अरेंज्ड मॅरेज करताय? “बघायला” जाण्याआधी या १० गोष्टींची तयारी करा

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

=== 

मिळावे तुझे तुला..आस ही ओठी, कोणी कुठे बांधल्या रेशीमगाठी!

जुळून येति रेशीमगाठी, आपुल्या रेशीमगाठी!!

असं म्हणतात, लग्नाचे हे रेशमी बंध जरी स्वर्गात जोडलेले असले तरी ते इथे पुन्हा जुळवावे लागतात आणि शोधावे ही लागतात.

 

happy marriage inmarathi
images dawn

 

मग ह्यात जरी आपल्याला आपले नातेवाईक किंवा वधू वर सूचक मंडळ किंवा अलीकडे सर्व संमत असलेलया मॅट्रिमोनिअल साईट्स, ह्याची जरी मदत होत असली तरी निर्णय हा ज्याचा त्याला आणि विचारपूर्वक घ्यायचा असतो.

म्हणूनच संभाव्य जोडीदाराची भेट घेणे हा त्यातला सर्वात महत्वाचं टप्पा आहे.

चला पाहूया मग अशा भेटीपूर्वी काय काय करायला हवं आणि काय टाळायला हवं.

 

१. पूर्वतयारी करा

 

arranged marriage inmarathi 6

 

ज्यांना तुम्ही भेटणार आहात त्यांची माहिती नीट वाचा. ह्यावरून तुम्हाला त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा, साधारण अंदाज येऊ शकतो.

त्यांचं शिक्षण काय आहे किंवा कुठल्या फील्ड मधे तो/ती काम करतायेत याची माहिती असल्यास संवाद साधणे सोपे होऊ शकते.

तसंच तुम्हाला कुठल्या प्रकारची व्यक्ती जोडीदार म्हणून हवी आहे यावर विचार करणे आवश्यक आहे.

 

२. वातावरण हलकं करा

 

tanu weds manu inmarathi

 

ह्या भेटीमध्ये थोडं अवघडल्यासारखं होतं जे साहजिक आहे, म्हणूनच सगळ्यात आधी वातावरण हलकं करून त्यातील अवघडलेपण दूर करा.

चेहरा प्रसन्न आणि हसरा असू द्या जेणेकरून तुम्हाला पाहून समोरची व्यक्ती देखील relax होईल. त्यामुळे मोकळेपणाने दोघांना ही बोलता येईल.

 

३. महत्वाच्या बाबींविषयी खुले पणाने चर्चा करा.

 

arranged marriage inmarathi

 

पहिल्याच भेटीत दोघेही संकोचलेले असले तरी काही अपरिहार्य विषय हाताळणेही गरजेचे असते. काही अश्या गोष्टी ज्या बद्दल तुमची ठाम मते आसू शकतात त्या समोरच्यापर्यंत पोचवणे महत्वाचे असते.

म्हणून कितीही टाळावेसे वाटले तरी असे अप्रिय विषय वेळीच बोलल्यास पुढचे काही गैरसमज टाळता येतात.

उदाहरणार्थ : त्यांनी लग्नाचा निर्णय मनापासून घेतला आहे की घरच्यांच्या दबावाखाली, त्याचबरोबर त्यांच्या कुटूंबाच्या काही विशेष अपेक्षा आहेत का? असे प्रश्न.

ह्याचा थेट परिणाम दोघांच्या ही आयुष्यावर होणार असतो म्हणून त्यावर पुढे जाण्याअगोदर चर्चा झाल्यास उत्तम.

हे करताना एक काळजी नेहमी घयायला हवी ती म्हणजे तुम्ही एकटेच बोलू नये तर दुसऱ्याला बोलते करावे.

 

४. कोणते प्रश्न विचाराल?

 

queen inmarathi

 

तुम्ही कुणाला पहिल्यांदाच भेटताय आणि अशा वेळी गहन प्रश्नांची सरबत्ती सुरु झाली तर तुम्हाला आवडेल का? नक्कीच नाही. तेव्हा पहिल्या भेटीत सुरवात शक्यतोवर साध्या प्रश्नांनी करावी.

अगदी हवा पाण्याच्या गप्पा ही तुम्ही मारू शकता. किंवा रहदारीच्या समस्या, वाढते प्रदूषण या सारखे विषय ज्यावर दुमत होण्याचे काही कारण नाही ते बोलायलाही हरकत नाही.

 

५. प्रश्न कसे विचाराल?

 

arranged marriage inmarathi 3

 

ह्याचं उत्तर अगदी सोपे आहे. गप्पा मारल्यासारखे विचारावेत. हे लक्षात असू द्या की, तुम्ही नोकरीचा इंटरव्ह्यू घेत नाही आहात तर तुमच्या संभाव्य जोडीदाराबद्दल जाणून घेत आहात.

गप्पांच्या ओघात त्यांना जाणून घेण्याचा प्रयत्न करा. काही हलके फुलके विनोद अशा वेळी नक्कीच उपयोगी पडू शकतात.

तुम्हीच एकमार्गी विचारत राहू नका तर त्यांनाही विचारू द्या, तेव्हाच विचारांची देवाण घेवाण होईल.

 

६. उत्तरे कशी द्याल?

 

arranged marriage inmarathi 1
weddingdores

 

काही साहजिक प्रश्नांची तुमची उत्तर ठरलेली असली तरी पाठ केल्यासारखी ती ऐकवू नका. त्यामुळे तुमच्या उत्तराच्या खरेपणा बद्दल शंका निर्माण होईल.

शक्य तितक्या सहज पणाने बोलायचा प्रयत्न करा. जेणेकरून तुमच्या विचारांची स्पष्टता दुसऱ्याच्या लक्षात येईल.

खूपच लांबलचक उत्तर देणे टाळा, कारण समोरच्याला बोलण्याची संधीच मिळणार नाही. कमी वेळात जास्त विषय बोलता आले तर दुसऱ्याला जाणून घेणे सोपे होईल.

 

७. निरीक्षण करा.

 

arranged marriage inmarathi 4

 

काही वेळा मनातल्या गोष्टी दुसऱ्यापर्यंत कशा ही करून पोचवायच्या आहेत ह्या विचारात आपण इतके मग्न होतो की समोरच्याचे निरीक्षण करायचे राहून जाते.

दुसरी व्यक्ती बोलत असताना त्यांच्या कडे आवर्जून लक्ष द्या. त्यातून तुम्हाला कळू शकत की कोणता विषय त्यांना डिस्टर्ब करतोय किंवा त्यांची रुची कशात आहे.

संभाषण पुढे नेण्यासाठी या साऱ्याचा नक्की उपयोग करता येतो.

 

८. ग्रूमिंग

 

alia bhatt 5 inmarathi

 

इंग्रजीत म्हण आहे “फर्स्ट इम्प्रेशन इस लास्ट इम्प्रेशन” म्हणजे पहिल्या भेटीत जे मत बनतं ते कायमस्वरूपी असतं. आणि ही पहिली भेट तर, तुमच्या आयुष्यातील सर्वात महत्वाची भेट.

तेव्हा नीट नेटके तयार होणे फारच जरुरी आहे. केवळ पेहरावच नाही तर चपला किंवा शूज, किंवा मुलींची पर्स ह्या ही गोष्टी नकळत आपल्या बद्दल मत बनवत असतात.

एखादे परफ्युम लावा.

 

९. आनंदी चेहरा

 

arranged marriage inmarathi 7
the bridal box

 

हसरा आणि आनंदी चेहरा सर्वांनाच आवडतो, अशा माणसांशी बोलायला सगळे उत्सुक असतात. तुम्ही मुळात फारसे हसत नसलात तरी योग्य वेळी हसून दाद देण्याची सवय जरूर लावून घ्या.

हसण्यामुळे वातावरणातील ताण नाहीसा होऊन, समोरचा माणूस तुमच्याशी संवाद साधण्यास उत्सुक होईल.

 

१०. फोकस्ड राहा

 

arranged marriage inmarathi 2

 

बऱ्याच वेळा सुरवातीच्या काही गप्पानंतर दोघांनाही काय विषय काढावा समजत नाही आणि नेमके ह्याच वेळी आपले लक्ष इतरत्र जाऊ शकते.

तेव्हा ज्या महत्वाच्या भेटीसाठी तुम्ही आला आहेत त्यावर लक्ष केंद्रित करा आणि समोरच्यालाही संवादात सामील करून घ्या.

वरील गोष्टी लक्षात ठेवल्यात तर तुम्ही स्वतःची चांगली छाप पाडू शकता. लग्न जुळणं हा नशिबाचा भाग असला तरीही त्यासाठी तुम्हीही प्रयत्न करणं गरजेचं आहे.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?