' स्पृहा चा वादग्रस्त फोटो आणि अवधुत गुप्तेची चपराक! – InMarathi

स्पृहा चा वादग्रस्त फोटो आणि अवधुत गुप्तेची चपराक!

आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

लाडक्या मराठी अभिनेत्री ह्या नावाखाली जर यादी करायला घेतली तर त्या यादी मध्ये स्पृहा जोशी हे नाव नक्कीच पहिल्या पाच मध्ये येईल. तिने रमाबाई रानडे सारख्या ताकदीच्या भूमिका केल्या तिथेच कुहू सारखं हलकं फुलकं कामही केलं. तिच्या अभिनयासोबतंच कवितांच्या पुस्तकाचंही जोरदार स्वागत झालं. नवनवीन प्रयोग करून आणि नाटक ह्यांमध्येही स्पृहा आपलं वेगळेपण दाखवत आहेच.

पण म्हणतात ना, तुम्ही कितीही प्रयत्न करा, लोक तुमच्यात काही ना काही खोट काढतातंच! असंच झालं स्पृहाबद्दल.

 

spruha joshi marathipizza (2)

तिने एक नवीन साडीतला फोटोशुट केला आणि त्यातला एक फोटो तिच्या फॅन्स साठी फेसबुकवर शेअर केला.

ह्या फोटो मध्ये स्पृहा पाठमोरी बसलीये आणि तिची पाठ दिसत आहे. अर्थात…त्या फोटो वरून फेसबुकवरच्या तथाकथित सुसंस्कृत लोकांच्या आणि संस्कृती रक्षकांच्या भावना दुखावल्या गेल्या आणि स्पृहावर टीकेची झोड उडाली. अनेकांनी फेसबुकवरील त्या फोटोवर कमेंट करून आपली नाराजी व्यक्त केली.

त्यातील काही निवडक कमेंट्स, नामोल्लेख लपवून पुढे देत आहोत :

कुणी स्पृहा ला दोषी मानून कमेंट करून मोकळं झालं…

bhandaval MarathiPizza

 

तर एकाने ‘बॉलिवुडच्या नादाला लागू नका’, ‘चांगला आदर्श ठेवा’ असा सल्ला दिला.

 

Comments Marathipizza

 

कुणी “हितचिंतक” बनून स्पृहा ला सावध करून गेलं…

Savadh MarathiPizza

 

तर काही सकारात्मक कमेंट्स सुद्धा होत्या – ज्यात ‘स्पृहाच्या फोटोत गैर काय?’ असा सवाल केला…

Saviour MarathiPizza

स्पृहा जोशीच्या समर्थनात अनेक कमेंट्स आल्या,ज्या वरील कमेंटच्या धरतीवरच होत्या. प्रत्येक कमेंट मध्ये, स्पृहाचं व्यक्ती स्वातंत्र्य, कपड्यांवरून ठरवलं जाणारं चारित्र्य, अनेक लोकांची स्त्रियांबद्दलची प्रतिगामी भूमिका अश्या कुठल्यातरी मुद्द्यावर स्पर्श होता.

परंतु एक कमेंट – फार फार वेगळी आणि विचार करायला लावणारी होती.

स्पृहा जोशीच्या समर्थनात सर्वांचा लाडक्या अवधूत गुप्ते पुढे आला…महत्वाची गोष्ट ही की आक्रमक प्रतिवाद नं करत, अवधूत योग्य मुद्दा घेऊन पुढे आला.

 

awdhoot gupte marathipizza

 

त्याने स्पृहाची एक महिना जुनी कविता, त्यावरचा प्रतिसाद आणि स्पृहा चा हा फोटो, त्यावरचा प्रतिसाद समोरासमोर करून विचारलं –

 

स्पृहा च्या फोटो वर २४ तासांत ९४० पेक्षा जास्त लोकांनी कमेंट, १५.८ हज्जार लोकांनी लाईक केलं. याउलट तिने गडकरींच्या पुतळ्याच्या विटंबनेवर भाष्य करणाऱ्या कवितेवर ३.५ हजार लाईक्स आणि ४५० कमेंट्स. सांगा आता स्पृहा इथून पुढे कविता पोस्ट करेल? की फोटो?

चूक कोणाची — स्पृहाची की आपली?

 

AV Gupte Comment MarathiPizza

 

कुणी काय कपडे घालावे ह्यासाठी नेहमीच वाद होत आलेले दिसतात. कुणी व्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली त्याचं समर्थन करतं तर कुणी संस्कृतीच्या नावाखाली शिव्या घालतं.

पण ह्यावेळी अवधूत ने नेमकं अश्या ढोंगी लोकांच्या वर्मावर बोट ठेवलंय…!

स्पृहाने तो फोटो काढून आणि तो फोटो असा शेअर करून चूक केलं की बरोबर – हा मुद्दा बाजूला ठेऊया. महत्वाचा मुद्दा वेगळा आहे.

तरुण अभिनेत्री, कलाकाराकडून – सकारत्मक आणि वैचारिक दृष्ट्या प्रगल्भ काहीतरी सादर केलं तर त्याला अल्प प्रतिसाद दिला जातो…त्या कलेकडे दुर्लक्ष होतं – पण जर त्याच अभिनेत्रीने एखादी ‘अशी’ गोष्ट केली तर तिच्यावर सर्व जण पटापट प्रतिक्रिया देतात, तिची दखल घेतात – एक समाज म्हणून, हा आपलाच पराभव नव्हे का?

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017  InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?