' १२ वी च्या विद्यार्थ्याची कमाल – विद्यार्थ्यांच्या अटेन्डन्सची काळजी घेणारं app! – InMarathi

१२ वी च्या विद्यार्थ्याची कमाल – विद्यार्थ्यांच्या अटेन्डन्सची काळजी घेणारं app!

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

आपल्या देशात इंजिनिअर्सची काही कमी नाही, भलेही भारतात बेरोजगारी असेल, विकासाचा वेग मंदावला असेल, तरी भारतीय तरुण काही ना काही करून आपल्या गरजा पूर्ण करतातच. आज तर भारताच्या प्रत्येक गल्लीत तुम्हाला एक-दोन इंजिनीअर नक्की सापडतील. इंजिनीअर  आणि टेक्नॉलॉजी याचं सूत्र जमलं की त्यातून काही ना काही इनोव्हेटिव्ह मिळणारच ह्याची शाश्वती नसते. इनोव्हेशनसाठी शोधक नजर लागते. प्रत्येक इंजिनिअरमध्ये ती असेलच असं नाही. पण ज्या कुणात ही नजर आहे, तो लोकांच्या समस्या-गरजा ओळखून नावीन्यपूर्ण सोल्युशन्स काढू शकतो. आज आम्ही तुम्हाला अश्याच एका चुणचुणीत मुलाची कहाणी सांगणार आहोत जो इंजिनिअर नाहीये, १२ वीचा विद्यार्थी आहे. पण स्वतः सहन  त्याने तोडगा काढला आणि एक इनोव्हेटिव्ह अॅप तयार केलं आहे…!

anirudh_goyal02-marathipizza
indianexpress.com

दिल्ली राहणारा अनिरुद्ध गोयल हा एक अतिशय हुशार विद्यार्थी. त्याने 9.4 CGPA ने दहावी पास केली. पण त्या दरम्यान त्याला अनेक समस्यांना सामोरे जावं लागलं. अनिरुद्ध Tonsils ने ग्रस्त असल्या कारणाने त्याला शाळेतून अनेकदा  sick leaves घ्याव्या लागल्या, तसेच त्याला परीक्षे पूर्वी  preparatory leaves देखील घ्याव्या लागल्या. त्यामुळे त्याला शाळा प्रशासनाच्या कित्येक प्राश्नांना तोंड द्यावे लागले होते. यामुळे अनुरूद्ध खूप विचलित झाला होता, त्यामुळे त्याने एक असं अॅप्लिकेशन बनवलं, ज्याने शाळेतील विद्यार्थ्यांच्या उपस्थिती संबंधी समस्या सोडवल्या जातील.

हे अॅप्लिकेशन आधी विद्यार्थ्यांना त्यांच्या Attendance बद्दल विचारतं आणि त्यानंतर परीक्षेत बसण्यासाठी Minimum Attendance संबधी माहिती दिली जाते. या App मुळे विद्यार्थ्यांना याची माहिती मिळते की, ते शाळेतून किती दिवस सुट्टी घेऊ शकतात. तसेच त्यांना जास्त सुट्ट्या घेण्यापासून हा App सावधही करतो. यामुळे विद्यार्थी Minimum Attendance संबंधी जागरूक देखील असतात.

Attendx असे या App चं नाव आहे. अशा प्रकारचा हा पहिलाच असा App आहे ज्यात शिक्षक आणि पालकांच्या परवानगी शिवाय विद्यार्थी आपल्या Attendance संबंधी सर्व महत्वपूर्ण माहिती जाणून घेऊ शकतात. मॉर्डन स्टूडेंट्सला येणाऱ्या समस्यांना बघता या App ला बनविण्यात आले आहे.

attendx-marathipizza

 

हा App निर्माता अनिरुद्ध गोयल सांगतो की,

मी शाळेत C++ शिकलो होतो. पण massive open online course (MOOCs) केल्या नंतर मी कोडींग ला व्यवस्थित समजू शकलो.

मी टेक्नोलॉजीसाठी खूप passionate आहे. दहावीच्या माझ्या अनुभवानंतर मी Attendanceच्या मुद्द्याला अतिशय गंभीरतेने घेतले. शाळेत “Exun Clan” नावाचा एक टेक्नोलॉजी क्लब आहे. जिथे माझे अनेक सिनियर्स काहीतरी नवीन इनोव्हेटिव्ह करण्याचा प्रयत्न करत असतात. त्यांच्यापासून प्रेरणा घेत माझ्या summer vacations दरम्यान या App वर काम करण्यास सुरु केले.

सध्या अनिरुद्ध १२ वीत शिकतो आहे. त्यामुळे शाळा आणि शिकवणी यांच्या सोबतच या App वर देखील काम करणे एवढं सोप नव्हत. पण त्याने हे सर्वकाही यशस्वीरीत्या सांभाळले. याबद्दल सांगताना अनिरुद्ध म्हणतो की,

‘मी कुठलीही गोष्ट चटकन लक्षात ठेवणाऱ्यांमधून आहे, त्यामुळे अभ्यासात मी मागे पडलो तरी मी ते सहज कॅच करू शकतो. हा App बनविताना वेळ मॅनेज करणे जरा अवघड होते. पण मी खूप आनंदी आहे की मी हे करण्यात यशस्वी झालो.’

परीक्षेत माझे गुण नेहमीचं चांगले येतात, पण मी कधी टॉप करण्याचा विचार नाही करत. मला कोडींगमध्ये खूप interest आहे त्यामुळे मी कंप्यूटर साइंसमध्ये माझं भविष्य बनवू इच्छितो. त्यासाठी मी फॉरेन यूनिवर्सिटीजमध्ये apply करण्याचा विचार करतो आहे.

अनिरुद्धला फक्त कोडींगचच वेड नाहीये! तर त्याला त्याच्या रिकाम्या वेळात त्याला क्रिकेट खेळायला आवडतं. त्याला गेम ऑफ थ्रोन्स आणि ब्रेकिंग बॅड हे शोज देखील खूप आवडतात. एवढच नाही तर त्याने लोगो डिझायनर फॉर बिगिनर्स यावर एक पुस्तक देखील लिहिले आहे. लवकरच या पुस्तकाला प्रकाशित देखील करण्यात येणार आहे. त्याचं स्वतःचं एक youtube चॅनेल देखील आहे…!

अनिरुद्ध सारखे अनेक महत्वाकांशी विद्यार्थी आपल्या भारतात आहेत, ज्यांना गरज आहे ती केवळ एका proper guidance ची…

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017  InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?