सचिन तेंडूलकरच्या नावाने लॉन्च झालेल्या फोनची तुम्हाला माहित नसलेली वैशिष्ट्ये

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

काय म्हणता? माहित नाही? अहो खरं आहे हे. सचिन तेंडूलकरच्या नावाने एक स्मार्टफोन लॉन्च झालाय. ही गोष्ट ऐकून तुम्ही सचिनचे सचिनचे डायहार्ट चाहते असाल तर तुमच्यासाठी आभाळ ठेंगणे झाले असेल आणि तुम्हाला उत्सुकता लागली असेल या फोनबद्दल जाणून घेण्याची. त्यात काय विशेष आहे ते पाहण्याची…तर चला जाणून घेऊया सचिन तेंडूलकरच्या नावाने लॉन्च झालेल्या फोनची तुम्हाला माहित नसलेली वैशिष्ट्ये..!

srt-phone-marathipizza
androidauthority.com

सचिन तेंडूलकरच्या या स्मार्टफोनचे नाव आहे SRT- अर्थात सचिन रमेश तेंडूलकर

हा नवीन स्मार्टफोन अॅण्ड्रोईड सिस्टमवर चालणारा आहे. बेंगळूरमधील स्माट्रॉन इंडिया कंपनीने हा फोन तयार केलला असून तो ग्राहकांच्या पसंतीस नक्की उतरले अशी त्यांना आशा आहे. तुम्हाला एक प्रश्न सतावत असेल ना की कंपनीने या फोनला सचिनचे नाव का दिले?

त्याचे उत्तर आहे- कारण या कंपनीमध्ये आणि या फोनच्या निर्मितीमध्ये सचिन स्ट्रॅटेजिक इन्व्हेस्टर आहे.

srt-phone-marathipizza01
sportswallah.com

ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी फोन सोबत एक वेगळ बॅक कव्हर देखील देण्यात येणार आहे, ज्यावर सचिनची ऑटोग्राफ असेल.

सोबतच हा फोन Qualcomm Snapdragon 652 प्रोसेसर, 4GB RAM, 32GB इंटर्नल मेमोरीने सुसज्ज देखील असेल.

तसेच 13 MP रियर कॅमेरा, 5 MP फ्रंट कॅमेरा, 5.5 इंच FHD स्क्रीन, 2.5D ग्लास, Quick Charge 2.0 सपोर्ट सोबत 3,000mAh च्या बॅटरीमुले हा स्मार्टफोन परिपूर्ण वाटतो.

अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ड्युअल सीम सोबत हा फोन Reliance Jio VoLTE ला देखील सपोर्ट करतो. या फोनच्या किंमती मॉडेलनुसार दोन प्रकारच्या आहेत.

srt-phone-marathipizza02
news18.com

32GB स्मार्टफोनची किंमत आहे- 12,999 रुपये
64GB स्मार्टफोनची किंमत आहे- 13,999 रुपये

हा फोन मार्केटमध्ये आल्यामुळे या प्राईज रेंज मधील इतर स्मार्टफोन्सना स्पर्धा निर्माण झाली आहे. सचिनच्या SRT स्मार्टफोनचा खरा परिणाम Moto G5 आणि Moto G5 Plus वर होण्याची शक्यता आहे.

सचिन नंतर आणि सलमान खान देखील Being Smart नावाचा स्मार्टफोन लॉन्च करण्याच्या तयारीत आहे म्हटलं.!!

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017  InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?