मृत्यूनंतरही आपली नखे आणि केस खरंच वाढत असतात का? जाणून घ्या..
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर
===
मृत्यू हे जिवंत माणसाला असलेले सर्वात मोठे भय असते. आपला कधी ना कधी मृत्यू होणार हे ठाऊक असूनही त्याला सामोरे जाण्याचा धीटपणा शेवटपर्यंत माणसात येत नाही. कुतूहल, भय, रहस्य या सर्व विचित्र भावनांचे न उलगडणारे रहस्य म्हणजे मृत्यू.
आपण गेल्यानंतर मागे काय राहील? मृत्युनंतर आपल्या आत्म्याचे काय होईल? मृत्युनंतर खरेच स्वर्ग दिसेल का?
या आणि अशा अनेक प्रश्नाचे कुतूहल माणसाच्या मनात असते. ही रहस्ये उलगडली नाहीत तरी शेवटपर्यंत त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न माणूस करतच असतो.
माणसाचा मृत्यू हे न उलगडणारे रहस्य तर आहेच, पण त्याहीपेक्षा ते एक जीवशास्त्रीय सत्य आहे. मृत्यू झाल्यानंतर एक एक करून शरीरातील सर्व अवयवांची कामे बंद पडू लागतात. ही प्रक्रिया मोठी रंजक असते.
ती पूर्णपणे समजून घेणे आपल्याला अद्याप शक्य झालेले नाही. पण मानवी मर्यांदांच्या कक्षेत, मानवाने साधलेल्या वैज्ञानिक प्रगतीच्या जोरावर ती जमेल तितकी जाणून घेण्याचा प्रयत्न निरंतर चालूच आहे.

मृत्युबाबतच्या या अनेक रहस्यांपैकी एक न उलगडलेले कोडे म्हणजे माणसाचा मृत्यू झाल्यानंतरही अनेक दिवस त्याच्या नाख आणि केसांची वाढ थांबलेली नसते. आहे न आश्चर्य? असे का होते, खरंच असे होते की हाही एक गैरसमज आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न आपण या लेखात करणार आहोत.
मृत्यू हा अटळ आहे, हे आपल्या सर्वांनाच माहित आहे. फक्त प्रत्येकाच्या मृत्यूची वेळ ही वेगवेगळी असते.
जेव्हा तुमचा मृत्यू झाल्यानंतर तुमचे हृद्य थांबते, तुमचे रक्त थंड पडते आणि तुमचे हातपाय ताठ होतात आणि यावरूनच ठरवले जाते की, तुम्ही या जगामध्ये आता राहिलेले नाही आहात.
पण तुम्हाला हे माहित आहे का ? माणूस मेल्यानंतर त्याच्या सर्वकाही क्रिया बंद होतात. फक्त त्याची नखे आणि केस हे वाढतच जातात, असे तुम्ही ऐकले असेल किंवा काही चित्रपटांमध्ये पाहिले असेल. चला तर मग आपण जाणून घेऊया, याबद्दल काही महत्त्वपूर्ण महिती..

एरिक मारिया रेमरक्यूच्या “ऑल क्वाइट ऑफ़ द वेस्टर्न फ्रंट” या कादंबरीमध्ये कथानायिका कल्पना करते की, गँगरीनने मेलेल्या तिच्या एका मित्राची नखे मोठ्या जलद गतीने वाढत आहेत आणि कडक होत आहेत. तसेच, तिच्या मित्राच्या कवटीचे केस देखील वाढत चालले आहेत.
मृत माणसांची नखे आणि केस वाढण्याच्या पद्धतीला मोजण्याचे सुनियोजित रिसर्च खूप कमी झालेले आहेत.
पण यात काहीही आश्चर्याची गोष्ट नाही. याच्या माहितीसाठी आपल्याला ऐतिहासिक गोष्टी आणि मृतांवर काम करणाऱ्या मेडिकल विद्यार्थ्यांच्या वर्णनांवर लक्ष दिले पाहिजे.

ट्रान्सप्लांट करणाऱ्या सर्जनना देखील मृत्यूनंतर कितीतरी प्रकारच्या कोशिकांवर काम करण्याचा अनुभव असतो. वेगवेगळ्या कोशिका ह्या वेगवेगळ्या गतीने मरतात. आपले हृद्य धडधडणे बंद झाल्यावर मेंदूला ऑक्सिजन पुरवठा बंद होतो.
या कारणामुळे मेंदूमध्ये ग्लुकोजचे संग्रहण होत नाही, त्यामुळे स्नायूंची कोशिका तीन ते सात मिनिटांच्या आतमध्ये मरतात.
–
- तुमच्या मृत्युनंतर “आपला मृत्यू झालाय” याची तुम्हाला कल्पना असते!- शास्त्राज्ञांचा अचाट शोध
- तृतीय पंथीयांच्या अंत्यसंस्काराचा विधी दाखवून देतो की, त्यांची मृत्यूनंतर देखील हेटाळणी थांबत नाही!
–
ट्रान्सप्लांट सर्जनना डोनरच्या मृत्युनंतर तीस मिनिटांच्या आतमध्ये शरीरातील मूत्रपिंड म्हणजेच किडन्या, यकृत आणि हृदय काढून घायचे असते आणि त्यांना हे अवयव इतर रुग्णांना ज्यांना याची गरज आहे, अशा लोकांच्या शरीरामध्ये सहा तासांच्या आतमध्ये लावावे लागते. आपल्या त्वचेच्या कोशिका अधिक वेळेपर्यंत जिवंत राहतात.

केस आणि नखे
नखांना वाढण्यासाठी नवीन कोशिका तयार होणे गरजेचे आहे आणि ग्लुकोजशिवाय हे शक्य नाही आहे. आपली नखे ही दररोज जवळपास ०.१ मिमीच्या वेगाने वाढतात आणि हा वेग आपले वय वाढण्याच्या बरोबरच कमी होत जाते.
नखांच्या संरचनेच्या बरोबर खाली कोशिकांचा एक थर असतो, ज्याला जीवाणू जाळे म्हटले जाते. हा थर मोठ्या मात्रेमध्ये कोशिकांचे उत्पादन करतो, ज्याच्यामुळे नखांचे नवीन भाग तयार होतात.
नवीन कोशिका जुन्या कोशिकांना पुढे ढकलतात, ज्याच्यामुळे नख हे कोन्यावरून वाढताना दिसते.
मृत्यू हा ग्लुकोजच्या पुरवठ्यावर प्रतिबंध लावतो आणि त्याचप्रमाणे नखांच्या वाढण्यावर देखील प्रतिबंध लागतो. केसांविषयी देखील असेच काहीसे होते. प्रत्येक केस फॉलिकलमध्ये असतो, ज्यामध्ये हा वाढतो. फॉलिकलच्या मुळाशी केसांचा साचा, कोशिकांचा समूह असतो, जो विभाजित होऊन नवीन कोशिकांचे उत्पादन करतो.
ज्यामुळे केस लांब होतात. या कोशिका खूप पटापट विभाजित होतात, पण त्या तेव्हाच होतात जेव्हा त्यांना ऊर्जा मिळत राहते.

जेव्हा हृदय रक्तामधील ऑक्सिजनचा पुरवठा बंद करते, तेव्हा ऊर्जा संपत जाते आणि कोशिकांचे विभाजन देखील थांबते आणि याच्यामुळे केस वाढणे देखील थांबते.
यावरून हे समजते की, मृत्युनंतर केस आणि नखे वाढणे या फक्त एक प्रकारच्या भाकड कथा आहेत. हा अनुमान पूर्णपणे चुकीचा आहे, पण यामागे देखील एक जैविक आधार आहे.
असे काही नाही की, मृत्युनंतर नखे वाढत असतात, पण या नखांच्या चारी बाजूंची त्वचा सुकत जात असल्यामुळे आपल्याला ती नखे लांब वाटतात.
मृत माणसाच्या कवटीची त्वचा देखील इतर त्वचेसारखे सुकण्यास सुरुवात होते आणि ती कवटीकडे खेचली जाते आणि त्यामुळे आपल्याला ते केस मोठे होत असल्याचा भास होतो.
–
- मृत्यूच्या समीप असलेल्या माणसाच्या मनामध्ये नक्की काय विचार चालू असतात ?
- जीवनाच्या अंतिम सत्य – मृत्यू – बद्दल एक असाही विचार, जो सर्वांनी करायला हवा
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.