' सर्जनशीलता वाढवण्यासाठी फ्रांसमध्ये लढवली गेलीय अनोखी शक्कल : लघुकथांचे ATM – InMarathi

सर्जनशीलता वाढवण्यासाठी फ्रांसमध्ये लढवली गेलीय अनोखी शक्कल : लघुकथांचे ATM

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page

===

सध्या आपल्या देशात ATM पुराण खूप गाजत आहे, कारण जवळपास देशातील ७०-७५ टक्के ATM मध्ये नोटांचा दुष्काळ पडला आहे. त्यामुळे सामान्य जनतेचे पुन्हा एकदा हाल होत आहेत. नोटांअभावी लोकांना रोजची छोटी-मोठी कामे पार पडण्यासाठी देखील तारेवरची कसरत करावी लागत आहे. तशी आरबीआय ह्यावर आपले स्पष्टीकरण देत आहे, पण ह्या सर्वात सामान्य नागरिकांची गोची होते आहे हे मात्र नक्की.

 

no cash-inmarathi
indiatvnews.com

असो, ह्या ATM मध्ये जरी नोटांचा तुटवडा असला तरी सध्या एका अश्या ATM ची चर्चा सुरु आहे ज्यातून नोटा नाही तर लघुकथा बाहेर येतात. हे जरी अविश्वसनीय वाटत असलं तरी फ्रेंच कम्युनिटीच्या एका पब्लिशरने अमेरिकेत हे घडवून आणलं आहे.

 


शॉर्ट स्टोरीज वाचायची आवड असणाऱ्या लोकांसाठी हे मशीन म्हणजे अल्लादिनचा चिरागच. कारण ह्यातून ते त्यांना हव्या असलेल्या लघुकथा हवं तेव्हा घेऊ शकतात. ही मशीन दंडगोल आकाराची आहे. ह्यात १ मिनिट, ३ मिनिट आणि ५ मिनिट अशी तीन बटणं आहेत. वाचक आपल्या आवडीनुसार, वेळेनुसार ह्या लघुकथांची निवड करू शकतात. त्यानंतर तुम्ही जी गोष्ट निवडली असेल त्याची प्रिंट तुम्हाला ह्या ATM मधून मिळते. तुम्ही ह्यामध्ये लघुकथा, प्रेमकथा, लहान मुलांच्या गोष्टी ह्यासारखे अनेक विषय वाचू शकता.

सध्या हे मशीन सरकारी ऑफिस, रेस्टॉरंट, विद्यापीठ आणि परिवहन केंद्र इत्यादी ठिकाणी लावण्यात आले आहे. न्यूयॉर्क टाईम्स मध्ये छापून आलेल्या वृत्तानुसार Free Library of Philadelphia च्या Deputy Director Of Enrichment And Civic Engagement, Andrew Nurkin सांगतात की, लोकांनी साहित्याचं जास्तीत जास्त वाचन करायला हवं. आम्हाला मुलांची साक्षरता आणि सर्जनशीलता आणखीन विकसित व्हावी अशी इच्छा आहे.

 


आता ह्यासाठी सार्वजनिक पुस्तकालय ते चित्रपट दिग्दर्शक देखील आपला सहयोग देत आहेत. सोबतच काही दिवसांपूर्वी फिलाडेल्फिया, अॅक्रोन, ओहिओ, विचीता, कान, कोलोम्बिया आणि दक्षिण कॅरोलीनाने देखील हे वेंडिंग मशीन लावण्याची घोषणा केली आहे.

सर्वात महत्वाची बाब म्हणजे ह्या लघुकथा अगदी मोफत उपलब्ध आहेत. म्हणजे ह्यासाठी तुम्हाला एकही रुपया खर्च करण्याची गरज नाही. ह्या मशीनद्वारे तुम्ही १ लाखपेक्षा जास्त लघुकथांच्या आवृत्या प्राप्त करू शकता. पहिल्यांदा हे मशीन २०१६ साली लावण्यात आलं होतं. ह्या एका मशीनला लावण्याचा खर्च हा ९,२०० डॉलर एवढा आहे तर दर महिन्याला ह्यातील कंटेंट आणि सॉफ्टवेअरचा खर्च हा १९० डॉलर एवढा आहे.

 


लोकांना देखील ही आयडिया आवडायला लागली आहे. म्हणजे आधी पैसे, मग कोल्ड्रिंक्स, पाणी, खाण्यापिण्याच्या वस्तू इत्यादीचे ATM आपण बघितले आहेत. पण लोकांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी ती वाढावी आणि ह्यातून त्यांच्यातील सर्जनशीलता विकसित व्हावी म्हणून लढवलेली ही शक्कल खरंच कौतुकास्पद आहे.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?