KBC च्या नवव्या सत्रातील पहिल्या करोडपती!
आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page
===
टेलिव्हिजनवर आजकाल खूप नवनवीन रिअॅलिटी शो आपल्याला पाहायला मिळतात. त्यातलाच एक शो म्हणजे ‘कौन बनेगा करोडपती’ हा आहे. २००० साली आलेल्या या शोला कमी वेळात खूप मिळाली. या ‘कौन बनेगा करोडपती’ शोचे होस्ट बिग बी म्हणजेच ९०च्या दशकातील सुपरस्टार अमिताभ बच्चन हे आहेत. आजपर्यंत या शोने कितीतरी लोकांना आपली स्वप्ने पूर्ण करण्यासाठी मदत केली आहे. हे जिंकलेले लोक या शोमार्फत लोकांच्या समोर आले आणि सर्वांना त्यांच्या जीवनाचा आढावा मिळाला. काही दिवसांपूर्वीच ‘कौन बनेगा करोडपती’ या शोचे नवीन सत्र सुरू झाले आहे. हे या शोचे नववे सत्र आहे. ‘कौन बनेगा करोडपती’ या शोचे पहिल्यांदा १ कोटी, त्यानंतर ५ कोटी आणि आता ७ कोटी बक्षीस आहे.

या शोच्या आठव्या सत्रामध्ये अचीन नरूला आणि सार्थक नरूला या भावांनी पहिल्यांदा ७ कोटी रुपये मिळवले होते, ही भावंडे दिल्लीची होती. पण आताच्या नवव्या सत्रामध्ये झारखंडमधील गृहिणी व स्वयंसेवी कार्यकर्त्या असलेल्या अनामिका मजुमदार यांनी सर्व बंधने तोडली आणि पहिल्यांदाच १ कोटी एवढी मोठी रक्कम मिळवण्याचा मान पटकावला. याआधी या सत्रात कोणीही कोट्याधीश झाले नाही आहे. चला तर मग जाणून घेऊया, त्यांच्या जीवनाबद्दल आणि त्यांच्या विजयाबद्दल..
कौन बनेगा करोडपतीच्या (KBC) नवव्या सत्रामधील पहिल्या करोडपती अनामिका मजुमदार यांचे वय ४१ वर्ष आहे. त्या एक सामाजिक कार्यकर्त्या आहेत. अनामिका यांचे लग्न झाले असून त्यांना दोन मुले देखील आहेत. त्यांनी ‘फेथ इन इंडिया – वूमन ऑरा’ नावाची स्वयंसेवी संस्थेची स्थापना केली आहे. त्यांनी अनामिका यांनी आपली जिंकलेली रक्कम त्यांच्या एनजीओसाठी वापरण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांची ही संस्था झारखंडच्या ग्रामीण भागासाठी काम करते.

जमशेदपूर येथे राहणाऱ्या मजुमदार या याबद्दल म्हणतात की,
मला हा पैसा लोकांना मदत करण्यासाठी वापरायचा आहे. मी घरी गेल्यानंतर लगेचच या रकमेचा योग्य वापर करण्याचा प्रयत्न करेन. मी एवढ्या मोठ्या रकमेचा उपयोग करण्याचा सर्वोत्तम मार्ग शोधू इच्छित आहे.
“एक कोटी जिंकल्यानंतर मिस्टर अमिताभ बच्चन यांनी सांगितले की, एवढ्या प्रचंड रकमेचा वापर योग्य रीतीने करा आणि घाईघाईने कोणताही निर्णय घेऊ नका. मी त्यावेळेची उत्सुकतेने वाट पाहत आहे, जेव्हा मी या रकमेचा वापर करण्यासाठी योग्य पाऊल उचलेन.” असे त्यांनी हिंदुस्थान टाईम्सच्या अहवालामध्ये म्हटले आहे.

अनामिका यांनी १ कोटी जिंकल्यानंतर, त्यांना ७ कोटीचा जॅकपॉट प्रश्नाची निवड करण्यास सांगितले. पण त्यांनी कोणतीही जोखीम न घेण्याचा निर्णय केला आणि त्यांनी जॅकपॉटचा प्रश्न नाकारला. त्यानंतर अनामिका मजुमदार यांना करोडपती म्हणून घोषित करण्यात आले, त्यांना खूप आनंद झाला. आनंदाच्या भरामध्ये त्यांचे डोळे थोडे पाणावले, पण ते त्यांनी दिसू दिले नाही.
अनामिका मजुमदार पुढे म्हणाल्या की,
५० लाख रुपये जिंकल्यानंतर मी शेवटच्या प्रश्नामध्ये थोडी गोंधळून गेले होते, माझ्याकडे असलेल्या सर्व लाईफलाईन संपल्या होत्या आणि मला ही मिळालेली संधी घालवायची नव्हती. एवढ्यापर्यंत येऊन आता मागे फिरायचे नव्हते. त्यामुळे मी पूर्णपणे विचार केला आणि शेवटच्या २ – ३ सेकंदात घेतलेल्या निर्णयाने माझे संपूर्ण जीवन बदलून टाकले आहे.

अश्या या अनामिका मजुमदार यांना एवढी मोठी रक्कम जिंकल्याबद्दल खूप-खूप शुभेच्छा. आशा करतो की, त्यांनी आपल्या जीवनात अशाच यशाच्या पायऱ्या चढत राहाव्या.
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017 InMarathi.com | All rights reserved.