कोरोनापासून सुटकेच्या प्रयत्नांत असताना शास्त्रज्ञांचा “हा” शोध जगासाठी ठरतोय आशेचा किरण

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

कोरोनाने जगभर जे थैमान घातले आहे त्याने सगळ्या मानवजातीला जेरीस आणले आहे. आता या कोरोना व्हायरसवर कोणतातरी अंकुश आणणे गरजेचे बनले आहे.

कोरोना व्हायरसचा धोका जेव्हा लक्षात आला तेव्हापासूनच खरंतर त्यावर उपाययोजना काय करता येईल, यासाठी संशोधन सुरू आहे.

कोरोना व्हायरस चीनमध्ये आला तो महिना डिसेंबर. त्यानंतर जानेवारीमध्ये जागतिक आरोग्य संघटनेने एक ‘भयानक संसर्गजन्य आजार’असं त्याचं वर्णन केलं आणि त्याची माहिती सगळ्या जगाला दिली.

सुरुवातीला चीनमध्येच असणारे कोरोनाचे रुग्ण हळूहळू जगभर वाढत गेले. कोरोना व्हायरस हा एक नवीन प्रकारचा व्हायरस असल्यामुळे त्यावर लस हा एकमेव पर्याय आहे.

 

corona virus inmarathi 2

 

इतर कोणतेही औषध त्यासाठी उपयोगाचं नाही. चीनमध्ये जेव्हा याचं प्रमाण खूप होतं तेव्हापासूनच त्यावर लस शोधण्याचा प्रयत्न चीन मध्ये देखील होत होता आणि तो अजूनही सुरू आहे.

ऑस्ट्रेलिया, भारत, अमेरिका अशा वेगवेगळ्या देशांमध्ये देखील या व्हायरसवरती लस मिळेल का यावर संशोधन सुरू आहे. अगदी आपल्या पुण्यात देखील त्याच्यावर संशोधन सुरू आहे.

अमेरिकेत देखील यावर लस मिळावी यासाठी संशोधन सुरू आहे आणि सध्या तर अमेरिकाच कोरोनाव्हायरस मुख्य केंद्र बनली आहे. इनोव्हियो फार्मासिटिकलसने यावर एक लस तयार केलेली आहे.

अमेरिकेत आधीच एक लस कोरोना व्हायरस वर काढण्यात आलेली असून इनोविया फार्मासिटिकलची ही INO 4800 ही दुसरी लस आहे.

 

corona vaccine inmarathi 2
marketwatch

 

अमेरिकेत आता डायरेक्ट माणसांवरच या लसीचे प्रयोग होत आहेत. पहिली लस देखील माणसांनाच देण्यात आलेली आहे, पण ज्यांना कोरोना नाही अशा व्यक्तींना अशाप्रकारची लस देण्यात येते.

आणि त्यानंतरच त्याचा परिणाम काय होणार आहे हे पाहिला जाणार आहे.

पेनसिल्व्हानिया मधील एका छोट्या लॅबमध्ये ही लस तयार करण्यात आली आहे. आणि त्यांना पुढच्या चाचण्यांकरिता परवानगी मिळाली असून, आता हेल्दी स्वयंसेवक व्यक्तींना ती दिली जाणार आहे.

सहा एप्रिल ला पहिल्या व्यक्तीला ही लस देण्यात आलेली आहे. प्रायोगिक तत्त्वावर जरी ही लस देण्यात आली असली तरी तिथे काय परिणाम येतात हे बघणं खरंच इंटरेस्टिंग असेल.

 

corona vaccine inmarathi 1
nbc news

 

एनोविया फार्मासिटिकलने जरी ही लस तयार केलेली असली तरी त्यासाठी लागणारी आर्थिक मदत मात्र बिल आणि मिलिंडा गेट यांच्या फाउंडेशन कडून मिळाली आहे.

INO 4800 ही कोरोनाव्हायरस संदर्भात बनलेली दुसरी लस आहे. पहिली लस देखील अमेरिकेत तयार करण्यात आली असून मॉडर्न बायोटेक फार्म मध्ये ती तयार करण्यात आली आहे आणि मार्चमध्येच त्या लसीचे स्वयंसेवक व्यक्तींवर प्रयोग सुरू करण्यात आले आहेत.

INO 4800 ही लस दिल्यावर माणसाच्या शरीरातील DNA अधिकतम सक्षम होतील आणि antibodies तयार होतील,त्यामुळे माणसाची प्रतिकारशक्ती वाढेल.

हे DNA medicine माणसाच्या शरीरातील इतर घटकांमध्ये हस्तक्षेप करणार नाही.

हे प्रयोग स्वतःवर करून घेण्यासाठी जे स्वयंसेवक तयार झाले आहेत त्यांची आधी वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून त्यांना इतर कोणताही आजार नाही, ही हे पाहण्यात आलं आहे.

अमेरिकेतील, ‘नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थस इन्फेक्शियस डिसीज युनिट’चे प्रमुख अँथनी फोसी यांच्या म्हणण्यानुसार, या लसीवरचा प्रयोग पाहण्यासाठी एक वर्षाचा कालावधी लागणार आहे.

 

corona vaccine inmarathi 3
benzinga

 

ही लस माणसावर उपयुक्त ठरेल की नाही हे एक वर्षाच्या अभ्यासानंतरच कळणार आहे.

कोरोनाव्हायरसशी लढण्यासाठी तयार करण्यात आलेल्या ह्या लसीचा प्रयोग करून घेण्यासाठी चाळीस हेल्दी लोक पेन्सिल्व्हिया युनिव्हर्सिटी मध्ये तयार आहेत.

तसेच मिसुरी इथल्या रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये देखील काही स्वयंसेवक स्वतःवर प्रयोग करून घेण्यासाठी तयार आहेत.

यात प्रयोगात सहभागी होणाऱ्या व्यक्तींना ही लस चार आठवड्यांमध्ये दोनदा देण्यात येणार आहे.

त्यातील पहिल्या फेजमध्ये देण्यात येणारे इंजेक्शननुसार माणसाच्या शरीरातील प्रतिकार शक्ती याला कसा प्रतिसाद देते हे पाहणं आणि ही लस किती सुरक्षित आहे हे पाहणं तपासण्यात येईल.

तर दुसऱ्या फेजमध्ये काही वैद्यकीय चाचण्या करण्यात येणार असून covid-19 साठी ही लस किती उपयुक्त आहे हे पाहिले जाईल.

इनोव्हिया सध्या लोकांचे रजिस्ट्रेशन करून घेत आहे. जेणेकरून यावरच संशोधन लवकर होईल, आणि येणाऱ्या उन्हाळ्यात त्याचा रिझल्ट आपल्याला कळेल.

 

corona vaccine inmarathi 4
the san diego

 

आणि रिझल्ट जर पॉझिटिव्ह असेल तर पुढची लस उत्पादन करणे सोपे जाईल.

एनोविया ही कंपनी ही, फार्मासिटिकल फर्म covid-19 साठी तयार करण्यात येणाऱ्या लसीसाठी जगातल्या इतर कोणत्याही फर्म पेक्षा पुढे आहे.

कंपनीच्या प्रवक्त्याच्या म्हणण्यानुसार जानेवारी १० पासूनच जेव्हा कोरोना व्हायरस बद्दल जगाला माहीत झालंय तेव्हापासूनच त्यांचा रिसर्च सुरू असून त्यांनी त्याच वेळेस त्यावरची लस शोधली आहे.

आणि त्यावरच्या वैद्यकीय चाचण्या सुरु केलेल्या आहेत. बिल आणि मिरिंडा गेट यांचे कंपनीने आभार मानले आहेत, कारण त्यासाठी होणारा खर्च त्यांच्या फाउंडेशन मधून होत आहे.

आणि सहा एप्रिल २०२० मध्ये अमेरिकन एफडीए ने त्यांच्या प्रयोगांना मान्यता दिली आहे. प्रवक्त्याच्या म्हणण्यानुसार, पुढचा मार्ग खडतर असला तरी अवघड नाही.

वर्षभराच्या आत उत्पादन सुरू होईल असा विश्वास त्यांना वाटतोय.

आत्तापर्यंत covid-19 साठी एकूण सहा प्रकारच्या लसी तयार करण्यात आलेल्या आहेत. त्यामध्ये एनोव्हिया मॉडरेना, यांच्याबरोबरच ऑस्ट्रेलियातील मेलबर्न येथील यूनिवर्सिटी ऑफ क्वींसलँड देखील सहभागी आहे.

यातली कुठली लस covid-19 साठी अधिक उपयुक्त आहे हे पाहिलं जात आहे. जी लस सगळ्यात उत्तम असेल तिचं उत्पादन लगेच सुरू करण्यात येणार आहे.

 

corona test inmarathi
quartz

 

सध्या लसीची इतकी मोठी गरज आहे की ती लवकरात लवकर लस मिळावी यासाठी प्रयत्न होत आहेत.

परंतु त्याच बरोबर ती माणसासाठी उपयुक्त आहे की नाही, त्या लसीचा वेगळा त्रास काही होणार नाही ना, हेदेखील पाहणे महत्त्वाचे आहे.

परंतु सध्या एनोव्हिया ही कंपनी २०२० पर्यंत च्या अखेरपर्यंत १००००००डोस बनवू शकेल, असा विश्वास व्यक्त करते. सगळ्यांच्या प्रयत्नांना यश मिळून ही लस आता बाजारात येऊ दे आणि सध्या मानवजातीवर आलेलं संकट टळू दे.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?