१० विकेट्सचा विश्वविक्रम – कुंबळेने वकार-वसीमचं षडयंत्र धुळीला मिळवलं!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

क्रिकेट हा एक असा खेळ आहे जो भारतात सर्वात अधिक महत्वाचा मानला जातो, आणि भारतीय लोक क्रिकेटसाठी वेडी आहेत असं म्हंटल तरी अतिशयोक्ती होणार नाही, आपल्याइथे क्रिकेट खेळणाऱ्या प्रत्येक खेळाडूला डोक्यावर घेतलं जात!

 

crikcet wallpaper inmrathi
wallpaperaccess

 

आणि याची बरीच उदाहरण तुम्ही पाहिली असतील, सुनील गावस्कर, सचिन तेंडुलकर, दिलीप वेंगसरकर,अनिल कुंबळे, सौरव गांगुली, राहुल द्रविड, कपिल देव, संदीप पाटील आणि असे बरेच आहेत ज्यांची करोडो क्रिकेट फॅन्स पूजा करतात!

यावरून तुम्हाला अंदाज आला असेलच क्रिकेट हा भारतासाठी किती महत्वाचा खेळ आहे ते! खरंतर आपल्याइथे ऑलिम्पिक गेम्स पेक्षा क्रिकेट वर जास्त फोकस केलं जातं हि खरंतर दुर्दैवाची बाब आहे!

पण असो, कोणताही खेळ हा आपल्याला खूप काही शिकवतो हे सत्य मात्र नाकारून चालणार नाही!

सध्या नवीनच येऊ घातलेल्या आयपीएल आणि २०-२० या फॉरमॅट मुळे सुद्धा टेस्ट क्रिकेट आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट यावर खूप परीणाम होतोय हि सुद्धा लक्षात घेण्यासारखीच बाब आहे!

 

 

ipl logo
pinterest

 

क्रिकेट चे तीन मुख्य भाग आहेत ते म्हणजे बॅटिंग, बॉलिंग आणि फिल्डिंग! पण प्रत्येकाला जास्त आकर्षण वाटतं ते बॅटिंग च.. कारण बॅटिंग करणारा बॅट्समनच खेळाचा केंद्रबिंदू आहे असं आपल्याला वाटत असत!

तुम्ही आजही बघितलं तरी एका बॉलर पेक्षा एका बॅट्समनचं फॅन फॉलोविंग जास्त आहे हे तुमच्या निदर्शनास येईल, पण बॉलिंग आणि फिल्डिंग हे सुद्धा या खेळाचे अविभाज्य घटक आहेत हे आपल्याला विसरून चालणार नाही!

 

bowl vs bat inmarathi
wikipedia

 

आंतरराष्ट्रीय क्रिकेट टीम मध्ये खूप नामचीन बॅट्समन होऊन गेले आणि तो वारसा सध्या विराट कोहली रोहीत शर्मा सारखे प्रचंड कीर्तिवंत बॅट्समन पुढे नेट आहेत..आणि सचिन सारखा बॅट्समन तर पुन्हा होईल कि नाही हे सुद्धा ठाऊक आहेच!

पण आपल्या टीम ला उत्तम बॉलर्स सुद्धा लाभले आहेत, मदन लाल, फारूक इंजिनियर, बिशन सिंग बेदी, एकनाथ सोलकर, कपिल देव, अनिल कुंबळे, हे जुन्या टीममधले काही दमदार बॉलर्स होते!

 

indian bowlers inmarathi
Kreedon

 

तर नवीन टीमला झहीर खान, अजित आगरकर, हरभजन सिंग, इरफान पठाण असे काही तुफान बॉलर्स लाभले आणि या सगळ्या गोलंदाजांनी त्यांचा काळ खूप गाजवला! पण तरीही आपल्या इथे बॉलिंग वर जास्त लक्ष दिल जात नाही हि बाब अत्यंत खरी आहे!

आणि यामुळेच कधी कधी संपूर्ण टीमचा परफॉर्म्सन फेल जातो! भारतीय क्रिकेट मध्ये बॉलिंगचा प्रभाव फार कमीवेळा दिसलाय. प्रभाव पाडू शकेल असे गोलंदाज देखील विरळाच.

अनिल कुंबळे हे नाव अश्या वेगळ्या बॉलर्सपैकी एक. कुंबळेने, पाकिस्तान विरुद्धच्या कसोटी सामन्यात १० बळीं घेऊन विक्रम केल्याची घटना तर प्रत्येक भारतीय क्रिकेट रसिकाच्या हृदयावर कायमची कोरल्या गेली आहे.

७ फेब्रुवारी १९९९ रोजी स्पीनर अनिल कुंबळेने कसोटी सामन्याच्या एका डावात १० विकेट्स घेत एक अभिमानास्पद इतिहास रचला.

हा भीमपराक्रम करून अशी कामगिरी करणारा तो जगातील दुसरा बॉलर ठरला होता. या आधी इंग्लंडच्या जिम लेकर या बॉलरने  ही कामगिरी करून ठेवली होती.

 

Kumble.jpeg inmarathi
India Today

 

अनिल कुंबळेने करून दाखवलेल्या या अद्वितीय कामगिरीला यंदा १८ वर्षे पूर्ण झाली. यावेळी सेहवागने सहा वर्षांपूर्वीची एका वृत्तपत्रातील बातमी सोशल मिडीयावर शेअर केली.

या बातमीमध्ये वसिम अक्रमने आपण स्वत:हून अनिल कुंबळेला १० विकेट पूर्ण करण्यात कशी मदत केली हे सांगितले होते. याच बातमीचा आधार घेत वीरेंद्र सेहवागने अनिल कुंबळेने टिपलेल्या त्या १० विकेट्स मागच्या कहाणीला पुन्हा उजाळा दिला.

 

sehwag-post-marathipizza
twitter

 

दिल्लीच्या फिरोज सहा कोटला मैदानावर खेळवण्यात आलेल्या त्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या डावात वासिम अक्रम हा अनिल कुंबळेचा १० वा बळी ठरला आणि त्याने कुंबळेला ही कामगिरी पूर्ण करण्यात जाणून मोलाची मदतच केली.

त्याच झालं असं की, अनिल कुंबळेने पाकिस्तान संघांचे ९ विकेट्स टिपले होते. ११ वा खेळाडू म्हणून वसिम अक्रम बॅटिंग साठी आला. नॉन स्ट्राईकला वकार युनिस उभा होता. वकार युनिस वसिम अक्रमकडे गेला आणि म्हणाला,

अनिल कुंबळेला १० वी विकेट घेऊ द्यायची नाही. त्यासाठी तू रन आउट हो, म्हणजे ती विकेट कुंबळेच्या खात्यात पकडली  जाणार नाही आणि त्याला रेकॉर्ड बनवता येणार नाही.

त्याची युक्ती ऐकून वसिम अक्रम म्हणाला होता,

 १० विकेट घेण्याचा विक्रम अनिल च्या नशिबात असेल तर काहीही झालं तरी ते घडणारच. पण मी रन आउट होणार नाही आणि माझी विकेट पण त्याला देणार नाही.

पण शेवटी वसिम अक्रमने मारलेला चेंडू लक्ष्मणच्या हातात स्थिरावला आणि अनिल कुंबळेने अक्रमची विकेट घेऊनच तो विक्रम पूर्ण केला.

 

anil-kumble-10-wickets-marathipizza01

स्रोत

याबद्दल बोलताना वसिम अक्रम म्हणतो,

 

wasim akram inmarathi
hindustan times

 

मला स्वत:वर जास्तच विश्वास होता आणि जणू परमेश्वराच्याच मनात होते की काय म्हणून त्याचा १० वा बळी मीच ठरलो. जर मी वकार युनिसच ऐकलं असतं तर कदाचित अनिल कुंबळेच्या हातून तो रेकॉर्ड झाला नसता. पण शेवटी जे व्हायचं होतं तेच घडलं.

 

anil-kumble-10-wickets-marathipizza02

 

या सामन्यात अनिल कुंबळेने २६.३ ओव्हर्समध्ये केवळ ७४ धावा देऊन पाकिस्तानचे सर्व गडी बाद केले आणि भारताने २१२ रन्सने पाकिस्तानवर ऐतिहासिक विजय मिळवला.

असा हा क्रिकेटच्या मैदानावरील एक अविस्मरणीय किस्सा!

(हे देखील वाचा: जेव्हा क्रिकेट टीममधील सर्व ११ खेळाडूंना Man Of The Match पुरस्कार मिळाला!)

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?