सेक्स : अध्यात्मिक सुखाचा परमोच्च बिंदू गाठण्याचा प्राचीन मार्ग

`2आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page

===


अध्यात्माचा आणि प्रेमाचा संबंध जोडला जातो. अध्यात्माचा आणि अधर्माचा संबंध जोडला जातो. अध्यात्म भावनिक, मानसिक, बौद्धिक पातळीवर चटकन समजण्यासारखी गोष्ट आहे. पण हेच अध्यात्म शारीरिक पातळीवर जर विचारात घेतले तर मात्र प्रश्नचिन्ह निर्माण होते. अध्यात्म आणि सेक्सचा जर संबंध जोडला तर त्याला कडाडून विरोध केला जातो.

खरे पाहता सेक्स ही कुठलीही विचित्र अशी गोष्ट नसून ती एक उर्जा आहे.

Sexual energy या संज्ञे चा उल्लेख आपण वारंवार वाचत राहतो. सेक्स केल्यानंतर शरीरात सेरोटीन हे मानसिक स्थिती आनंदी ठेवणारे हार्मोन स्त्रवते, मानसिक अस्वस्थता संपते, मनाची एकाग्रता वाढण्यास अथवा आपल्या कामावर लक्ष एकाग्र करण्यास मदत मिळते.
सेक्स फक्त लैंगिक भूक भागवण्याच्या हेतूने केला तर त्यापासून मिळणारं सुख हे क्षणभंगुर ठरतं.

मुळात प्रेम, भावना, एकमेकांबद्दल असलेला जिव्हाळा शारीरिक संबंधांचा दर्जा उंचावतो.

 

sexual-pleasure-inmarathi
hindustantimes.com

अर्थात सेक्स हा जीवनाचा एक भाग आहे अस समजून सेक्सचा भरपूर आनंद घेणारे लोक सेक्स कडे वस्तुनिष्ठ दृष्टीकोनातून पाहू शकतात. त्यांच्या जीवनात तणाव किंवा सेक्स न केल्यामुळे अधुरी राहिलेली शारीरिक भूक या गोष्टी नसतात. जे लोक आपल्या जोडीदाराबरोबर लैंगिक सुख उपभोगतात त्यांचा इंटेलिजंट कोशंट (IQ) शारीरिक सुखासाठी तडफडणाऱ्या माणसांपेक्षा जास्त चांगला असतो.

यातही स्त्री पुरुष या दोघांना मिळणाऱ्या सेक्शुअल एनर्जी चे स्वरूप वेगवेगळे असते.

पुरुष सेक्स करताना खूप जास्त उत्तेजित होतो आणि लवकर थंड देखील होतो. त्याची एनर्जी लवकर उत्सर्जित होते. स्त्रीचे तसे होत नाही. तिला उत्तेजना यायला वेळ लागतो. थंड पाणी उकळायला ठेवावे त्याप्रमाणे स्त्री हळूहळू तापते आणि तिच्यामधील उर्जा बराच काळ टिकून राहते. तिला थंड व्हायला वेळ लागतो.


कदाचित याच कारणासाठी सेक्स करताना पुरुषाची तृप्ती लगेच होते किंवा त्यांना क्लायमॅक्स लवकर मिळतो पण स्त्रीची तृप्ती तितक्या लवकर होत नाही.

तिच्यातील उर्जा बाहेर पडायला वाट मिळाली नाही तर इथूनच कुरबुरींना सुरुवात होत राहते. आपण पुरुष आणि स्त्री यांच्यामधील ज्या basic instinct आहेत त्या तर बदलू शकत नाही मात्र स्वत:च्या शरीराला समजून, स्वत:च्या शरीराची उर्जाकेंद्रे समजावून घेवून स्त्री आणि पुरुष एकमेकांच्या वेगवेगळ्या पातळीवर असणारी शारीरिक सुखाची उर्जा एकमेकांना पूरक अशा पातळीवर आणू शकतात.

 


sex-foreplay-inmarathi
lifecrust.com

सेक्सविषयी जोडप्यांमध्ये मनमोकळी चर्चा होणे ही चरमसुखाची पहिली पायरी आहे. त्यासाठी एकमेकांना समजून त्याविषयी चर्चा करणे, स्वत:च्या आवडीनिवडी जोडीदारापर्यंत पोहोचवणे, त्याविषयी स्पष्टपणे एकमेकांना बोलणे, सेक्सच्या क्रियेकडे एक निषिद्ध गोष्ट म्हणून न बघता एक दैवी सुखाचा आनंद देणारी क्रिया म्हणून बघणे हा दृष्टिकोनातील बदल जोडप्यांच्या आयुष्यात खूप काही बदल घडवू शकतो.

मुळात सेक्स ही घाबरून किंवा दडपण घेवून करण्यासारखी क्रिया नाही. सेक्स ही स्वत:च्या शरीरातील उर्जा एका परिसीमे पर्यंत आणण्याची आनंददायी प्रक्रिया आहे. तिचा आनंद खुल्या दिलाने आणि मोकळ्या मनाने घेता यायला हवा.

प्राचीन काळापासून अनेक पंथांमध्ये सेक्स ला एक ritual चा दर्जा दिलेला आहे. अनेक पंथांचा असा विश्वास होता की सेक्स द्वारे मिळणारी उर्जा त्यांना स्वत:मध्ये असलेल्या higher self ला किंवा परमेश्वराला जोडण्यासाठी मदत करते.

भारतामध्ये देखील “तांत्रिक सेक्स” अशी संज्ञा वापरली जाते. तंत्रामध्ये ईश्वराच्या सान्निध्यात जाण्यासाठी सेक्स हे एक साधन म्हणून वापरले जाते.

या काही गोष्टींवरून आपणास कल्पना अली असेलच की सेक्स द्वारे मिळालेली उर्जा त्या उर्जेच स्वरूप फक्त एक वासना किंवा शरीराची भूक भागवण्याचे साधन इतकेच मर्यादित नाही. त्याद्वारे मिळणारी उर्जा किंवा समाधान हे अध्यात्मिक स्वरूपाचे देखील असू शकते आणि असते.

 

erotic-inmarathi
scmp.com

भगवान रजनीश यांनी यासाठीच असं म्हटलं होतं की जो आनंद तुम्हाला प्रगाढ ध्यानात मिळतो तोच आनंद सेक्स करताना परमोच्च सुखाचा बिंदू गाठल्यानंतर मिळू शकतो.

वस्तुत: सेक्स आणि ध्यान यांची संकल्पना एकाच आहे. विचारविरहीत अवस्थेचा आणि परमोच्च आनंदाचा क्षण तुम्हाला ध्यानामध्ये मिळू शकतो तसा शारीरिक क्रीडेच्या क्रिये मध्ये देखील मिळू शकतो.


===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?