८००० रुपये पगार घेत, ५० लाखांचा मालक होणाऱ्या श्यामची गोष्ट!

आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

नोकरीची गरज प्रत्येकालाच आहे. कारण काम केलं तर पैसा मिळणार आणि मगच पोट भरणार. पण बहुतेक जणांची एक तक्रार असते की मनासारखी नोकरी मिळत नाही. मनासारखी नोकरी केवळ नशीबवाल्यांनाच मिळते असंही ऐकलंय. असो, पण कोणताही व्यक्ती घ्या एका नोकरीमध्ये संतुष्ट राहू शकत नाही. कधी न कधी त्याला त्या ठराविक नोकरीचा कामाचा कंटाळा येतोच आणि मग सारख्या नोकऱ्या बदलण्याची सवय लागते. काही काही जण तर ३-३ महिन्यांमध्येच नोकरी बदलत असतात. तर अश्याच असंतुष्ट लोकांसाठी आहे ही श्याम कुमारची गोष्ट.

 

shyam-kumar-marathhipizza01
moneycontrol.com

१० लोकांच्या भल्या मोठ्या कुटुंबासमवेत श्याम १० बाय १० च्या खोलीत राहत होता. वडिलांच्या आजारपणामुळे श्यामला शाळा सोडून काम करणे भाग होते आणि पुढे एखादी चांगली नोकरी मिळवण्यासाठी श्याम खटपट करू लागला. याचवेळी २०१० मध्ये श्यामची ओळख जितेंद्र कुमारशी झाली. जितेंद्र यांनी मोबाईल वॉलेट स्टार्टअप कंपनी- Citrus Pay सुरु केली होती.

भारतात त्यावेळी E-Commerce नव्यानेच सुरु झाले होते आणि तसला व्यवसाय एवढा प्रसिद्ध नव्हता. यावेळी जितेंद्र आपल्या कंपनीचा जम बसावा यासाठी प्रयत्न करत होते. २०१० मध्ये श्याम जितेंद्रच्या कंपनी मध्ये ८००० पगारात Peon च्या नोकरीला लागला. त्यावेळी त्या कंपनीमध्ये ५० पेक्षा कमी कर्मचारी होते.

 

shyam-kumar-marathhipizza02
scoopwhoop.com

५ वर्षानंतर कंपनीमध्ये Sequoia Capital, Ascent Capital, eContext Asia आणि Beenos Asia यासारख्या कंपन्यांनी गुंतवणूक केली आणि २०१६ मध्ये कंपनीसोबत श्यामचेची नशीब तेव्हा बदलले जेव्हा Pay U ने Citrus Pay कंपनी  १३० मिलियन डॉलर मध्ये खरेदी केली. कारण कंपनी विली गेल्याने आता श्यामच्या स्टॉक्सची किंमत ५० लाख रुपये झाली होती.

कंपनीच्या मालकाने स्वतः श्यामला ही आनंदाची बातमी दिली. परंतु जो पर्यंत शामच्या खात्यात ५० लाख रुपये जमा झाले नाहीत तो पर्यंत श्यामचा या गोष्टीवर विश्वास बसत नव्हता.

आज श्याम झोपडपट्टी सोडून १ बीएचके फ्लॅट मध्ये राहतो आहे. स्वत:चे घर असावे असे श्यामचे स्वप्न आहे. आपल्या दोन्ही मुलांनी शिकून डॉक्टर व्हावे अशी त्याची दाट इच्छा आहे.

 

shyam-kumar-marathhipizza03
gazabpost.com

सध्या ज्यांना आपल्या नोकरीबद्दल तक्रार आहे, त्यांनी यातून नक्कीच बोध घेतला पाहिजे. हा, खरंच काही समस्या असेल आणि नोकरीला नावं ठेवत असाल तर ठीक आहे. पण उगाच लहान सहन कारणांवरून आपल्या सध्याच्या नोकरीला दोष देत असाल, दुसऱ्याला जास्त पगार, मला कमी का? असं म्हणून जर नोकरीला शिव्या देत असाल, तर मात्र तुम्ही थोडा संयम बाळगण्याची खरंच गरज आहे. कारण प्रत्येकाला त्याच्या मेहनतीचं फळ नक्की मिळतं, पण त्यासाठी योग्य वेळ येण्याची गरज असते.

वरील गोष्टीत जर श्यामने देखील कंटाळून आपली नोकरी २-३ वर्षांत सोडली असतो तर आजही तो गरीबच असता, पण त्याने आहे त्यात संतुष्ट राहून तब्बल ५ वर्षे कमी पगारात काम केले आणि त्याचे फळ म्हणून तो आज लखपती आहे.

श्यामने सिद्ध करून दाखवले आहे की संयम बाळगला आणि मेहनत करणे सुरु ठेवले की ते नक्कीच फळाला येते.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017  InMarathi.com | All rights reserved.

One thought on “८००० रुपये पगार घेत, ५० लाखांचा मालक होणाऱ्या श्यामची गोष्ट!

  • June 26, 2017 at 9:33 am
    Permalink

    श्याम ला कंपनी चे शेअर्स मिळाले होते, ESOP म्हणून . म्हणजेच तो कंपनी मध्ये मालकी हक्क मिळवलेलं होता. जसे इन्फोसिस च्या कर्मचारी मालक आहेत तसेच हे!!!! या उदाहरणावरून लक्षात येईल की केवळ equity गुंतवणूक खऱ्या अर्थाने श्रीमंत होता येते

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?