हा असा असेल नवा बॉस – Nokia 3310 ची सगळी माहिती वाचा!

आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

===

नोकिया ३३१० च्या पुनरागमनाची बातमी सगळ्यांनाच खुश करून गेली. ज्यांनी हा मोबाईल स्वतः वापरलाय त्यांना ह्याच्या नवीन रूपाचं खासच आकर्षण. काहींनी तर अजूनही जपून ठेवला आहे हा मोबाईल. जुना फोन त्या हटके कलर कॉम्बिनेशनमुळे आणि आकर्षक बॉडी डिझाईनमुळे लोकप्रिय होता.

InMarathi Android App

Nokia-3310 old marathipizza

Source

दणकट आणि टिकाऊ असलेल्या ह्या फोनच्या लोकप्रियतेमुळेच नोकिया कंपनीने हा फोन परत बनवायला सुरुवात केलीये आणि खास गोष्ट ही की हा नवीन फोन जाम भारीये! नोकियाने जुन्या मोबाईलची आठवण कायम सोबत असेल ह्याची काळजी घेत नवीन बॉडी डिझाईन केली आहे.

नोकियाने नुकतेच काही नवीन फोटो पुढे आणलेत :

nokia 3310 abstract marathipizza

 

हे आहेत त्याचे लेटेस्ट फीचर्स:

Body – 115.6 x 51 x 12.8 mm

SIM – ह्यात 2G कनेक्टिविटी (GSM 900/1200 MHz) सोबत Single आणि Double SIM मध्ये उपलब्ध

Camera – 2 MP कॅमेरा फ्लॅश सोबत

Memory – इंटर्नल मेमरी 16 MB सोबत मेमरी कार्ड स्लॉटमध्ये  32 GB पर्यंतचं कार्ड बसू शकतं

Connectivity – ब्लुटुथ (3.0) आणि USB (2.0) पोर्ट

Audio – 3.5 mm ऑडिओ जॅक ज्याच्यावर FM रेडिओ आणि ऑडिओ प्लेयर उपलब्ध

Screen – 2.4″ असलेला डिस्प्ले सोबत पोलराईज्ड स्क्रीन ज्यामुळे उन्हात सुद्धा नीट वाचता येईल

OS  – Nokia Series 30+ म्हणजेच जुनी ओरिजिनल नोकिया (हयात फक्त icons नविन दिले असतील)

Battery – 22 mAh बॅटरी जी ३१ दिवस सलग चालते

आपलं जे सध्याचं चार्जर आहे ना, तेच ह्याला पण चालणार, म्हणजे बारीक पिन चा चार्जर मागायचा प्रश्न मिटला! अजून एक, तुम्हाला तो लोकप्रिय नोकियाचा पेटंट स्नेक गेम आठवतोय का हो? तो ही असणार आहे ह्या नवीन मोबाईल मध्ये – अगदी नव्याने!

snake game nokia marathipizza

रंगसंगती म्हणाल तर ह्यावेळी नोकियाने खरंच सुखद धक्का दिलाय. आकर्षक अश्या नवीन डिझाईन मध्ये चार रंगात हा फोन आपल्या भेटीला येणार आहे:

four shades marathipizza

आता राहिला शेवटचा प्रश्न! किंमत काय? – स्थानिक मार्केट मधल्या होणाऱ्या बदलांशिवाय हा फोन €49 (एकोणपन्नास युरो) ला असणार आहे म्हणजेच भारतात 3456.05 रुपये!

ह्या फोनची आणखी वैशिष्ट्ये बघण्यासाठी हा व्हिडीओ बघा :

माहिती व फोटो

सध्याच्या अँड्रॉइड वेडापुढे जुन्या नोकियावरचं प्रेम किती वरचढ ठरतंय हे कळेलच लवकर!

लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *