Imperial Blue आणि Royal Challenge हे दोन ब्रँड नेमकं विकतात तरी काय?

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===


Imperial Blue ची Men will be men ही जाहिरात सिरीज आठवतेय? आजवरच्या सर्वोत्तम विनोदी जाहिरातींमध्ये या जाहीरातींचा समावेश होतो. तुम्हाला देखील आठवत असतील या जाहिराती आणि त्यामध्ये वाजणारी तो मधुर गझल! पण समजा आम्ही तुम्हाला विचारलं की Imperial Blue कोणत्या प्रोडक्टची जाहिरात करते? तर तुम्ही म्हणाल – म्युजिक सीडीज, कारण ते जाहिरातीच्या शेवटी म्हणतात Imperial Blue Music CDs किंवा Imperial Blue Superhits! पण तुम्हाला खरंच सांगतो – हा तुमचा गैरसमज आहे.

आता दुसरं एक उदाहरण म्हणून Royal Challenge कडे पाहू. यांच्या जाहिराती देखील उत्तम असतात. आता पुन्हा तुम्हाला विचारलं की Royal Challenge कोणत्या प्रोडक्टची जाहिरात करतं? तर तुम्ही म्हणाल खेळासंबंधी काहीतरी आहे. पण हा देखील तुमाचा गैरसमज आहे.

 

imperial-blue-wky-marathipizza00

 

खरंतर Imperial Blue आणि Royal Challenge हे दोन्ही ब्रँड मद्य उत्पादन आणि विक्रीच्या क्षेत्रात कार्यरत आहे आणि त्यांचे अनुक्रमे प्रोडक्ट्स आहेत – Imperial Blue Whisky or Royal Stag Whisky. हो ही गोष्ट तशी बऱ्याच जणांना माहित आहे. पण हे ब्रँड जाहिरातींमधे कधीच आपल्या खऱ्या प्रोडक्ट्सची नावं घेत नाही, कारण तसं ते करूच शकत नाहीत. चला जाणून घेऊया असं का?

imperial-blue-wky-marathipizza01

स्रोत

१९९५ सालापासून मद्य आणि सिगारेट्सच्या जाहिरातींवर बंदी घालण्यात आली आहे आणि हेच कारण आहे की हे दोन विख्यात ब्रँड आपल्या प्रोडक्ट्सची जाहिरात करू शकत नाहीत. म्हणून या अश्या ब्रँडना स्वत:चा ब्रँड टिकून रहावा, लोकांच्या डोक्यात आणि ओठी त्याचं नाव असावं म्हणून brand extension किंवा extended products च्या प्रमोशनचा आसरा घ्यावा लागतो. या जाहिरातींमधून ते कधीकधी अश्या गोष्टीची जाहिरात करतात जी मार्केट मध्ये उपलब्ध नसतेच.

फक्त आपला ब्रँड प्रमोट करावा आणि लोकांमध्ये त्याचा हटके जाहिरातींच्या माध्यमातून प्रसार व्हावा या यामागचा एकमेव उद्देश असतो. अश्याप्रकारच्या जाहिरातीला Surrogate advertising म्हणतात. म्हणजे जे आपलं नाहीच आहे त्याची जाहिरात करत सुटायची.

अश्या प्रकारच्या जाहिरातींमध्ये आपलं जे मुख्य प्रोडक्ट आहे त्याच्याशी संबंधित प्रोडक्ट्सची निवड करून त्यांच्या मार्फत जाहिरात केली जाते.

 

royal-challenge-whisky-marathipizza

स्रोत


उदा. Royal Challenge चं मुख्य प्रोडक्ट आहे व्हिस्की.


म्हणून ते क्लब सोडा, मिनरल वॉटर यांच्या नावाखाली आपल्या ब्रँडचा प्रसार करतात.

तर दुसरीकडे Imperial Blue मात्र म्युजिक सीडीज किंवा प्लेयिंग कार्ड्स सारखं अगदीच वेगळ प्रोडक्ट घेऊन जाहिरात करते. यामागे त्यांचा एकच उद्देश असतो ती म्हणजे लोकांच्या डोक्यात आपलं नाव अगदी घुसवायचं आणि याबाबतील Imperial Blue यशस्वी देखील झालीये म्हणा.

त्यांच्या हटके जाहिराती आणि त्यामध्ये वाजणारी गझल यांमुळे खासकरून पुरुषांमध्ये Imperial Blue हे नाव सगळ्यांच्याच तोंडी आहे आणि मुख्य म्हणजे व्हिस्की प्रोडक्टसाठी त्यांचा प्राथमिक ग्राहक हा पुरुष वर्गच असल्याने त्यांची ही चाल अगदीच योग्य पडली आहे.

 

cigarette-Stock-Vector-alcohol-marathipizza

स्रोत

१९९५ च्या नियमानुसार मद्य आणि सिगारेट्सचा जाहिरातींच्या माध्यमातून थेट प्रसार करण्याची बंदी असली तरी त्यात कुठेही असा उल्लेख नाही की मद्य आणि सिगारेट्स विकणाऱ्या ब्रँडनी जाहिरात करूच नये.

त्यामुळे खोट्या प्रोडक्ट्सचं पांघरून घालून जाहिरात करणाऱ्या या ब्रँडना कोणीही अडवू शकत नाही आणि एकदा का लोकांच्या मनामनात आपल्या ब्रँडच नाव कोरण्यात ते यशस्वी झाले की लोक आपोआप त्या ब्रँडशी आणि त्यांच्या खऱ्या प्रोडक्ट्सशी जोडले जातात.

अश्याच जाहिराती करणाऱ्या अजून काही परिचित  ब्रँडची नावं – Royal Stag, Haywards 5000

याला म्हणतात जाहिरातीचा चक्रावून सोडणारा जबरदस्त फंडा!!


===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017  InMarathi.com | All rights reserved.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?