दुसऱ्या महायुद्धादरम्यान बॉम्ब कारखाना लपवण्यासाठी अमेरिकेने लढवली होती अनोखी शक्कल !

===

===

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर

===

पहिले आणि दुसरे महायुद्ध हे खरंच अतिशय भयानक आणि त्रासदायक होते. त्याचे परिणाम आपल्याला आजही बघायला मिळतात. पहिल्या महायुद्धात अनेक देशांनी फक्त बघ्याची भूमिका घेतली होती.

InMarathi Android App

मात्र दुसऱ्या महायुद्धात जपानने केलेल्या पर्ल हार्बर हल्ल्यामुळे अमेरिका देखील ह्यात ओढविला गेला.

आणि त्याचा परिणाम देखील खूप भयंकर होता, जो आपण आजही हिरोशिमा-नागासाकीच्या नावाने आठवतो.

तेव्हाच खरेतर अमेरिका हा जगाच्या पाठीवर एक शक्तिशाली देश म्हणून समोर आला.

 

america-fact-marathipizza15
multiplesandmore.com
===
===

दुसऱ्या महायुद्धादरम्यान एक B-17 बॉम्बर बनविण्यासाठी २००,००० मिलियन डॉलरचा खर्च येत असे.

आणि अमेरिकन सेनेला असे हजारो बॉम्बर्स बनविण्याची गरज होती.

त्या सोबतच हे जिथे बनविले जात आहेत त्या ठिकाणाची सुरक्षा करणे हे त्याहून महत्वाचे होते.

 

boeing-fake-rooftop-town-inmarathi09

 

आपल्या शस्त्रांना गुप्त ठेवण्यासाठी अमेरिकन सेना काहीही करायची.

जसे की, हे बॉम्बर्स जिथे तयार होत होते ते स्थान गुप्त ठेवण्यासाठी अमेरिकन सेनेने हॉलीवूडमध्ये सेट बनविणाऱ्या डिझायनर्सना बोलावून त्यांच्याकडून चक्क एक बनावटी शहर उभारलं आणि अनेक अभिनेत्यांना तेथे राहण्यास देखील सांगितले.

 

boeing-fake-rooftop-town-inmarathi02

 

ह्या खोट्यानाट्या शहराला १९४४ साली बनविण्यात आलं होतं.

आणि युद्ध सुरु होऊन जेमतेम एक वर्षच झालं होतं तेव्हा ह्या खोट्या शहराला हटविण्यात आलं.

 

boeing-fake-rooftop-town-inmarathi01

 

===
===

John Stewart Detlie यांनी Boeing Plant 2 ला लपविण्यासाठी हा सेट तयार केला होता.

हा सेट बनविताना जी टेक्निक चित्रपटांचे सेट बनविण्याकरिता वापरली जाते तीच टेक्निक वापरण्यात आली होती.

तुम्हाला आश्चर्य वाटेल पण ह्या नकली शहरात नकली घरं, झाडं, रस्ते, कार हे सर्व बनविण्यात आलं होतं.

 

boeing-fake-rooftop-town-inmarathi13

 

ह्या बनावटी शहराच्या अगदी खाली जवळपास ३० हजार पुरुष आणि स्त्रिया दर महिन्याला ३०० बॉम्बर्स तयार करायचे.

 

boeing-fake-rooftop-town-inmarathi03

 

दुसऱ्या महायुद्धा दरम्यान १२,७३१ बॉम्ब येथे बनविण्यात आले होते. ह्या लढाऊ विमानांनी जर्मनीवर त्यावेळी ६४०,००० टन बॉम्ब टाकले होते.

पण वेळेनुसार हे ठिकाण आणि ही फॅक्टरीची स्थिती खराब झाली आणि २०१० पासून ह्या फॅक्टरीला नष्ट करण्याचं काम सुरु झालं आहे.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर । Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *