१५० हून अधिक दहशतवाद्यांना कंठस्नान घालणारा डेडलीएस्ट स्नायपर!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम

===

अमेरिकेचे संरक्षण खाते जगातील सर्वात खतरनाक आणि धाडसी खात्यांपैकी एक आहे, यात काही शंका नाही आणि अश्या या खात्यात आहेत तितकेच खतरनाक आणि धाडसी अधिकारी!

बहुतांश अमेरिकन चित्रपटांमध्ये दाखवलेले धाडसी सैन्य अधिकाऱ्यांचे पात्र देखील अश्याच रियल लाईफ सैन्य अधिकाऱ्यांच्या शौर्यगाथेपासून प्रेरित असतात.

भीती हा प्रकारच जणू त्यांच्या गावी नसतो, केवळ देशाची आणि बांधवांची सुरक्षा हे एकमेव लक्ष्य त्यांच्यासमोर असते आणि त्यातही कोणत्याही थराला जायची त्यांची तयारी असते. असाच एक शूर अमेरिकन सैन्य अधिकारी म्हणजे – क्रिस काईल होय.

chris-kayle-marathipizza01
timemilitary.files.wordpress.com

अमेरिकेच्या नेव्ही सील मधील हा अतिशय धाडसी कमांडो आणि सर्वोत्कृष्ट स्नायपर होय! ३९ वर्षांच्या क्रिस काईल यांच्या कामगिरीने दहशतवाद्यांच्या मनात धडकी भरत असे.

स्नायपर चालवण्यात तरबेज असलेल्या काईलने इराकमध्ये सर्वाधिक दहशतवाद्यांना मारण्याचा रेकॉर्ड केला होता. त्याने त्याच्या कारकिर्दीत चार वेळा इराक दौरा केला आहे, त्यात १५० हून अधिक दहशतवाद्यांना त्याने ठार केले. अमेरिकेच्या मिलिट्रीमधील हा सर्वश्रेष्ठ रेकॉर्ड आहे.

मोस्ट वाँटेड दहशतवादी ओसामा बीन लादेनला ठार मारण्याच्या ऑपरेशनमध्ये खासकरून  क्रिस काईलला सहभागी करून घेण्यात आले होते, कारण त्याचा इतका निष्णात दुसरा स्नायपर अमेरिकेकडे नव्हता.

एकवेळ ऑटोमॅटिक मशीनने चालवलेला निशाणा चुकेल, पण क्रिसचा निशाणा चुकणार नाही अशी त्याची ख्याती होती.

chris-kayle-marathipizza02
i2.mirror.co.uk

काईलने १९९९ ते २००९ या दहा वर्षात १५० हून अधिक दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. अमेरिकन लष्करातील हा आजवरचा सर्वोत्तम विक्रम आहे. त्याला त्यांच्या कारकिर्दीतील या यशाबद्दल दोन रौप्य आणि पाच कांस्य पदकांनी सन्मानीत करण्यात आले होते.

त्यासोबतच दोन मरीन आणि नौदल अचिव्हमेंट पदक देखील देण्यात आले होते.

दिडशेहून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा करणाऱ्या काईलने इराकमध्ये सर्वप्रथम एका महिला दहशतवाद्याला लक्ष्य केले होते. ती महिला ग्रेनेड हल्ला करण्याच्या तयारीत होती.

दहशतवाद्यांसोबतच्या या चकमकीत काईलच्या स्नायपरमधील गोळ्याच केवळ दहशतवाद्यांना लक्ष्य करत होत्या असे नाही तर, दोन वेळेस त्याला देखील गोळ्या लागल्या होत्या. तेव्हा तो आयईडी एक्सल्पोजन टीमचा सदस्य होता.

chris-kayle-marathipizza03
pinimg.com

एवढ्या मोठ्या संख्येने दहशतवाद्यांचा खात्मा केल्यानंतरही त्याला त्याचा जराही अभिमान नव्हता. तो म्हणायचा की,

मी शत्रुशी लढतांनी त्यांची संख्या मोजत नव्हतो. हा माझ्या नोकरीचा भाग होता.

खरेतर त्याला युद्ध जराही आवडत नव्हते. ‘अमेरिकन स्नायपर’ हे त्याने आपल्या अनुभाववरून लिहिलेले पहिले पुस्तक होय. २००९ साली आलेल्या या पुस्तकाने अमेरीकेमध्ये मोठा धुमाकूळ घातला, ते वादग्रस्त देखील ठरले.

न्यूयॉर्क टाईम्सच्या बेस्ट सेलरच्या यादीत तेव्हा या पुस्तकाने स्थान मिळविले होते.

याचं पुस्तकावर आधारित अमेरिकन स्नायपर हा बहुचर्चित चित्रपट येऊन गेला होता, जो प्रेक्षकांच्या ही पसंतीस उतरला होता.

अखेर ही जिवावरची नोकरी सोडल्यानंतर त्याने मिलिट्री कॉन्ट्रॅक्टींग फर्म सुरु केली होती. पण दुर्दैवाने त्याला निवृत्तीचा आनंद उपभोगता आला नाही. २ फेब्रुवारी २०१३ रोजी एडी रे रुथ या नौदलातीलच माजी अधिकाऱ्याने क्रिसवर गोळ्या झाडून त्याची हत्या केली.

यामागे कोणतेही पूर्व कारण नव्हते असे सांगण्यात आले. एडी रे रुथ हा पोस्टट्रॉमेटिक स्ट्रेस सिंड्रोम या मानसिक आजाराने ग्रस्त होता, त्याच आजाराच्या परिणामामुळे त्याने क्रिस वर गोळी झाडली.

chris-kayle-marathipizza04
prodimage.images-bn.com

आजही अमेरिकेमध्ये म्हटले जाते. क्रिस काईल हा एकच होता, तसा स्नायपर होणे कोणालाच शक्य नाही! 

 

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम Copyright © InMarathi.com | All rights reserved.

 

One thought on “१५० हून अधिक दहशतवाद्यांना कंठस्नान घालणारा डेडलीएस्ट स्नायपर!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?