भारतीय संसदेवर झालेल्या एकमेव हल्ल्याची कहाणी

आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

१३ डिसेंबर २००१ रोजी भारतीय संसदेवर लष्कर-ए-तयब्बा आणि जैश-ए-महम्मदच्या अतिरेक्यांनी अचानक हल्ला चढविला. हा हल्ला म्हणजे सरळ सरळ भारतीय लोकशाहीचा हत्या करण्याचा प्रयत्न होता. परंतु अतिरेक्यांचे फुसके मनसुबे आपल्या वीर जवानांनी पार धुळीस मिळवून टाकले आणि भारताची शान असणाऱ्या संसदेची लाज राखली. परंतु जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीवर दहशतवाद्यांनी केलेल्या या आघाताची सल अजूनही प्रत्येक भारतीयाच्या मनाला टोचत आहे.

विसरायचा कितीही प्रयत्न केला तरी त्या आठवणी संसदेला पाहिल्यास आजही डोळ्यासमोर उभ्या राहतात….

 

indian-parliament-attack-marathipizza01

स्रोत

१३ डिसेंबर २००१ चा तो दिवस नेहमी सारखाच सुरु झाला. भारतीय संसदेच्या भोवताली रोज असायची तशीच परिस्थिती होती. संसदेचं कामकाजही एव्हाना सुरु झालं होतं. प्रत्येक चेहरा आपापल्या कामात व्यस्त झाला. अधिवेशन सुरु असल्याकारणाने मंत्री, खासदार आणि इतर अतिशय महत्त्वाच्या व्यक्ति संसदेमध्ये उपस्थित होत्या. घड्याळ ११ वाजून ४० मिनिटांची वेळ दाखवत होते. तेवढ्यात लाल दिव्याच्या एका ऍम्बेसेडर कारने संसद भवनाच्या मुख्य प्रवेशद्वारातून आत प्रवेश केला.

गाडीवर गृहमंत्रालय आणि संसदेचं स्टीकर लावलेलं असल्याने कोणत्याही अडथळ्याला तोंड न देता कार वेगाने आत शिरली. जेव्हा कार आता आली आणि थांबली तेव्हा कारमध्ये बसलेल्या एका दहशतवाद्याने बाहेर येत स्वत:ला हॅण्ड ग्रेनेडसह उडवून दिले.

अचानक झालेल्या त्याच्या जबरदस्त स्फोटामुळे क्षणभर संपूर्ण वातावरण भांबावले. नक्की काय झालंय याची कुणालाही कल्पना येत नव्हती. जो तो स्वत:ला सावरण्याच्या प्रयत्नात होता.

दुसऱ्याच क्षणाला कारमध्ये बसलेल्या इतर दहशतवाद्यांनी एके 47 रायफलमधून अंधाधुंद गोळीबार सुरू केला आणि प्रत्येकाची पळापळ सुरु झाली.

हा एक दहशतवादी हल्ला असल्याचे तेव्हा सुरक्षा अधिकाऱ्यांच्या लक्षात आले. हल्ला होण्याच्या काही मिनिटांपूर्वीच तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी आणि विरोधी पक्षनेत्या सोनिया गांधी संसदेबाहेर पडले होते, परंतु उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी प्रमोद महाजनांसमवेत १०० पेक्षा जास्त खासदार सेंट्रल हॉल आणि इतर भागात उपस्थित होते.

या गोष्टीची जाणीव होताच सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्वरित सेंट्रल हॉलचे दरवाजे बंद केले आणि खासदार आणि मंत्र्यांना ओलीस ठेवण्याच्या दहशतवाद्यांच्या योजनेला सुरुंग लावला.

 

indian-parliament-attack-marathipizza02

स्रोत

कारमध्ये एकूण ६ दहशतवादी होते. त्यापैकी एकाने आत्मघातकी स्फोट घडवत स्वत:चा जीव दिला, तर इतर ५ जणांसोबत कडवी झुंज देत सुरक्षा जवानांनी अवघ्या अर्ध्या तासात त्यांना कंठस्नान घातले. अर्ध्या तास चालेल्या या थरारनाट्यात ५ जवानांनी प्राणांचे बलिदान दिले, तर ९ जणांना दहशतवाद्यांनी अंधाधुंद केलेल्या गोळीबारात स्वत:चा प्राण गमवावा लागला.

 

indian-parliament-attack-marathipizza03

स्रोत

ज्या नराधमाने हा कट रचला त्या ‘अफजल गुरूला’ फाशी देण्यात आली.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?