‘आयपीएल’मधले हे अचाट रेकॉर्ड्स पाहून क्रिकेटमध्ये काहीही होऊ शकतं याची खात्री पटते

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर

===

भारतात क्रिकेट हा फक्त खेळ नसून एक धर्म झाला आहे आणि क्रिकेटवेडे लोक पूजा जितकी भक्तिभावाने करत नसतील तितक्या भक्तिभावाने क्रिकेट बघतात. आणि त्यांच्या आवडीचे खेळाडू हेच त्यांचे देव असतात. त्यात जर का आंतरराष्ट्रीय सामना असेल तर अट्टल क्रिकेटवेडे लोक आपली सगळी कामे बाजूला ठेवून क्रिकेट बघतात.

जर भारत पाकिस्तान सामना असेल तर कर्फ्यू लागल्याप्रमाणे रस्ते सामसूम असतात. अशी क्रिकेटची जादू भारतीयांच्या मनावर झालेली आहे.

लोक अतिशय भक्तिभावाने क्रिकेट बघत असल्यामुळे ते आपल्या आवडीच्या टीममध्ये प्रचंड भावनिक गुंतवणूक करतात. आणि चुकून जर का त्यांच्या आवडीची टीम तो सामना हरली तर चक्क टीव्ही फोडून टाकण्यापर्यन्त अतिरेकी प्रकार हे कट्टर फॅन्स करतात.

आयपीएल आल्यापासून मात्र फेथफुल फॅन्सची गोची झाली आहे. नेमक्या कुठल्या टीमला सपोर्ट करायचा हे ठरवणे कठीण जाते. कारण आपल्या आवडीच्या टीममध्ये आपले आवडीचे खेळाडू दर वर्षी असतीलच असे नाही.

 

cheerleaders-ipl-inmarathi
storiesincorporated.com


लिलावात निकाल जसा लागेल त्याप्रमाणे टीम्स तयार होतात. त्यामुळे अनेकांना आयपीएल हा फक्त एक बाजार आणि पैश्याचा खेळ वाटतो. त्यात चिअरगर्ल्स नाचताना बघून तर अनेक “फक्त क्रिकेट आवडणारे” फॅन्स चिडतात.

तरीही करोडो लोक आवडीने आयपीएल बघतात आणि आयपीएलवर दर वर्षी करोडो रुपयांचा सट्टा सुद्धा लावला जातो.

आयपीएल ही निर्विवादपणे जगातील सर्वात लोकप्रिय क्रिकेट लीग आहे. दरवर्षी ह्या क्रिकेट लीगमध्ये पाण्यासारखा पैसा ओतला जातो. दरवर्षीप्रमाणे ह्याही वर्षी सुद्धा भरपूर जाहिरातबाजी आणि गाजावाजा होऊन आयपीएलचे रणशिंग फुंकले गेले आहे.

आयपीएलचे हे बारावे वर्ष आहे. इतक्या वर्षांत आयपीएलमध्ये अनेक विक्रमांची नोंद झाली आहे. चला तर आज आपण आयपीएलमधल्या काही रेकॉर्डसची माहिती घेऊया तसेच आयपीएलबद्दल काही मनोरंजक गोष्टी जाणून घेऊया.

१. आयपीएलच्या प्रसारणाचे हक्क स्टार इंडिया नेटवर्कने १६३४७.५ कोटी रुपये खर्चून विकत घेतले आहेत. म्हणजेच तुम्ही जी बॉल टू बॉल मॅच बघता, त्यापैकी प्रत्येक बॉल दाखवण्याचा खर्च सुमारे २१ लाख रुपये आहे.

 

ipl inmarathi
india.com

२. आतापर्यंत आयपीएलमध्ये अनेक खेळाडूंची खरेदी विक्री झाली. ज्या टीमने लिलावात जास्तीत जास्त पैसे खर्च केले त्यांच्याकडून खेळाडूंना खेळावे लागते. त्यामुळे प्रत्येक वर्षी टीममधील खेळाडू बदलत असतात.

पण विराट कोहली हा एकमेव असा खेळाडू आहे जो सुरुवातीपासून रॉयल चॅलेंजर्स बँगलोर कडून खेळतो आहे.

 

Chris-Woakes-Virat-Kohli-inmarathi
crictracker.com

२००८ला रॉयल चॅलेंजर्सने विराटला आपल्या संघात घेतले होते. बारा वर्ष झाली तो एकाच टीमकडून खेळतो आहे, त्याने त्याची टीम आजपर्यंत एकदाही बदलली नाही.

३. आयपीएलमध्ये मागच्या हंगामापर्यंत सर्वात जास्त डॉट बॉल टाकण्याचा विक्रम प्रवीण कुमारच्या नावावर होता. आयपीएलच्या ११९ सामन्यांत त्याने आतापर्यंत १०७५ डॉट बॉल्स टाकले होते.

ह्या हंगामात मात्र लसिथ मलिंगाने प्रवीण कुमारला मागे टाकत सगळ्यात जास्त डॉट बॉल टाकणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत दुसरा क्रमांक पटकावला आहे.

 

Lasith_Malinga_inmarathi
indiatoday.com

मलिंगाने १०८४ डॉट बॉल टाकले आहेत. तर पहिला क्रमांकावर आता हरभजन सिंग आहे. त्याने आयपीएल सामन्यांत एकूण ११५३ डॉट बॉल्स टाकले आहेत.

४. चेन्नई सुपर किंग्स म्हणजे धोनी असेच समीकरण झाले आहे. आणि धोनीचा संघ सहसा खराब कामगिरी करत नाही. बंदी घातल्याची दोन वर्षे वगळता आतापर्यंत सगळ्याच हंगामात चेन्नई सुपर किंग्स हा संघ प्ले ऑफसाठी पात्रता फेरीपर्यंत पोहोचला आहे.

५. आयपीएलच्या आजपर्यंतच्या इतिहासात पियुष चावला हा असा एकमेव गोलंदाज आहे ज्याने बऱ्याच काळापर्यंत एकही नो बॉल टाकला नव्हता. पण त्याने त्याचा हा रेकॉर्ड ३८६ षटकानंतर मोडला.

दिल्ली डेअरडेव्हिल्स विरुद्ध खेळताना त्याने पहिल्यांदा आयपीएलमध्ये नो बॉल टाकला.

 

piyush chawala inmarathi
youtube.com

६. आयपीएलमध्ये अगदी लहान वयाचे खेळाडू सुद्धा खेळतात. पण तुम्हाला माहितेय का ब्रॅड हॉगच्या नावावर आयपीएल मधील सर्वात वयस्क खेळाडू म्हणून खेळल्याचा विक्रम आहे. २०१६ साली तो कोलकाता नाईट रायडर्सकडून आयपीएलचा शेवटचा सामना खेळला तेव्हा त्याचे वय ४५ वर्ष इतके होते.

७. ह्यावर्षी आयपीएलमध्ये खेळण्याची संधी मिळालेल्या सर्वात लहान खेळाडूचे वय अवघे १६ वर्षे आहे. त्याचे नाव प्रयास राय बर्मन असे असून तो रॉयल चॅलेंजर्स बॅंगलोर ह्या संघाकडून आयपीएल खेळतो आहे.

२५/१०/२००२ साली जन्मलेला प्रयास हा आयपीएलमध्ये खेळलेला आजपर्यंतचा सर्वात लहान खेळाडू आहे.

८. आयपीएलमध्ये आजवर सर्वात जास्त आणि सर्वात कमी स्कोअर करण्याचा विक्रम रॉयल चॅलेंजर्स बँगलोर ह्या टीमच्या नावावर आहे.

२०१३ साली त्यांनी पुणे वॉरियर्स इंडियाविरुद्ध खेळताना २६३/५ इतका स्कोअर केला होता तर २०१७ साली कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध खेळताना ह्याच संघाने सर्वात कमी स्कोअर करण्याची कामगिरी सुद्धा करून दाखवली.

ह्या सामन्यात अख्खा संघ केवळ ४९ धावांवर गारद झाला होता.

 

rcb inmarathi
scroll.in

९. मुंबई इंडियन्स हा संघ ह्यावेळी आयपीएलमध्ये चाचपडत असला तरी ह्याच संघाने एक छान रेकॉर्ड करून दाखवला आहे. आयपीएलच्या इतिहासात मुंबई इंडियन्सने विजयी सामन्यांचे शतक केले आहे.

चेन्नई सुपर किंग्सना हरवून त्यांनी जो सामना बुधवारी जिंकला, तो त्यांचा शंभरावा विजयी सामना होता.

आयपीएलमध्ये १०० सामने जिंकणारा मुंबई इंडियन्स हा पहिला संघ ठरला आहे. आयपीएलमध्ये आजपर्यंत मुंबई इंडियन्सने १७५ सामने खेळले आहेत. त्यापैकी एक सामना त्यांनी सुपरओव्हर्समध्ये जिंकला आहे.

१०. आजवर आयपीएलमध्ये सगळ्यात जास्त धावा सुरेश रैनाने केल्या आहेत. हा हंगाम मिळून त्याने आयपीएलमध्ये एकूण ५०३४ धावा केल्या आहेत. सध्या सुरेश रैना चेन्नई सुपरकिंग्सकडून खेळत आहे.

तर ह्याच यादीत दुसऱ्या क्रमांकावर विराट कोहली आहे. त्याने आयपीएलमध्ये आजवर ५००० धावा केल्या आहेत. तर सर्वात जास्त बळी घेण्याचा विक्रम लसिथ मलिंगाच्या नावावर आहे. त्याने आयपीएलमध्ये आजवर १५७ बळी घेतले आहेत.

दुसऱ्या क्रमांकावर १४९ बळी मिळवणारा अमित मिश्रा आहे.

 

amit mishra inmarathi
cricketcountry.com

११. क्रिस गेल ह्याने आयपीएलमध्ये सर्वात जास्त शतके ठोकली आहेत. त्याने आजवर ६ शतके व २५ अर्धशतके काढली आहेत. तर त्याच्याखालोखाल विराट कोहलीने ४ शतके व ३८ अर्धशतके काढली आहेत.

सर्वात जलद शतक काढण्याचा विक्रम सुद्धा क्रिस गेलच्याच नावावर आहे.

२३ एप्रिल २०१३ रोजी पुणे वॉरियर्स इंडियाच्या गोलंदाजांना अक्षरश: झोडपून काढत केवळ ३७ चेंडूंत १७५ धावा काढण्याचा विक्रम केला आहे. तर लोकेश राहुलच्या नावावर सर्वात जलद अर्धशतक करण्याचा विक्रम आहे.

 

chris-gayle-inmarathi04
dnaindia.com

त्याने केवळ १४ चेंडूंत ५१ धावा केल्या आहेत.

तर असे हे आयपीएलचे विक्रम आहेत.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *