भारतात “मुस्लिम” असुरक्षित आहेत – की इतर कुणी?

आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

काही महिन्यांपूर्वी, उपराष्ट्र्पती पदावरून पायउतार झालेल्या हमीद अन्सारी ह्यांनी त्यांचं मन मोकळं केलं होतं. ते म्हणाले होते –

मुस्लिमांच्या मनात बेचैनी आहे. त्यांच्या मनात असुरक्षितता घर करून बसतीये.

तसं हे फार वेगळं नाही.

भारतातील पुरोगामी सेक्युलर लोकांना भारतात मुस्लिम नेहेमीच असुरक्षित वाटत आले आहेत. त्यांच्या दृष्टीने, सत्तेत अमुक अमुक प्रकारचे लोक असले की एका रात्रीत सुरक्षित चं असुरक्षित अन असुरक्षित चं सुरक्षित होतं असतं.

त्याच धर्तीवर हमीद अन्सारींचं मत होतं. त्यांचं हे मत वाचताच काही भयावह प्रसंग डोळ्यासमोरून तरळून गेले…


औरंगाबाद विमानतळावरून तस्लिमा नसरीनना हुसकून लावण्यात आलं…

 

muslims are insecure hamid ansari taslima aurangabad marathipizza

 

तारिक फतेहना दिल्ली उर्दू फेस्टिवलमध्ये धक्का बुक्की झाली…आणि JNU मध्ये जीवे मारण्याची धमकी दिली गेली…!

 

wikimedia.org

धर्माची प्रतीकं वापरली म्हणून लोकमत कार्यालयाची तोडफोड केली गेली…

“फेसबुकवर पैगंबरांबद्दल आक्षेपार्ह मजकूर लिहिणाऱ्याला आमच्या ताब्यात द्या” अशी मागणी करत, ट्रॉम्बे पोलीस चौकीची तोडफोड आणि जाळपोळ केली गेली…

trombay police station violence marathipizza
स्रोत: http://timesofindia.indiatimes.com/city/mumbai/two-police-vehicles-set-ablaze-by-a-mob-in-trombay/articleshow/57711965.cms

भारताशी संबंध नसलेल्या प्रकरणावरून आझाद मैदानावर यथेच्छ हिंसाचार केला गेला…तिथल्या शहिद स्मारकाची विटंबना केली गेली…

 

azad maidan riots marathipizza

पैगंबरांवर चित्रित चित्रपटाला संगीत दिलं म्हणून ए आर रहमानवर फतवा निघाला…!

 

http://qmedia.qyuki.com

न घाबरता, उच्चारवात भारत माता की जय/वंदे मातरमला उघड विरोध केला गेला…अजूनही बिनधास्त विरोध केला जातो…

 

muslim-protest-marathipizza

मालदामध्ये “कमलेश तिवारीचा शिरच्छेद करा” म्हणून लाखो लोकांनी तोडफोड आणि हिंसा केली…

 

malda riots marathipizza

 

बसिरहाटमध्ये एका साध्या सोशल मीडिया पोस्टवरून दंगे सुरू झाले…

“तुम १०० करोड है ना? हम २५ करोड है ना? १५ मिनट के लिए पुलीस हटा दो…” असं अकबरुद्दीन ओवैसी म्हणू शकले…त्या म्हणण्यावर जमलेल्या श्रोता समुदाय कडाडून टाळ्या वाजवू शकला…

 

akbaruddin owaisi marathipizza

 

“नरेंद्र मोदींची दाढी कापा…केस छाटा आणि तोंड काळे करा…” अशी सुपारी कम फतवा मौलाना नुरूर रहमान बरकती उघड उघड बोलू शकले…

“आमची संख्या वाढू द्या…तुमच्या घरात घुसून आम्ही नमाज पढू” असं मौलाना अश्रफ जीलानी म्हणू शकले…

वरील सर्व उदाहरणांमध्ये काश्मीरमधील उदाहरणे मोजली नाहीयेत…अन्यथा ही यादी अनंत होऊ शकते.

हे सर्व वाचून…आदरणीय माजी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी ह्यांना आणि तमाम पुरोगामी सेक्युलरांना प्रश्न विचारावासा वाटतो…

भारतात खरे भयभीत कोण आहेत हो?

मुसलमान?

की अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि व्यक्ती स्वातंत्र्य मानणारे तस्लिमा नसरीन, तारिक फतेह आणि ए आर रेहमान?

असुरक्षित कोण आहेत हो?

मुसलमान?

की लोकमत सारखी माध्यमं, शाहिद स्मारकासारखी आपली मानचिन्ह की खुद्द पोलीस?

चिंताक्रांत कोण असतील?

मुसलमान?

की सोशल मीडियावर आपल्या मनातील भावना व्यक्त करणारा कोणताही भारतीय?

खरंच…

खरंच भयभीत आणि असुरक्षित कोण आहे? मुस्लिम की इतर कुणी?

इथे सरसकट “सर्व मुस्लिम” वाईट, हिंसक, अतिरेकी आहेत असं म्हटल्याचा भास निर्माण होत असेल – तर तसा हेतू अर्थातच नाही. परंतु देशात मुस्लिमांविरुद्ध जनमत तयार होत असेल, वातावरण गरम होत असेल तर मुस्लिमांनी अंतर्मुख होऊन आपल्यातील हे अनिष्ट अंग काढून टाकायला हवेत. भारताचे माजी उपराष्ट्र्पती म्हणून आणि एक मुस्लिम म्हणून आदरणीय हमीद जींनी हे बदल घडवून आणण्यात पुढाकार घ्यायला हवा. विचारवंतांनी आपली जबाबदारी म्हणून प्रबोधन घडवून आणायला हवं.

परंतु ते नं करता हमीद अन्सारी चक्क उलट काहीतरी बोलत आहेत. म्हणून आज ह्या घटनांची, उदाहरणांची उजळणी करावीशी वाटली.

तथाकथित विचारवंतांनी “विचार” करायला हवा. त्यांनी चिंतनात आणि चिंतेत असायला हवं. खरे चिंतीत मुस्लिमांना व्होटबँक समजणारे आहेत. मुस्लिम समाज पुढारला तर व्हॉटबँकेचे राजकारण केल्याशिवाय सत्तेत येता यायचे नाही म्हणून भयभीत आहेत.

ह्या समस्यांचा गांभीर्याने विचार करायला हवाय – अन्यथा मुस्लिमेतरांमधील रोष वाढत जाईल…जे भारतासाठी घातक ठरेल.

===

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असे नाही. । आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

 

Suraj Udgirkar

A small town person who loves to write, read & then wrangle about it. usual business.

suraj has 32 posts and counting.See all posts by suraj

2 thoughts on “भारतात “मुस्लिम” असुरक्षित आहेत – की इतर कुणी?

 • August 11, 2017 at 10:44 pm
  Permalink

  हलकट कोंग्रेस मुळे हि परीस्थिती आली आहे.

  Reply
 • February 5, 2018 at 10:50 pm
  Permalink

  Musalman he bhartache nagrik mulich navhate . congressne jabardastine votebankesathi muslimanche langulchalan kele aani hinduche khacchikaran kele.
  Musalmanachi himmat kashi hote ethe 100//25 karod mhananyachi.
  Lokmat sarkhe paper jyache editor he hinduvirodhi batmya denyasathi prasidhdha aahe.

  Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *