. पण अखेर विजय हरिसिंह नलवा ह्यांचाच झाला.

पण पठाण आणि अफगाणी लोकांनी संघर्ष सुरूच ठेवला. याच लोकांना आपल्या सैन्यात स्थान देऊन सय्यद अहमद बरेलवीने आपले शक्तिशाली सैन्य उभारले व त्यात जिहादी सुद्धा समाविष्ट होते. त्यांचा तळ बालाकोट येथे होता.

१८२७ साली त्याने पन्नास हजार जिहादी व पेशावरमधील वीस हजार सैन्यासह शिखांच्या साम्राज्यावर हल्ला केला. पेशावरपासून ३२ किलोमीटर लांब असलेल्या पीरपाई ह्या ठिकाणी शीख व जिहादी ह्यांच्यात भयंकर युद्ध झाले.

ह्या युद्धात शिखांनी त्यांची शूर व लढाऊ वृत्तीचे प्रदर्शन करीत जिहादींना कडवे प्रत्युत्तर दिले.

बुधसिंह सन्धावालिया ह्यांच्याकडे दहा हजारांचे सैन्य होते. आणि १२ तोफा होत्या. ह्या सगळ्यांचा उपयोग करून त्यांनी जिहादींना कडवे प्रत्युत्तर दिले आणि सहा हजार मुजाहिद्दीनांना नरकाचा रस्ता दाखवला.

ह्यांचा म्होरक्या सय्यद अहमद बरेलवी पाठीला पाय लावून पळाला आणि स्वातच्या डोंगरांत लपून बसला. पण तरीही त्याने त्याचा लढा थांबवला नाही.

हे ही वाचा :

===

 

balakot-inmarathi
sikhnet.com

 

हरीसिंह ह्यांचे सेनापती शेरसिंह आणि त्यांचे सैन्य बरेलवी व त्याच्या मुजाहिद्दीनांसाठी तयारीतच होते. बालाकोट येथे त्याचा जिहादी तळ आहे हे त्यांना ठाऊक होते.

त्यामुळे शेरसिंह ह्यांचे काही सैन्य बालाकोटला लागून असलेल्या डोंगररांगांत दबा धरून बसले.

बरेलवीचा अंदाज होता की शिखांचे सैन्य आधी हल्ला करेल आणि नदीमुळे चिखल भरपूर असलेल्या मोठ्या मैदानांत अडकून पडेल. परंतु बरेलवीचा अंदाज साफच चुकला.

शिखांनी आधी हल्ला केलाच नाही. शीख सैन्य त्या डोंगररांगात शांतपणे मुजाहिद्दीनांची वाट बघत थांबले.

आणि मुजाहिद्दीन लोकांनी ६ मे १८३१ रोजी हल्ला केला. शुक्रवारचा दिवस होता.

त्या दिवशी सकाळी जेव्हा मुजाहिद्दीन सैन्य मिट्टी कोट येथे शत्रूकडे लक्ष ठेवत सकाळची न्याहारी करीत होते तेव्हा त्यातील एकाला म्हणजेच पटियाळाच्या सय्यद चिराघ अलीला अचानक खीर खाण्याचे डोहाळे लागले. पण त्यांच्या न्याहारीत खीर केली नव्हती.

त्यामुळे त्याने स्वतःच सगळे साहित्य एकत्र केले आणि तो स्वतःच खीर करायला बसला. खीर करत असताना त्याचे डोंगरावर बसलेल्या शिखांकडेही लक्ष होते.आणि अचानक त्याला काहीतरी दिसले व तो ओरडला की,

“मला तिथे लाल कपडे घातलेली एक सुंदर हूर दिसली..ती मला बोलावते आहे..”

त्याने खीर ढवळत असलेला चमचा फेकला आणि ठरवले की ती खीर तो त्या “हूर”च्याच हातून खाईल, असे म्हणत तो डोंगराकडे निघाला.

हे सगळे इतके अचानक घडले की इतर कुणाला काय घडतेय हे काहीच कळले नाही. चिराघ अली धावत पळत चिखल भरलेल्या मैदानात पोहोचला.

वरती डोंगरावर बसलेले शीख सैन्य हे सगळं बघत होते आणि आयत्याच सापडलेल्या चिराघ अलीला त्यांनी तिथे चिखलातच गोळी घालून ठार केले. ह्यानंतर त्या ठिकाणी खूप गोंधळ उडाला.

 

jihad-inmarathi
twitter.com

 

सय्यद बरेलवीने आधीची योजना सोडून त्याच्या माणसांना हल्ला करण्याची आज्ञा दिली.

आपल्या प्रमुखाची आज्ञा ऐकून सगळे मुजाहिद्दीन चिखलाच्या मैदानात हल्ला करण्यासाठी उतरले. हे बघून शीख सैन्य सुद्धा मैदानात उतरले.

वाहे गुरुजी की फतेह आणि अल्लाहू अकबर ह्या घोषणा घुमू लागल्या. शीख सैन्याने मुजाहिद्दीन सैन्यावर विजय मिळवला.

ह्या घनघोर लढाईत सय्यद अहमद आणि शाह इस्माईल ठार झाले. आणि इतर अनेक मुजाहिद्दीन सुद्धा ठार झाले. असे म्हणतात की ह्या युद्धात ३०० ते १३०० मुजाहिद्दीन, जिहादी ठार झाले. त्यांचा संपूर्ण तळच उध्वस्त झाला.

आज जवळजवळ २०० वर्षांनी इतिहासाची पुनरावृत्ती झाली आणि आपल्या वायुसेनेने अतुलनीय शौर्याचे प्रदर्शन करीत ह्याच जिहादी दहशतवाद्यांचा बालाकोट येथील तळ उध्वस्त करून भरपूर दहशतवाद्यांना यमसदनी पाठवले.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?