' आता बाबा रामदेव यांनी देखील केली मोदींच्या नोटाबंदीच्या निर्णयावर टीका! – InMarathi

आता बाबा रामदेव यांनी देखील केली मोदींच्या नोटाबंदीच्या निर्णयावर टीका!

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

==

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदीचा निर्णय अतिशय आत्मविश्वासाने जाहीर केला खरा आणि जनतेला केवळ ५० दिवस त्रास सहन करण्याचे आवाहनही केले. परंतु अवघ्या महिन्याभारच्या आतच या निर्णयाचे विपरीत परिणाम दिसू लागले आणि मोदींच्या या ऐतिहासिक निर्णयावर टीका करण्यास सुरुवात झाली.

एकीकडे जनता केवळ २००० रुपयांसाठी बँकेच्या रांगेत तासनतास उभी आहे आणि दुसरीकडे बंडलच्या बंडलं लोकांच्या घरी, ऑफिसमध्ये, गाड्यांमध्ये सापडत आहेत. म्हणजे जनता उपाशी आणि काही मुठभर लोक तुपाशी असे चित्र सध्या देशभर दिसत आहे. त्यामुळेच जो निणर्य “देशहितासाठी” घेतला आहे अशी लोकांची भावना होती ती बदलून आता हा निर्णय नक्की कोणासाठी घेतला असा प्रश्न जनता विचारू लागली आहे. असाच काहीसा प्रश्न उपस्थित केलाय बाबा रामदेव यांनी !

baba-ramdev-and-modi-marathipizza

स्रोत

मोदींचे खंदे समर्थक आणि काळ्या पैश्याचा विरोध करणारा प्रभावी चेहरा म्हणून  बाबा रामदेव देशभरात चर्चेत असतात. त्यामुळे त्यांनी मोदींच्या नोटाबंदीच्या निर्णयावर टीका केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. गेल्या पंधरवड्यात देशभरात सापडत असणाऱ्या नव्या नोटांच्या घबाडामुळे बाबा रामदेव यांनी या निर्णयावर सडकून टीका केली आहे. रिझर्व बँक ऑफ इंडिया आणि काही बँक अधिकारी यांनी मिळून नोटाबंदीच्या निर्णयाचा फायदा उचलीत करोडोंचा घोटाळा केल्याचा आरोप बाबा रामदेव यांनी केला आहे.

बाबा रामदेव यांनी सांगितले की,

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निर्णय लागू करण्यापूर्वी बँकिंग व्यवस्थेतील खाच खळग्यांकडे लक्ष देणे गरजेचे होते. त्याकडे दुर्लक्ष केल्याने नोटाबंदीचे विपरीत परिणाम दिसून येत आहेत. परिणामी चांगल्या निर्णयाचा बट्ट्याबोळ झालेला आहे.

 

baba-ramdev-marathipizza

स्रोत

मोदींच्या प्रत्येक निर्णयाचे समर्थन करणाऱ्या बाबा रामदेव यांनी मोदींच्या निर्णय अंमलबजावणीवरचं प्रश्न चिन्ह उभे करीत मोदींना आणि सरकारला घरचा आहेर दिला आहे.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017  InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?