या सात चुकीच्या सवयी तुमची लैंगिक उद्दिपनाची क्षमता कमी करतात

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर

===


सध्या जीवनपद्धती बदलली आहे. काम, कामानिमित्त सततचे दौरे, घरी बसून सुद्धा ऑफिसचंच काम करणं यामुळे वैवाहिक जीवनावर खासकरून लैंगिक आयुष्यावर गंभीर परिणाम होत आहे. ज्यामुळे उदासीनता वाढत आहे. यातून लैंगिक उद्दीपणाची समस्या उभी राहत आहे.

आजच्या अत्यंत व्यस्त अश्या जीवनशैलीत आपलं वैयक्तिक आयुष्य मागे राहून जात आहे. आपण एकमेकांसोबत वेळ देऊ शकत नाही. यामुळे लैंगिक इच्छेला प्रचंड धक्का पोहचला आहे.

शारीरिक सुखाकडे संपूर्णतः दुर्लक्ष होत आहे ज्यामुळे नात्यात तणाव निर्माण होत आहे. प्रणय ही फक्त एक निकड म्हणून बघितली जाणारी गोष्ट बनली आहे.

पण एक आनंद देणारी गोष्ट म्हणून तिच्याकडे बघितलं जात नाही. ज्यामुळे प्रणयात असंतुष्ट रहावं लागत आहे.

 

 

unsatisfied-sex-inmarathi
Huffingtonpost.com

परंतु आपल्या जोडीदाराला यासाठी जबाबदार ठरवण्याआधी व वाद घालून नात्यात दुरावा निर्माण करण्याआधी, थांबा.

आधी हे वाचा आणि विचार करा ! तुमच्या नात्यातील या दुराव्यामागे नेमकी कारणं कोणती ते जाणून घ्या.

१ ) मद्यपान करणे :


रात्रीच्या जेवणानंतर एक ग्लास बियर अथवा वाईन प्यायल्यास हरकत नाही. पण तुम्ही एकापेक्षा जास्त ग्लास मद्यपान करत असाल तर मात्र याचा तुमच्या लैंगिक आयुष्यावर गंभीर परिणाम होतो. यातून तुमची लैंगिक उद्दीपन क्षमता कमी होते.

 

beer-effects-marathipizza10
express.co.uk

नशेच्या अवस्थेत प्रणयाची इच्छा नाहीशी होते. शरीर डीहायड्रेट झाल्यामुळे प्रणयक्रीडेचा वेग मंदावतो.

हवी तशी उत्कंठा राहत नाही. मेंदूचे कार्य मंदावते आणि याचा परिणाम तुमच्या शरीरातील सेक्स हार्मोन्सच्या उत्सर्जनावर होतो. ज्यामुळे पूर्ण प्रणयक्रीडाच निरस होते.

२) अनियमित व अपुरा व्यायाम :

नियमित व्यायाम हा शारीरिक तंदुरुस्तीसाठी अत्यावश्यक आहे. यामुळे लैंगिक आयुष्य सुद्धा वाढते. दिवसभर एका ठिकाणी बसून सतत काम केल्याने आळस येतो. याचा परिणाम प्रणयाच्या वेळी दिसून येतो.

gym-marathipizza06

 

दिवसभर बसून राहण्याने रक्ताभिसरण संस्थेवर परिणाम होतो. इतर भागाप्रमाणे लैंगिक अवयवांवर पण ह्याचा गंभीर परिणाम होतो.

त्यामुळे नियमित व्यायाम करत राहिलं पाहिजे. ज्यामुळे लैंगिक क्षमता तर वधारते आणि व्यक्ती निरोगी पण राहतो. प्रणयक्रीडा यामुळे अधिकच बहारदार होते.

३) अपूर्ण निद्रा :

बऱ्याचदा झोपतांना त्रास होतो. खूप कमी झोप आणि निद्रानाशामुळे कॉर्टिसोल नामक तणाव उत्पादक हार्मोन्सचं उत्सर्जन वाढतं. ज्याचा सरळ परिणाम टेस्टोस्स्टेरॉनच्या उत्सर्जनावर होतो.

त्याचं उत्सर्जन मंदावल्यामुळे पुरुषांच्या लैंगिक क्षमतेवर गंभीर परिणाम होत असतो. अनियमित व कमी झोप घेणाऱ्या स्त्रियांना चरमानंदापर्यंत पोहचता येत नाही.

 

sleeping-inmarathi11
indianexpress.com

जर तुम्ही अथवा तुमचा पार्टनर प्रणयात अपयशी ठरत असेल तर तुमची अत्यल्प झोप देखील त्याचं एक महत्वपूर्ण कारण असू शकते.

४) झोपण्याआधी बातम्या बघणे :

झोपण्याआधी त्याहीपेक्षा प्रणय करण्याआधी कधीही बातम्या बघू नका. तुम्ही दिवसभराच्या कामाने थकलेले असतात. त्यात तुम्ही बातम्या, वाहिन्यांवरील राजकीय चर्चा, गुन्हेगारी बातम्या बघितल्या तर तुमचं मन अधिक व्यथित होतं.

त्यामुळे तुमच्या दिवसभराच्या तणावात आजून भर पडते. ज्याचा परिणाम प्रणयाच्या इच्छा आकांक्षेवर होतो.

 

erectile-dysfunction-inmarathi
TheHealthSite.com

त्यामुळे प्रणयाआधी तुमचा मुड आनंदी असला पाहिजे. तुम्ही प्रणय करण्याआधी शॉवर घ्या. मस्त फ्रेश व्हा ज्यामुळे तुमच्यात नवचैतन्य निर्माण होईल आणि याचा सरळ परिणाम प्रणयावर होईल. यामुळे तुम्ही एक अविस्मरणीय प्रणयाची अनुभूती घेऊ शकतात.

५) स्मार्टफोनचं व्यसन :

जेव्हा तुम्ही तुमच्या पार्टनर सोबत असतात तेव्हा स्मार्टफोन वापरणे, मेसेज करणे, चॅट करणे, फेसबुक चेक करण्यासारख्या गोष्टी टाळल्या पाहिजेत. हे लैंगिक आयुष्यावर परिणाम व्हायचं सर्वात मोठं कारण आहे. यामुळे तुमच्या नात्यात दुरावा येतो.

यामुळे तुमचा तणाव तर हलका होत नाहीच पण तुम्हाला जास्त तणाव येतो आणि सोबत लैंगिक निरुत्साह निर्माण होतो.

 

dailyo.com

आपल्या बिछान्यापासून स्मार्टफोन नेहमी पंधरा वीस फूट लांब ठेवा. हातांचा उपयोग फक्त तुमच्या जोडीदाराला गोंजारण्यासाठी करा यामुळे तुमच्यातील कामुकता जागृत होईल आणि एक बहारदार प्रणय घडून येईल.

६) उशिरा रात्रीचं जेवण करणे :

हे देखील लैंगिक आयुष्य खराब होण्याचं महत्वपूर्ण कारण आहे. तुम्ही दोघेही जेव्हा दिवसभराच्या कामामुळे थकलेले असाल अश्यावेळी तुम्ही साधारणतः नऊच्या सुमारास जेवलं पाहिजे.

 


sex-freuency-inmarathi
evanmarckatz.com

जर जास्त उशीर केला तर थकव्यामुळे व सकाळच्या शेड्युलमुळे प्रणयावर परिणाम होऊन तो खोळंबतो.

७) अति आहार :

होय हे देखील प्रणय जीवनावर परिणाम होण्याचं एक महत्वपूर्ण कारण आहे. जास्त जेवण केल्याने सुस्ती येते. झोप येते. यामुळे प्रणय करण्याची इच्छा नष्ट होते. दुपारी भरपेट जेवल्याने संपूर्ण दिवस सुस्त जातो. उठबस, हालचाल होत नाही त्यामुळे प्रणय करण्याची इच्छाच उरत नाही. रात्रीच्या जेवणाने सुद्धा असेच परिणाम होतात.

दिवसभरच्या थकव्यावर भरपेट जेवल्यानंतर झोप येते आणि माणूस कुठलीच क्रिया करण्याच्या मनस्थितीत राहत नाही.

जेवण जरी शरीराला ऊर्जा देत असलं आणि प्रणय करताना ताकद पुरवत असलं तरी त्याच्या अधिक सेवनाने शरीर सुखाकडे मात्र दुर्लक्ष होतं. त्यामुळे संतुलित भोजन केलं पाहिजे.

 

eating-inmarathi
m3india.com

अश्याप्रकारे एक निरामय आयुष्य जपल्यास आणि आपल्या जोडीदाराच्या आवडी निवडीकडे लक्ष दिल्यास, सोबत वेळ घालवल्यास, एकमेकांच्या सानिध्यात वेळ घालवल्यास लैंगिक आयुष्य बहारदार तर होतेच पण तुमचं नातं अतूट राहतं व तुम्ही सुखी राहतात.


===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?