सध्या धुमाकूळ घालतोय ‘अँटी ग्रॅव्हिटी योगा’!

आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

===

गेल्या काही वर्षांत अख्ख्या जगाला भारतीय योगविद्येने अगदी वेडे करून सोडले आहे. आपला “योग” पश्चिमेकडे गेला आणि “योगा” झाला. अगदी मागील २-३ वर्षात तर योगा इतका भन्नाट पसरलाय की विदेशातील लोक न चुकता किमान १ तास तरी योग करतात आणि ज्यांची ही संस्कृती आहे ते आपण मात्र उठल्या उठल्या पहिले कामावर धावतो. असो! इथे तो वाद नाही, पण आपली संस्कृती संपूर्ण जगातील लोकांच्या सुदृढ आरोग्याची गुरुकिल्ली बनत चालली आहे याचा आपल्याला अभिमान असायला हवा.

.

तुम्हाला माहितच असले की योगामध्ये निरनिराळे प्रकार असतात. असाच एक मॉडर्न प्रकारचा योगा साध्य सगळीकडे धुमाकूळ घालतोय. या नवीन योगा प्रकारचं नाव आहे “अँटी ग्रॅव्हिटी योगा”!

.

antigravity-aerial-yoga-marathipizza00

स्रोत

.

अमेरिका आणि इतर पाश्चिमात्य देशांमध्ये अँटी ग्रॅव्हिटी योगा शिकण्याकडे कल वाढत आहे. पॅराशूट बनवण्यासाठी वापरल्या जाणा-या रेशमी कापडापासून हा झोपाळा तयार केला जातो.

.

antigravity-aerial-yoga-marathipizza01

स्रोत

.

दोरीने तो जमिनीपासून काही अंतर उरेल, अशा प्रकारे तो छताला टांगला जातो. या झोपाळ्यामध्ये योगासने केली जातात. अशा प्रकारे योगासने करताना शरीराच्या लयबद्ध हालचाली होतात, त्याला अँटी ग्रॅव्हिटी योग म्हणतात.

.

antigravity-aerial-yoga-marathipizza02

स्रोत

.

अँटी ग्रॅव्हिटी योगासनांमुळे शरीरात हार्मोन्सवर नियंत्रण ठेवणा-या थायरॉइड आणि पिच्युटरी ग्रंथींना जादा रक्तपुरवठा होतो, रक्ताभिसरण वाढते आणि शरीर उत्साही आणि निरोगी राहते. अमेरिकन नृत्यदिग्दर्शक ख्रिस्टोफर हॅरिसन यांनी अँटी ग्रॅव्हिटी योगासनांची पद्धत विकसित केली आहे.

.

antigravity-aerial-yoga-marathipizza03

स्रोत

.

कठीण योगासने जोखमीविना करता यावीत, यासाठी ही पद्धत विकसित केली आहे. भारतातील दोरीच्या मल्लखांबाशी मात्र याचे बरेच साम्य आहे.

.

antigravity-aerial-yoga-marathipizza04

स्रोत

.

हळूहळू भारतात देखील याची क्रेझ वाढत आहे. त्यामुळे तुम्हाला असा प्रकार कुठे दिसला तर चकित होऊ नका..! बाय द वे हे काहीसं थ्रिलिंग ट्राय करून बघायला हरकत देखील नाही..! काय म्हणता?

लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?