खेळण्यातली गाडी वापरून ‘त्याने’ केलं २ करोडच्या ऑडीचं भन्नाट फोटोशुट!

आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

===

फोटोग्राफरची खरी ताकद त्याच्या कॅमेऱ्यात नसून त्याच्या क्रियेटीव्हीटीमध्ये असते. त्याच्या क्रियेटीव्हीटीमधून जे काही निर्माण करतो ते खऱ्या अर्थाने रसिकांना मोहून टाकते.

असे क्रियेटीव्ह फोटोग्राफर्स फारच कमी पाहायला मिळतात जे अगदी शून्यातून अगदी किंमती छायाचित्रे निर्माण करतात.

Felix Hernandez Rodriguez या फोटोग्राफर जगातील अश्याच काही क्रियेटीव्ह फोटोग्राफर्स पैकी एक होय! त्याचे फोटोज अगदी रुक्ष माणसाच्या चेहऱ्यावर देखील आश्चर्याचे आणि कुतुहुलाचे भाव आणल्याशिवाय राहत नाहीत.

 

miniature-toy-photography-felix-hernandez-rodriguez-marathipizza

स्रोत

नुकतेच Felix Hernandez Rodriguez ने अनागी अशक्य कोटीतील कमाल करून दाखवली. त्याला २ करोडच्या ऑडीचं फोटोशुट करण्याची ऑफर आली होती.

आता इतक्या महागड्या गाडीचं फोटोशूट करायचं म्हणजे सहाजिकच ते एकदम हटके हवं. तसंच अतिशय सुंदर लोकेशन शोधून तेथे जाऊन गाडीसोबत हे फोटोशूट करावं लागणार असा विचार एखाद्या सामान्य फोटोग्राफारने केला असता.

पण या क्रियेटीव्ह माणसाने आपल्या नेहमीच्याच स्टाईलने जे काही कैद केलं ते कल्पनेपलीकडचं आहे.

 

audi-r8-miniature-car-toy-felix-hernandez-marathipizza

स्रोत

त्याने खऱ्या कारच्या मॉडेलचा वापर न करता कंपनीकडे कारच्या एका छोट्याश्या प्रतिकृतीची मागणी केली. अगदी लहान खेळण्यातली कार वाटावी अशी प्रतिकृती! कंपनीने अवघे २००० रुपये खर्च करून त्याला ती प्रतिकृती पाठवली.

ही कार जरी छोटीशी खेळण्यातली वाटत असली तरी ती अगदी हुबेहूब मूळ कार सारखीच होती. खऱ्या कार मध्ये आणि या छोट्याश्या खेळण्यातल्या कारमध्ये किंचितही फरक नव्हता.

या छोट्याश्या प्रतिकृतीचा वापर करून Felix Hernandez Rodriguez ने असे काही भन्नाट फोटोशुट केलेय की पाहणाऱ्याला वाटावे जाणून खऱ्या गाडीचा वापर यात केला असेल.

 

audi-r8-miniature-car-toy-felix-hernandez-marathipizza01

स्रोत

अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे या फोटोशुटमध्ये केवळ लाईट आणि इतर ईफेक्टस वापरण्यात आले होते. परंतु फोटोशूट आकर्षक दिसावे म्हणून कोणत्याही प्रकारच्या एडीटिंग सॉफ्टवेअरचा किंवा फोटोशॉपचा वापर करण्यात आलेला नाही.

 

audi-r8-miniature-car-toy-felix-hernandez-marathipizza02

स्रोत

audi-r8-miniature-car-toy-felix-hernandez-marathipizza03

स्रोत

क्रियेटीव्हीटी असावी तर अशी…!

ह्या अवलिया फोटोग्राफर कडून “कला” कशी जोपासावी अन कशी अधिकाधिक उन्नत करत न्यावी हे शिकण्यासारखं आहे!

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

One thought on “खेळण्यातली गाडी वापरून ‘त्याने’ केलं २ करोडच्या ऑडीचं भन्नाट फोटोशुट!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?