अर्जुनाची दुर्दैवी बहीण, जिला खुद्द अर्जुनानेच विधवा केलं होतं…

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page

===

महाभारत… हा एक असा ग्रंथ आहे ज्याबद्दल आपल्याला आजही संपूर्ण माहिती नाही. यात अनेक असे पात्र आहेत ज्यांच्या बद्दल अजूनही आपण ऐकलेले नाही.

जेव्हा केव्हा महाभारताचा विषय निघतो, तेव्हा आपल्यासमोर त्यातील मुख्य पात्र जसे की कृष्ण, धृतराष्ट्र, पांडु, गांधारी, कुंती, कौरव, कर्ण, पांडव आणि त्यांची पत्नी द्रौपदी हेच येतात. आपण आजवर यांच्याबाबत अनेक कथा, आख्यायिका ऐकल्या वाचल्या असतील. पण काय महाभारतात केवळ हेच होते. तर नाही.

महाभारतात अनेक असे पात्र होते ज्यांच्याबद्दल आपल्याला माहित नाही.

अश्या काही वंचित पात्रांपैकीच एक म्हणजे “दुशाला”…

 

dushala-inmarathi
dainikbhaskar.com


१०० कौरवांची आणि पांडवांची एकुलती एक बहिण होती दुशाला. हिच्या बद्दल आपण क्वचितच कधी ऐकले असेल. पण पुराणांत दुशाला बाबत देखील अनेक कथा आणि संदर्भ आढळतात.

दुशाला ह्या आपल्या एकुलत्या एक बहिणीला पांडवांनीच विधवा केले होते. पांडवांनी दुशालाच्या पतीची हत्या केली होती.

दुशाला ही धृतराष्ट्र आणि गांधारीची मुलगी आणि कौरव-पांडवांची बहिण होती. आपल्याला हे तर माहित आहे की, गांधारीला १०० पुत्रांचे वरदान होते. पण ह्या पुत्रांसोबतच गांधारी आणि धृतराष्ट्रला दुशाला नावाची मुलगी देखील होती. ती एक राजकुमारी होती म्हणूनच लहानपणी पासूनच ती अतिशय लाडात वाढली होती. सगळेच तिच्यावर खूप प्रेम करायचे.

 

dushala-inmarathi01
indicportal.org

दुशाला ही मोठी झाल्यावर तिचा विवाह सिंधू राज्याचा राजा जयद्रथ ह्याच्याशी झाला. आणि येथूनच दुशालाच्या जीवनाचा दुसरा अध्याय सुरू झाला. राजा जयद्रथ हा अतिशय शूरवीर होता, तशी त्याची ख्याती होती. पण त्यासोबतच तो त्याच्या दुटप्पी आणि स्त्रीलंपट व्यक्तिमत्वासाठी देखील ओळखला जायचा.

 

dushala-inmarathi02
ssl.com

जयद्रथ हा भलेही शूर असेल, पण त्याची महिलांप्रती वागणूक अतिशय वाईट होती. कधी तो महिलांशी चांगली वागणूक ठेवायचा तर कधी अगदीच वाईट वागायचा. त्याच्या या वागणुकीला दुशाला बरीच वैतागली होती. पण ती ह्याबाबत नाही कोणाला सांगू शकत होती आणि नाही आपल्या पतीचा विरोध करू शकत होती. त्यामुळे ती हा सर्व अत्याचार निमूटपणे सहन करत राहायची.

 

dushala-inmarathi06
dushala-inmarathi06

पण जयद्रथने आपल्या वागणुकीच्या सर्व मर्यादा तेव्हा पार केल्या, जेव्हा त्याने पांडवांची पत्नी द्रौपदीचे अपहरण केले. त्याच्या ह्या कृत्याने पांडव संतापले आणि ते द्रौपदीला जयद्रथच्या तावडीतून सोडवण्यासाठी, जयद्रथला त्याच्या कृत्याची शिक्षा देण्यासाठी निघाले.

 

dushala-inmarathi08
viral.bengalifeed.com

संतापलेल्या पांडवांच्या हाती जेव्हा जयद्रथ लागला तेव्हा त्यांनी त्याच्या या अपराधासाठी त्याचे शीर कापण्याचा निर्णय घेतला. पण द्रौपदीने त्यांना असे करण्यापासून थांबवले.

द्रौपदीने आपल्या पतींना थांबवले आणि समजावले की, जयद्रथ कितीही वाईट असला तरी तो तुमच्या बहिणीचा पती आहे. जर त्यांनी जयद्रथला मारले तर त्यांची बहिण विधवा होऊन जाईल.

पण पांडवांनी जयद्रथला त्याच्या ह्या कृत्याची शिक्षा देण्याचा निर्णय घेतला होता, म्हणून त्यांनी त्याचे प्राण तर नाही घेतले. पण जयद्रथचे मुंडण करवले. ज्यामुळे त्याला त्याच्या अपराधाची जाणीव होत राहील.

 

Lord Shiva Birth.Inmarathi2
netdna-ssl.com

ह्या घटनेनंतर जयद्रथला आपल्या करणीवर पश्चाताप झाला, त्याला स्वतःचीच लाज वाटली. म्हणून त्याने या कृत्याचे प्रायश्चित करण्याकरिता भगवान शंकराची तपस्या करण्यास सुरवात केली. त्याची तपस्या बघून भगवान शंकर प्रसन्न झाले आणि वरदान दिले. पण जयद्रथ अजूनही बदलला नव्हता. त्याच्या मनात पांडवांबाबत रोष अजूनही होता.

जेव्हा दुशाला हिला महिती मिळाली की, जयद्रथ त्याच्या कृत्यासाठी प्रायश्चित करतो आहे तेव्हा तिला खूप आनंद झाला. तिला वाटले की आता तिच्या पतीला त्याच्या चुकांची जाणीव झाली आहे. आणि म्हणून तिने त्याला माफ केले.

काही काळाने जेव्हा महाभारताचे युद्ध सुरू झाले तेव्हा दुर्योधनाने जयद्रथला कौरवांकडून लढण्यासाठी, त्यांच्या सेनेत संमिलीत होण्याचे निमंत्रण दिले. जयद्रथने दुर्योधनचे निमंत्रण स्वीकारले आणि तो कौरवांकडून युद्ध करण्यासाठी निघाला.

 

dushala-inmarathi07
brajdiscovery.org

युद्धादरम्यान जयद्रथने अर्जुनाचा पुत्र अभिमन्यू याची हत्या केली. आपल्या प्रिय पुत्राच्या हत्येची माहिती मिळताच अर्जुन संतापला आणि त्याने श्रीकृष्णाच्या मदतीने जयद्रथला कंठस्नान घातले.

 

dushala-inmarathi05
qph.ec.quoracdn.net

महाभारताचे युद्ध संपल्यानंतर काही वर्षांनी अश्वमेध यज्ञासाठी अर्जुन नकळत सिंधू राज्यात प्रवेश करतो. त्यावेळी दुशाला हिचा पुत्र सिंधू राज्याचा राजा होता. आपल्या पित्याला मारणारा अर्जुन आपल्या राज्यात येतो आहे हे कळताच दुशाला चा मुलगा भयभीत झाला आणि त्याने आपले प्राण त्यागले.

 

dushala-inmarathi04

आधी पती आणि मग मुलाच्या विरहाने दुशाला व्याकूळ झाली, दुखी झाली. दुशाला ने अर्जुनाला तिचा वंश वाचविण्याची विनंती केली. तेव्हा अर्जुनाने दुशालाच्या पुत्राला राज्याच्या गादीवर बसविले आणि संपूर्ण सम्मानासहित सिंधू राज्याचा राजा बनविले.

अशी ही दुशाला, जी महाभारतातील कौरव आणि पांडवांची बहिण असून देखील तिचे पात्र हे नेहेमी वंचित असेच राहिले.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *