चंद्रावर “कुणीतरी” आहे – NASA च्या आणखी एका वैज्ञानिकाचा गौप्यस्फोट

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

भारताच्या चांद्रयान, मंगळयान या मोहिमांमुळे भारतात अवकाश विश्वाबद्दल कुतूहल वाढत जात आहे. आबालवृद्ध या विषयावर चर्चा करत आहेत.

 

Chandrayan 2
Hindustan Times

परंतु एकूणच विज्ञानात रस असणाऱ्या अनेकांसाठी हा विषय फार आधीपासूनच औत्सुक्याचा राहिलेला आहे.

त्यात विविध ग्रहांवर, दूरवरच्या सुर्यमालांमध्ये शक्यता असलेल्या जीवसृष्टीबद्दल प्रचंड कुतूहल अनेकांच्या मनात असतं.

परग्रहवासी, माणसाचा आणि अश्या aliens चा संपर्क – ह्या विषयावर तुम्ही बोलायला लागलात तर तुम्हाला विचित्र प्रतिक्रिया मिळतील.

कुणाला तुम्ही चक्रम वाटाल तर कुणाला attention seeker – उगाच लक्ष ओढून घेण्यासाठी काहीतरी चमत्कारिक बोलणारे वाटाल.

पण थोडासा रिसर्च, थोडा गंभीर अभ्यास केलात – तर तुम्हाला ह्या विषयावर तुमचं म्हणणं सिद्ध करता येईल एवढं material इन्टरनेटवर सहज सापडेल.

 

the alien-marathipizza
pinterest.com

अमेरिकेच्या Apollo Mission बद्दल – चंद्रावरील स्वारीबद्द्ल – असेच अनेक तर्क-वितर्क प्रसिद्ध आहेत.

अनेकांचं असं म्हणणं आहे अमेरिका चंद्रावर पोहोचलीच नाहीये आणि रिलीज केले गेलेले video, फोटो खोटे आहेत.

तसाच दुसरा एका तर्क आहे – की चंद्रावर जे प्रत्यक्ष दिसलं ते सर्व अमेरिका / NASA आपणा सर्वांना सांगत नाहीये.

 

moon01-marathipizza

 

NASA मधील अनेक वैज्ञानिकांनीच ह्यावर कुठे ना कुठे भाष्य केलं आहे.

George Leonard ह्या NASA च्या scientist आणि photo analyst ने ह्या विषयावर – Somebody Else Is On The Moon , चंद्रावर कुणीतरी आहे – ह्या नावाचं एक पुस्तकच लिहिलं आहे. ते पुस्तक मोफत उपलब्ध करण्यात आलं आहे.

इच्छुक इथे क्लिक करून डाऊनलोड करू शकतात.

पुस्तकात Leanord ह्यांनी मिळवलेली माहिती आणि काही फोटो आहेत, जे चंद्रावरील मोठाल्या प्रिंट्स दाखवतात. हे फोटो फारसे स्पष्ट नाहीत.

ह्या फोटोंपेक्षा पुस्तकात केलेली विधानं अधिक महत्वाची आहेत. अशी विधानं करणारे Leanord हे असे एकच नाहीत.

 

aliens-attack-inmarathi01
inquisitr.com

Bob Dean ह्या US Army च्या रिटायर्ड Command Sargent Major ने युरोपमधील एका कॉन्फरंसमध्ये NASA ला – Never A Straight Answer – असं म्हटलंय.

ते म्हणतात :

नासा ने अपोलो मिशनच्या फिल्म रेकॉर्डिंगच्या तब्बल 40 रीळ नष्ट केल्या आहेत. कारण नासाच्या म्हणण्यानुसार ह्या रेकॉर्डिंग ‘disruptive,’ ‘socially unacceptable,’ ‘politically unacceptable’ होत्या.

आपण अनेकदा UFO – Unidentified Flying Objects – हवेत उडण्याऱ्या तबकड्यांबद्दल बरंच ऐकतो.

ह्यावर नासाच्या Dr. Edgar Mitchell (चंद्रावर चालणारी 6 वी व्यक्ती) ह्यांचं म्हणणं आहे –

मनुष्यजात नेहेमीच ह्या गुंत्यात अडकली आहे की आपणसोडून इतर कुणी ह्या विश्वात आहे का. आपल्या काळातच ह्याचं प्रमाण मिळालं आहे. नाही – आपण एकटे नाही आहोत!

 

aliens-attack-inmarathi02
tecake.in

ह्यावरून नासाकडे UFO, परग्रहवासी ह्यांच्याबद्दल ठोस माहिती असल्याचं प्रमाण मिळतं.

नासाचे आणखी एक वैज्ञानिक, Dr. Brian O’Leary सुद्धा हेच म्हणतात. ह्या व्हिडीओमध्ये बघा.

 

 

अगदी Leonard प्रमाणेच Dr. John Brandenburg जे Clementine Mission to the Moon ह्या मिशनचे Deputy Manager होते.

ते सुद्धा नासाकडे चंद्रावरील परग्रहवासीयांच्या हालचालीबद्दल ठोस माहिती असल्याचं सांगतात.

ते म्हणतात :

चंद्रावर कुणी काही बांधकाम करत आहे का हे चाचपडण्याचा Clementine Mission चा हेतू होता. मी त्या मिशनचे जे पण फोटो बघितले आहेत, ते हेच दाखवतात की चंद्रावर काही कृत्रिम structures नक्कीच आहेत.

 

अभ्यासूंनी / इच्छुकांनी ही डॉक्युमेंटरी नक्की बघायला हवी.

 

थोडक्यात – “परग्रहवासी” – ही आता साधी conspiracy theory राहिलेली नाही.

यावर विश्वासार्ह वाटावेत असे शास्त्रज्ञ, तंत्रज्ञ बोलू लागले आहेत. त्यामुळे येत्या काही या विषयावर काळात एखादी धक्कादायक, ठोस माहिती समोर येण्याची शक्यता नाकारता येत नाही!

थोडक्यात, परग्रहावरील जीवसृष्टी हा आता फक्त रंजक कथा कादंबऱ्या चित्रपट इ पुरता विषय नं रहाता, एक वास्तव म्हणून पुढे येऊ शकतो.

Image & Info Source: Collective-evolution

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

5 thoughts on “चंद्रावर “कुणीतरी” आहे – NASA च्या आणखी एका वैज्ञानिकाचा गौप्यस्फोट

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?